GT vs MI Highlights, IPL 2024 : आयपीएल २०२४ च्या पाचव्या सामन्यात गुजरात टायटन्सने आश्चर्यकारक कामगिरी केली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात गुजरातने हातातून गेलेला सामना जिंकला. प्रथम खेळताना गुजरातने २० षटकांत १६८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १३ षटकांत २ गडी गमावून १०७ धावा केल्या होत्या. मुंबई हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, मात्र गुजरातच्या गोलंदाजांनी आपल्या करिष्माई गोलंदाजीने सामना फिरवला. मुंबईचा संघ केवळ ९बाद १६२ धावाच करू शकला.

Live Updates

Gujarat Titans vs Mumbai Indians Highlights, IPL 2024 : शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातने बलाढ्य हार्दिक पंड्याच्या मुंबईला पहिल्याच सामन्यात पाणी पाजलं. त्याचबरोबर या सामन्यात ६ धावांनी विजय नोंदवत १७व्या हंगामाचा विजयाने श्रीगणेशा केला आहे.

18:12 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : हवामान कसे असेल?

या सामन्यात पावसाची फारशी शक्यता नाही. अहमदाबादमध्ये सध्या उष्णता असून तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल तर नाणेफेक संध्याकाळी ७ वाजता होईल. त्यावेळी येथील तापमान ३० अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

17:41 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : अहमदाबादची खेळपट्टी कशी असेल?

गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. या मैदानावर आतापर्यंत एकूण १० आयपीएल सामने खेळले गेले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सहा सामने जिंकले आहेत, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने चार वेळा विजय मिळवला आहे. या मैदानाची खेळपट्टी वेळोवेळी फलंदाज आणि गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरते. वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये फलंदाजांना आव्हान देतात. नंतर ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल बनते.

17:34 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड

दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले, तर गुजरात आणि मुंबई यांच्यात आतापर्यंत चार सामने झाले आहेत. गुजरातने यापैकी दोन सामने जिंकले आहेत, तर मुंबईने तेवढेच सामने जिंकले आहेत. गुजरात टायटन्सची मुंबईविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या २३३ धावांची आहे. त्याचवेळी मुंबईने प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध २१८ धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही संघांपैकी कोणता संघ त्यांच्या मागील धावसंख्येपेक्षा अधिक धावा करतो हे पाहणे आज रंजक ठरणार आहे.

Gujarat Titans vs Mumbai Indians Highlights, IPL 2024 : गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध जवळपास गमावलेला सामना जिंकून यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला. शुभमन गिलच्या गुजरातने रोमहर्षक सामन्यात हार्दिक पंड्याच्या मुंबईचा संघाचा ६ धावांनी पराभव केला.