Mumbai Indians vs Delhi Capitals IPL 2024 Highlights: मुंबई इंडियन्सने दिल्लीचा ३० धावांनी पराभव करत यंदाच्या मोसमातील पहिला विजय नोंदवला आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २९ षटकांत ५ गडी गमावून २३४ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सला निर्धारित षटकात केवळ २०५ धावा करता आल्या. यासह मुंबईने हा सामना २९ धावांनी जिंकला. या मोसमात मुंबईचा हा पहिला विजय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीला फारशी सुरुवात झाली नाही. रोमारियो शेफर्डने चौथ्या षटकात डेव्हिड वॉर्नरची विकेट घेतली. वॉर्नरने ८ चेंडूत १० धावा केल्या. यावेळी अभिषेक पोरेलसह पृथ्वी शॉने डाव सांभाळला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. जसप्रीत बुमराहने पृथ्वी शॉला क्लीन बोल्ड करत ही भागीदारी तोडली. पृथ्वीने ४४ चेंडूत ६६ धावा ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या.

शॉ बाद झाल्यानंतर पोरेलने ट्रिस्टन स्टब्ससोबत तिसऱ्या विकेटसाठी ३४ धावांची भागीदारी केली. पुन्हा बुमराहने एक विकेट घेत पोरेलला झेलबाद केले. पोरेलने ३१ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या. या सामन्यात कर्णधार ऋषभ पंत अपयशी ठरला, अवघ्या ३ चेंडूत १ धाव घेत झेलबाद झाला. यासोबतच ट्रिस्टन स्टब्सच्या २५ चेंडूत नाबाद ७१ धावांच्या खेळीने सर्वांची मने जिंकली. त्याने ७ षटकार आणि ३ चौकारांसह शानदार खेळी केली पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली.

तत्पूर्वी, मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २३४ धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ४९ धावांची खेळी खेळली. तयांच्याशिवाय टीम डेव्हिडने नाबाद ४५, इशान किशनने ४२, हार्दिक पांड्या आणि रोमॅरियो शेफर्डने प्रत्येकी ३९ धावा केल्या. या मोसमातील पहिला सामना खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवला खातेही उघडता आले नाही. पण रोमारियो शेफर्डच्या अखेरच्या षटाकातील ३२ धावांमुंळे मुंबई संघ हा विजय मिळवून शकला, दिल्ली कॅपिटल्सकडून अक्षर पटेल आणि ॲनरिक नॉर्किया यांनी २-२ विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय खलील अहमदला १ विकेट मिळाली.

Live Updates

IPL 2024 Live Score, MI vs DC: मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावर झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात मुंबईने २९ धावांनी विजय नोंदवला. मुंबईच्या घरच्या मैदानावर यंदाच्या मोसमातील त्यांनी पहिला विजय नोंदवला.

13:42 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शला दुखापत

मिचेल मार्श हा दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सविरुद्धचा आजचा सामना खेळणार नाही. खुद्द सौरव गांगुलीने सामन्याच्या एक दिवस आधी याबाबत माहिती दिली आहे. मार्शला कधी आणि कुठे दुखापत झाली याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

13:40 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: सूर्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाची जागा घेणार?

दुखापतीनंतर परतलेला सूर्यकुमार यादव दिल्लीविरूद्धच्या सामन्यात खेळताना दिसू शकतो. सूर्यकुमार दुखापतीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून मैदानाबाहेर होता. पण आता त्याच्या पुनरागमनामुळे नमन धीरला बाहेर बसावे लागू शकते. त्याने तिन्ही सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे.

13:29 (IST) 7 Apr 2024
MI vs DC: हेड टू हेड

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये आतापर्यंत 33 सामने झाले आहेत, ज्यामध्ये मुंबईने १८ सामने जिंकून वर्चस्व राखले आहे. तर दिल्लीने १५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

IPL 2024 Mumbai Indians vs Delhi Capitals Live Match Today: मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ मधील विजयाचे खाते उघडले आहे. मुंबईने दिल्लीचा २९ धावांनी पराभव करत गुणतालिकेत दहाव्या स्थानावरून नववे स्थान गाठले आहे.