Mumbai Indians vs Delhi Capitals IPL 2024 Highlights: मुंबई इंडियन्सने दिल्लीचा ३० धावांनी पराभव करत यंदाच्या मोसमातील पहिला विजय नोंदवला आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २९ षटकांत ५ गडी गमावून २३४ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सला निर्धारित षटकात केवळ २०५ धावा करता आल्या. यासह मुंबईने हा सामना २९ धावांनी जिंकला. या मोसमात मुंबईचा हा पहिला विजय आहे.

२३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीला फारशी सुरुवात झाली नाही. रोमारियो शेफर्डने चौथ्या षटकात डेव्हिड वॉर्नरची विकेट घेतली. वॉर्नरने ८ चेंडूत १० धावा केल्या. यावेळी अभिषेक पोरेलसह पृथ्वी शॉने डाव सांभाळला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. जसप्रीत बुमराहने पृथ्वी शॉला क्लीन बोल्ड करत ही भागीदारी तोडली. पृथ्वीने ४४ चेंडूत ६६ धावा ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या.

शॉ बाद झाल्यानंतर पोरेलने ट्रिस्टन स्टब्ससोबत तिसऱ्या विकेटसाठी ३४ धावांची भागीदारी केली. पुन्हा बुमराहने एक विकेट घेत पोरेलला झेलबाद केले. पोरेलने ३१ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या. या सामन्यात कर्णधार ऋषभ पंत अपयशी ठरला, अवघ्या ३ चेंडूत १ धाव घेत झेलबाद झाला. यासोबतच ट्रिस्टन स्टब्सच्या २५ चेंडूत नाबाद ७१ धावांच्या खेळीने सर्वांची मने जिंकली. त्याने ७ षटकार आणि ३ चौकारांसह शानदार खेळी केली पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली.

तत्पूर्वी, मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २३४ धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ४९ धावांची खेळी खेळली. तयांच्याशिवाय टीम डेव्हिडने नाबाद ४५, इशान किशनने ४२, हार्दिक पांड्या आणि रोमॅरियो शेफर्डने प्रत्येकी ३९ धावा केल्या. या मोसमातील पहिला सामना खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवला खातेही उघडता आले नाही. पण रोमारियो शेफर्डच्या अखेरच्या षटाकातील ३२ धावांमुंळे मुंबई संघ हा विजय मिळवून शकला, दिल्ली कॅपिटल्सकडून अक्षर पटेल आणि ॲनरिक नॉर्किया यांनी २-२ विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय खलील अहमदला १ विकेट मिळाली.

Live Updates

IPL 2024 Live Score, MI vs DC: मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावर झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात मुंबईने २९ धावांनी विजय नोंदवला. मुंबईच्या घरच्या मैदानावर यंदाच्या मोसमातील त्यांनी पहिला विजय नोंदवला.

19:16 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: मुंबईच्या खात्यात पहिला विजय

हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला आहे. मुंबईने दिल्ली संघाचा २९ धावांनी पराभव केला आहे. दिल्ली पराभूत झाली असली तरी पृथ्वी शॉ ६६ धावा तर ट्रिस्टन स्टब्स नाबाद ७१ धावांच्या खेळांनी सर्वांनाच प्रभावित केले.

19:13 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: अखेरच्या षटकात ३ विकेट

हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला आहे. मुंबईने दिल्ली संघाचा ३० धावांनी पराभव केला आहे. तर शेवटच्या चेंडूवर झाय रिचर्डसन २ धावा करत झेलबाद झाला.

19:10 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: दिल्लीने गमावली पाचवी विकेट

शेफर्डच्या षटकाची सुरूवात स्टब्सने षटकाराने केली. सलग दोन षटकार लगावल्यानंतर चौथ्या चेंडूवर धाव घेण्याच्या नादात अक्षर पटेल धावबाद झाला. स्टब्सने शेफर्डच्या षटकात शानदार फटकेबाजीसह २०० धावांचा पल्ला गाठला आहे.

