CSK vs MI, IPL 2024 Highlights: आयपीएलमधील एल क्लासिको सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सवर २० धावांनी विजय मिळवला. मुंबईतील वानखेडेवर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रोहित शर्माने झंझावाती शतरक झळकावले पण संघाला मात्र विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. या मोसमातील चेन्नईचा हा चौथा विजय असून मुंबई इंडियन्सचा चौथा पराभव आहे. या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २०६ धावा केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्युत्तरात मुंबईचा संघ २० षटकांत केवळ १८६ धावा करू शकला आणि सीएसकेने २० धावांनी सामना जिंकला. मुंबईसाठी रोहित शर्माने अप्रतिम खेळी खेळली. रोहितने १२ वर्षांनंतर आयपीएलमध्ये शतक झळकावले आहे. या सामन्यात रोहितने १०५ धावा केल्या. चेन्नईच्या विजयात या एमएस धोनीचे सलग ३ षटकार, पाथिरानाचे ४ विकेट, ऋतुराज (६९) आणि शिवम दुबेची (६६) शानदार खेळी यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या.

Live Updates

Mumbai Indians vs Chennai Super Kings Highlights: मुंबई इंडियन्स वि चेन्नई सुपर किंग्समधील सामन्यात चेन्नईने मुंबईचा २० धावांनी पराभव केला. ऋतुराजची चेन्नई ही पंड्याची मुंबईवर चांगलीच भारी पडली.

18:40 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: या विक्रमावर धोनीच्या नजरा

मुंबईविरूद्धच्या आजच्या सामन्यात एमएस धोनीची नजर एका खास विक्रमावर असेल. धोनी या सामन्यात २५ धावा करू शकल्यास तो आयपीएलच्या एल क्लासिको सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल.

18:33 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: दोन्ही संघ मैदानात दाखल

मोठ्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे संघ वानखेडेच्या मैदानात दाखल झाले आहेत. दोन्ही संघांचे खेळाडू बसमधून मैदानात पोहोचले आहेत आणि सामन्यासाठी सज्ज होत आहेत.

17:39 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: मुंबईच्या कर्णधारांचा सीएसकेविरूद्धचा रेकॉर्ड

चेन्नई वि मुंबई यांच्यातील सामन्यात रोहित व्यतिरिक्त, इतर कर्णधारांनी १३ सामन्यांमध्ये संघाची कमान सांभाळली आहे. यामध्ये मुंबईने ७ सामने गमावले आहेत, तर ६ सामने जिंकले आहेत.

17:32 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड

मुंबई इंडियन्स वि चेन्नई सुपर किंग्समध्ये आतापर्यंत ३६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी २० सामने मुंबईने जिंकले आहेत तर चेन्नईला १६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सशिवाय कोणत्याही संघाने चेन्नईला सर्वाधिक वेळा पराभूत केले नाही.

MI vs CSK, IPL 2024 Highlights: मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्सने २० धावांनी पराभूत केले. वानखेडेवर झालेल्या य सामन्यात रोहितचे शानदार शतक मात्र व्यर्थ ठरले.