IPL 2024 Arjun Tendulkar Troll : आयपीएल २०२४ चा ६७ वा सामना शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले. नाणेफेक जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात चांगली झाली. याचदरम्यान क्रिकेटचा देव म्हणून प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला अखेर आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली. पण, गोलंदाजी करताना अर्जुन तेंडुलकरबरोबर एक मोये-मोये क्षण घडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्जुन तेंडुलकरने पहिल्या स्पेलमध्ये दोन ओव्हर टाकल्या आणि फक्त १० धावा दिल्या. यानंतर फिल्डिंग करताना त्याला पायाची समस्या जाणवू लागली. यानंतर काही वेळ रोहित शर्मा त्याच्या जागी फिल्डिंगसाठी आला, थोड्या वेळाने अर्जुन पुन्हा मैदानात परतला आणि लखनौच्या डावातील १५ वी ओव्हर टाकायला सुरुवात केली.

ओव्हरच्या पहिल्या दोन चेंडूंवर निकोलस पुरनने जबरदस्त फटकेबाजी करत सलग २ षटकार ठोकत १२ धावा केल्या. पण, तिसरा चेंडू टाकण्यापूर्वी अर्जुन लंगडताना दिसला, पायाला दुखापत झाल्याने अर्जुन मैदानाबाहेर गेला. यानंतर नमन धीरने त्याच्या षटकातील उर्वरित चार चेंडू टाकले. त्याच्याविरुद्धही पुरनने आपली तुफानी फलंदाजी सुरू ठेवली आणि ओव्हरमध्ये एकूण २९ धावा केल्या.

“भावा, हे मंदिर मी बनवलंय; पण हे माझं शेवटचं…” रोहित शर्माच्या ‘त्या’ VIDEO ने खळबळ; MI मधून बाहेर पडण्याची चर्चा

अशाप्रकारे अर्जुन तेंडुलकर गोलंदाजी अर्धवट सोडून मैदानातून बाहेर पडला. यावर आता चाहत्यांनी त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर नेटकरी आता अर्जुनवर भन्नाट मीम्स व्हायरल करत आहेत. “निकोलस पुरन तिसऱ्या बॉलमध्ये पुन्हा सिक्स लगावेल या भीतीने अर्जुन तेंडुलकर मैदानातून बाहेर गेला” असे म्हणत काही जण त्याची खिल्ली उडवत आहेत. तर काहीजण “तू आया नही था, तुझे लाया गया था”, “बिल्कुल रिक्स नही लेने का रे देवा” अशा आशयाचे भन्नाट मीम्स शेअर करत आहेत.

अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर भन्नाट मीम्स

अर्जुन तेंडुलकरच्या ओव्हरमधील उर्वरित ४ चेंडू टाकण्यासाठी नमन धीर आला. त्याने ४ चेंडूत १७ धावा दिल्या, त्यामुळे लखनौने या एका ओव्हरमध्ये एकूण २९ धावा केल्या, त्यामुळे अखेरच्या षटकात एलएसजीची धावसंख्या २१४ पर्यंत पोहोचली. अर्जुनने या सामन्यात एकूण २.२ षटके टाकली, ज्यात त्याने २२ धावा दिल्या. पहिल्या दोन ओव्हरमध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली, पण त्यानंतर त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 mi vs lsg arjun tendulkar leaves the over midway after consecutive sixes from nicholas pooran see funny memes reactions sjr