19:02 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: ट्रिस्टन स्टब्सचे अर्धशतक

दिल्लीचा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सने अवघ्या १९ चेंडूत ५० धावा केल्या. त्याने या खेळीत ४ षटकार आणि ३ चौकार लगावले आहेत. दिल्लीला विजयासाठी १८ चेंडूत ६३ धावांची गरज

18:58 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: ऋषभ पंत स्वस्तात झेलबाद

कोएत्झीच्या १६व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर ऋषभ पंत ३ चेंडूंमध्ये १ धाव करत बाद झाला. १६ षटकांनंतर दिल्ली ४ बाद १५३ धावांवर खेळत आहे.

18:49 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: बुमराहच्या खात्यात दुसरी विकेट

बुमराहच्या १५व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर अभिषेक पोरेल झेलबाद झाला. पृथ्वी शॉसोबत त्याने संघाचा डाव सावरत चांगली कामगिरी केली. बाद होण्यापूर्वी त्याने ३१ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या. दिल्ली १५ षटकांनंतर ४ बाद १४४ धावांवर खेळत आहे.

18:33 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: बुमराहच्या यॉर्करवर शॉ क्लीन बोल्ड

पृथ्वी शॉ आणि अभिषेक पोरेलच्या ५० अधिक धावांच्या भागीदारीनंतर मुंबईला विकेटची आवश्यकता होती. बुमराहने १२व्या षटकात संघाला विकेट मिळवून दिली. बुमराहच्या यॉर्करवर पृथ्वी शॉ क्लीन बोल्ड झाला. त्याने बाद होण्यापूर्वी ४० चेंडूत ३ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या.

18:28 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: दिल्लीने केल्या १०० धावा

आकाश मधवालच्या षटकात मुंबईला दोन झेल टिपण्याची संधी होती पण ती गमावली. अखेरच्या चेंडूवर कोएत्झीच्या हातात आलेला चेंडू निसटल्याने दिल्ली सध्या मजबूत स्थितीत आहे. ११ षटकांनंतर दिल्लीने १ बाद १०७ धावा केल्या आहेत.

18:21 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: पृथ्वी शॉचे शानदार अर्धशतक

पृथ्वी शॉने कोएत्झीच्या नवव्या षटकात चौकारासह आपले अर्धशतक झळकावले आहे. १० षटकानंतर पृथ्वी ३७ चेंडूवर ६४ धावांच्या खेळीसह खेळत आहे. त्याच्या या शानदार खेळीसह दिल्लीचा संघ १ बाद ९४ धावांवर खेळत आहे.

18:12 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: पृथ्वी शॉची शानदार फटकेबाजी

पियुष चावलाच्या ८व्या षटकात शॉने १६ धावा कुटल्या आहेत. यासह पृथ्वी शॉ २९ चेंडूत ४६ धावा करत मैदानात आहे. त्याला साथ देत ११ चेंडूत १२ धावांवर अभिषेक पोरेल खेळत आहे. आठ षटकांनंतर दिल्लीची धावसंख्या १ बाद ६९ धावा आहे.

18:04 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: पॉवरप्लेमध्ये १ बाद ४६ धावा

दिल्लीने पहिल्या विकेटनंतर पॉवरप्लेमध्ये ४६ धावा केल्या आहेत. अभिषेक पोरेल आणि पृथ्वी शॉने संघाला एक चांगली सुरूवात करून दिली आहे. शॉ ३१ धावा तर पोरेल ११ धावांसह मैदानात कायम आहे.

17:50 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: डेव्हिड वॉर्नर झेलबाद

तुफान फलंदाजी केल्यानंतर रोमारियो शेफर्डने गोलंदाजीतही मोठी विकेट मिळवून दिली. शेफर्डच्या चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर वॉर्नरला झेलबाद केले. वॉर्नरने बाद होण्यापूर्वी ८ चेंडूत १० धावा केल्या.

https://twitter.com/IPL/status/1776949089403584864

17:40 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: दिल्लीच्या डावाला सुरुवात

मुंबईने दिलेल्या २३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीचे पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर सज्ज आहेत. शॉने दुसऱ्याच चेंडूवर षटकार लगावत सुरूवात केली. तर पहिले षटक कोएत्झीने टाकले. दोन षटकांनंतर दिल्लीची धावसंख्या बिनबाद ११ धावा.

