IPL 2024 Mumbai Indians vs Lucknow Super Giants Highlights : आयपीएल २०२४ मधील ६७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. मुंबईने नाणेफेक जिंकून लखनऊला प्रथम फलंदाजीची संधी दिली. केएल राहुलच्या सेनेने २० षटकांत ६ गडी गमावून २१४ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने २० षटकांत ६ गडी गमावून १९६ धावा केल्या. अशा प्रकारे लखनऊने मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी पराभव केला.

Live Updates

Mumbai Indians vs Lucknow Super Giants Highlights, IPL 2024 : आयपीएल २०२४ मधील ६७ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने आले होते. ज्यामध्ये लखनऊने मुंबईचा १८ धावांनी पराभव केला. हा दोन्ही संघाचा यंदाच्या हंगामातील शेवटचा सामना होता. ज्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सने बाजी मारली.

00:23 (IST) 18 May 2024
MI vs LSG : लखनऊचा मुंबईवर १८ धावांनी दणदणीत विजय

आयपीएल २०२४ च्या शेवटच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लखनऊने मुंबईचा १८ धावांनी पराभव केला. वानखेडेवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम खेळून २० षटकात २१४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ १९६ धावा करू शकला. मुंबईचा हा दहावा पराभव आहे. लखनऊचा हा सातवा विजय आहे. मुंबईकडून नमन धीरने २८ चेंडूत ६२ तर रोहित शर्माने ३८ चेंडूत ६८ धावा केल्या. मात्र, विजयासाठी हे पुरेसे नव्हते. लखनऊकडून रवी बिश्नोई आणि नवीन उल हकने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

https://twitter.com/IPL/status/1791547117447663936

00:07 (IST) 18 May 2024
MI vs LSG : मुंबईला १२ चेंडूत ५२धावांची गरज

आता या सामन्यात लखनौचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. मुंबईची धावसंख्या 18 षटकांत 5 बाद 163 धावा. नमन धीर 19 चेंडूत 34 तर इशान किशन 13 चेंडूत 13 धावांवर खेळत आहे. मुंबईला आता शेवटच्या दोन षटकांत विजयासाठी 52 धावा करायच्या आहेत.

23:47 (IST) 17 May 2024
MI vs LSG : मुंबईला चौथा धक्का बसला

मुंबईला चौथा धक्का हार्दिक पांड्याच्या रूपाने बसला. मोहसीन खानने त्याला नवीन-उल-हककरवी झेलबाद केले. तो केवळ 16 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या मोसमात त्याची बॅट काही खास दाखवू शकली नाही. नेहल वढेरा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी इशान किशन क्रीजवर उपस्थित आहे.

23:34 (IST) 17 May 2024
MI vs LSG : रोहित शर्माही पॅव्हेलियनमध्ये परतला

मुंबई इंडियन्सला 11व्या षटकात मोठा धक्का बसला. रोहित शर्मा 38 चेंडूत 68 धावा करून बाद झाला. 97 धावांवर मुंबईने तिसरी विकेट गमावली. हिटमॅनच्या बॅटमधून 10 चौकार आणि तीन षटकार आले. एकेकाळी मुंबईकडे 88 धावांवर एकही विकेट नव्हती.

23:27 (IST) 17 May 2024
MI vs LSG : सूर्यकुमार यादव पॅव्हेलियनमध्ये परतला

कृणाल पांड्याने 10व्या षटकात मुंबई इंडियन्सला मोठा धक्का दिला. सूर्यकुमार यादव त्याचा आवडता फटका खेळताना सीमारेषेवर झेलबाद झाला. सूर्याला आज खातेही उघडता आले नाही. 10 षटकांनंतर मुंबईची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 92 धावा आहे.

23:17 (IST) 17 May 2024
MI vs LSG : मुंबईची पहिली विकेट पडली

मुंबई इंडियन्सने 9व्या षटकात 88 धावांवर पहिली विकेट गमावली. ज्युनियर एबी म्हणजेच डेवाल्ड ब्रेविस 20 चेंडूत 23 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ब्रेव्हिसला नवीन उल हकने झेलबाद केले. दुसऱ्या टोकाला रोहित शर्मा 32चेंडूत 61धावांवर खेळत आहे. मुंबईला विजयासाठी 68 चेंडूत 127 धावा करायच्या आहेत.

