मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज १४ एप्रिलला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नईचा सामना रंगणार आहे. या सामन्याच्या काही तास आधी अनुभवी भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराच्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. पुजाराची एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टवरून तीन वर्षांनंतर पुजारा चेन्नई सुपर किंग्समध्ये पुन्हा परतणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
– quiz
पुजाराने ट्विट करत म्हटले, “या मोसमात सुपर किंग्जमध्ये सामील होण्यासाठी उत्सुक आहे!”, या पोस्टवरून तीन वर्षांनंतर तो चेन्नई सुपर किंग्सच्या फ्रँचायझीमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुजाराने सुपर किंग्स हा हॅशटॅग त्याच्या पोस्टमध्ये वापरला आहे.
आजच्या एल क्लासिको सामन्यावर सर्वांची नजर असतानाच पुजाराने हे ट्विट केले आहे, त्यामुळे चेन्नई-मुंबईचा सामना आणि पुजारा हा चर्चेचा विषय आहे. पुजारा सीएसकेच्या ताफ्यात खेळाडू म्हणून सहभागी होणार की सपोर्ट स्टाफचा भाग हा मुद्दाही चर्चेत आहे. पण पुजाराने अचानक केलेल्या या पोस्टमागील नेमकं कारण काय आहे, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
CSK ने आयपीएल २०२१ मध्ये पुजाराला ५० लाख रुपयांच्या किमतीसह संघात घेतले. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यानंतर सीएसकेने त्याला पुढच्या हंगामा रिलीज केले. त्यानंतर आयपीएल २०२२ आणि २०२३ मध्ये त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. पण आता पुजारा आयपीएल २०२४ दरम्यान पुन्हा एकदा चेन्नई संघात सामील होणार का, अशी चर्चा सोशल मीडियावर जोर धरून आहे.