17:22 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: दिल्लीला २३५ धावांचे आव्हान

रोमारियो शेफर्डच्या अखेरच्या षटकातील ३२ धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने ५ बाद २३४ धावांचा डोंगर उभारला आहे. डेव्हिडच्या १९ व्या षटकातील १९ धावा आणि शेफर्डच्या अखेरच्या षटकातील ३२ धावांमुळे मुंबई एवढी मोठी धावसंख्या गाठून शकली आहे. यासह दिल्लीला मुंबईने विजयासाठी २३५ धावांचे लक्ष्य दिले आहे.

17:03 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: पंड्या ३९ धावा करत झेलबाद

नॉर्कियाच्या १८व्या षटकाच्या ५व्या चेंडूवर हार्दिक पंड्या झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने ३३ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या. १८ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या ५ बाद १८३ धावा आहे.

17:00 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: टीम डेव्हिडची फटकेबाजी

टीम डेव्हिडने १६ व्या षटकापासून प्रत्येक षटकात एक दणदणीत षटकार लगावत संघाची धावसंख्या सावरली. टीम डेव्हिडने १६ व्या षटकापासून प्रत्येक षटकात एक दणदणीत षटकार लगावत संघाची धावसंख्या सावरली. नॉर्कियाच्या १८व्या षटकातच डेव्हिडने चौकार-षटकारांसह १६ धावा केल्या. एक चौकार आणि दोन षटकार लगावत संघाची धावसंख्या १७० पार नेली.

16:45 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: मुंबईच्या धावांना ब्रेक

सलग चार विकेट्स गमावल्यानंतर मुंबईच्या धावांना ब्रेक लागला आहे. १५ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या ४ बाद १३८ आहे. डेव्हिड ६ चेंडूत ४ धावा तर पंड्या २७ चेंडूत ३१ धावा करत मैदानावर आहेत. रोहित (४९) आणि इशान (४२) यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. पण हे दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर संघाचे इतर फलंदाज धावांचे योगदान देऊ शकले नाहीत.

16:35 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: तिलक वर्मा झेलबाद

लागोपाठ तीन विकेट गमावल्यानंतर तिलक वर्माही बाद झाला आहे. खलील अहमदच्या १३व्या षटकातील चौथ्या चेंडूवर तिलक वर्मा ६ धावा करत झेलबाद झाला. १४ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या ४ बाद १२३ अशी आहे.

16:21 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: अक्षर पटेलने मुंबईला दिला अजून एक धक्का

रोहितला बाद करणाऱ्या अक्षरची इशानने दणदणीत षटकारासह स्वागत केले. पण पुढच्याच चेंडूवर अक्षरने त्याला झेलबाद केले. इशानने समोर लगावलेला शॉट अक्षरने एका हाताने टिपला. इशानने बाद होण्यापूर्वी २३ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या.

https://twitter.com/DelhiCapitals/status/1776926293042573590

16:18 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: १० षटकांनंतर मुंबईची धावसंख्या

१० षटकांत मुंबईने २ बाद १०५ धावा केल्या आहेत. रोहित आणि इशानच्या शानदार सुरूवातीच्या जोरावर मुंबईने झटपट धावा केल्या.सध्या मैदानावर इशान किशन आणि हार्दिकची जोडी आहे. इशान किशन ३६ धावा तर पंड्या १४ धावांवर खेळत आहे.

16:08 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: सू्र्या खाते न उघडताच झेलबाद

रोहित शर्मानंतर पुढच्याच षटकात मुंबईला मोठा धक्का बसला. नुकताच पुनरागमन केलेला सूर्या खाते न उघडताच झेलबाद झाला. नॉर्कियाच्या आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर झेलबाद झाला. आठ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या २ बाद ८४ धावा आहे.

16:04 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: रोहित शर्मा क्लीन बोल्ड, दिल्लीच्या खात्यात मोठी विकेट

शानदार फॉर्मात असलेला रोहित शर्मा अक्षर पटेलच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. सातव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रोहित शर्मा क्लीन बोल्ड झाला, यासह रोहितचे अवघ्या एका धावेने अर्धशतक हुकले. बाद होण्यापूर्वी रोहित शर्माने २७ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ४९ धावा केल्या.

https://twitter.com/DelhiCapitals/status/1776923420422500390

15:58 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: पॉवरप्लेमध्ये ७५ धावांची खेळी

रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर मुंबईने पॉवरप्लेमध्येच एकही विकेट न गमावता ७५ धावा केल्या आहेत. तर रोहित शर्मा अर्धशतकापासून १ धाव दूर आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1776925800404856910

15:54 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: ५ षटकांनंतर मुंबई

५ षटकांतच मुंबई इंडियन्सने बिनबाद ६० धावा केल्या आहेत. रोहितकडून दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत आहे. तर इशान किशनही त्याला साथ देत आहे. रोहित ३५ धावा तर इशान १९ धावांवर खेळत आहे.

15:42 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: दुसऱ्याच षटकात रोहितचा चौकारांचा पाऊस

दुसऱ्याच ओव्हरमध्ये रोहितने इशांत शर्माच्या गोलंदाजीचे चौकारांनी स्वागत केले आणि त्या षटकात १४ धावा केल्या. पहिला चेंडू वाइड टाकल्यानंतर पुढच्या तिन्ही चेंडूवर त्याने चौकार लगावला. दोन षटकांनंतर मुंबईची धावसंख्या बिनबाद २१ धावा अशी आहे.

15:32 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: मुंबई इंडियन्सच्या डावाला सुरूवात

मुंबई इंडियन्स नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करत आहे. रोहित शर्मा आणि इशान किशनची जोडी मैदानात आहे, तर दिल्लीकडून खलील अहमदने गोलंदाजीची सुरूवात केली आहे.

15:09 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन):

रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह

https://twitter.com/mipaltan/status/1776906459533455817

15:09 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन):

डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झाय रिचर्डसन, एनरिक नॉर्किया, इशांत शर्मा, खलील अहमद

https://twitter.com/DelhiCapitals/status/1776908812693143986

15:01 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: नाणेफेक

मुंबई इंडियन्स वि दिल्ली कॅपिटल्स सामन्याची नाणेफेक दिल्लीने जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. दिल्लीकडून झाय रिचर्डसन आणि कुमार कुशाग्र यांना पदार्पणाची कॅप मिळाली आहे. तर मार्श आणि कुलदीप यादवच्या जागी ललित यादव आणि रिचर्डसन संघात संधी मिळाली आहे.

तर मुंबईच्या संघात तीन मोठे बदल झाले आहेत. सूर्यकुमार यादव नमन धीरच्या जागी खेळताना दिसणार आहे. क्वेना मफाकाच्या जागी रोमारियो शेफर्डला संधी मिळाली आहे, तर डेवाल्ड ब्रेविसच्या जागी मोहम्मद नबी खेळताना दिसणार आहे.

https://twitter.com/IPL/status/1776907085919269108

14:51 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 -

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ऋषभ पंत, ट्रिस्टन-स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्किया, इशांत शर्मा, खलील अहमद.

मुंबई इंडियन्स : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी, टिम डेव्हिड, इशान किशन, आकाश मधवाल, क्वान माफाका

Mumbai Indians vs Delhi Capitals IPL 2024 Live Score in Marathi

IPL 2024 Mumbai Indians vs Delhi Capitals Live Match Today: मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ मधील विजयाचे खाते उघडले आहे. मुंबईने दिल्लीचा २९ धावांनी पराभव करत गुणतालिकेत दहाव्या स्थानावरून नववे स्थान गाठले आहे.

Story img Loader