23:11 (IST) 17 May 2024
MI vs LSG : रोहित शर्माचे झंझावाती अर्धशतक

मोहिसन खान सातवे षटक टाकायला आला. या षटकात रोहित शर्माने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. यासह रोहितने आपले अर्धशतकही पूर्ण केले. तो 29 चेंडूत 53 धावांवर आहे. या काळात त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 3 षटकार आले. तर डेवाल्ड ब्रेविस 13 चेंडूत 10 धावांवर खेळत आहे.

23:02 (IST) 17 May 2024
MI vs LSG : पावसानंतर पुन्हा खेळ सुरू

पावसानंतर पुन्हा एकदा सामना सुरू झाला आहे. ४ षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या एकही विकेट न गमावता ३३ धावा आहे. रोहित शर्मा दोन षटकार आणि एक चौकारासह २० धावांवर खेळत आहे. तर ज्युनियर एबी म्हणजेच डेवाल्ड ब्रेविस ११ चेंडूत एका षटकारासह ९ धावांवर खेळत आहे.

22:12 (IST) 17 May 2024
MI vs LSG : पावसामुळे खेळ थांबला

चौथ्या षटकात अचानक पाऊस आला, त्यामुळे खेळ थांबवण्यात आला. पाऊस येण्यापूर्वी ३.५ षटकांचा खेळ झाला. या कालावधीत मुंबई इंडियन्सने एकही विकेट न गमावता ३३धावा केल्या आहेत. रोहित शर्मा १३चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २० वांवर खेळत आहे. तर डेवाल्ड ब्रेविस १० डूत एका षटकारासह ९ धावांवर खेळत आहे.

22:00 (IST) 17 May 2024
MI vs LSG : रोहित-ब्रेविसकडून मुंबईच्या डावाला सुरुवात

लखनऊसाठी अर्शद खानने पहिले षटक टाकले. या षटकात आठ धावा आल्या. रोहित शर्माबरोबर आज मुंबईच्या डावाची सुरुवात करण्यासाठी डेवाल्ड ब्रेविस आला आहे.

21:39 (IST) 17 May 2024
MI vs LSG : लखनऊने मुंबईला २१५ धावांचे लक्ष्य दिले

नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने २० षटकांत ६ गडी गमावून २१४ धावा केल्या. पहिल्या १० षटकांत लखनऊची धावसंख्या ३ गडी बाद ६९ धावा होती. मात्र, यानंतर निकोलस पुरनने अवघ्या २९ चेंडूंत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ७५ धावा करत संघाला संकटातून बाहेर काढले. तर केएल राहुलने ४१ चेंडूत ५५ धावा केल्या. लखनऊने शेवटच्या १० षटकांत ३ चौकार आणि ३ षटकार खेचले. मुंबई इंडियन्सकडून नुवान तुषारा आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

https://x.com/IPL/status/1791500907118490037

21:21 (IST) 17 May 2024
MI vs LSG : अर्शद आणि केएल राहुलही पॅव्हेलियनमध्ये परतले

१७व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अर्शद खानला बाद करून नुवान तुषाराने लखनऊला पाचवा धक्का दिला. तो शून्यावर बाद झाला. यानंतर पीयूष चावलाने केएल राहुलला झेलबाद केले. राहुल ४१ चेंडूत ५५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. लखनऊने १७८ धावांवर सहावी विकेट गमावली.

21:17 (IST) 17 May 2024
MI vs LSG : निकोलस पtरन पॅव्हेलियनमध्ये परतला

१७व्या षटकात नुवान तुषाराने पहिले दोन डॉट बॉल टाकले. त्यानंतर पूरनने पुढच्या दोन चेंडूंवर दोन चौकार मारले. मात्र, पाचव्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात पूरण चौकारावर झेलबाद झाला. पुरणने २९ चेंडूत ७५ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि ८ षटकार आले.

21:10 (IST) 17 May 2024
MI vs LSG : केएल राहुलनेही ठोकले अर्धशतक

निकोलस पूरननंतर केएल राहुलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३७ चेंडूत अर्धशतक केले आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये १०० हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. १६ षटकांनंतर संघाची धावसंख्या १७०/३ आहे.

https://x.com/Sbettingmarkets/status/1791493680999625038

21:04 (IST) 17 May 2024
MI vs LSG : निकोलस पूरनने अर्धशतक ठोकले

पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला निकोलस पुरण दमदार कामगिरी करताना दिसत आहे. त्याने अवघ्या १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे नववे अर्धशतक आहे. १५ षटकांचा खेळ पूर्ण झाला असून पूरण ३०० च्या स्ट्राईक रेटने ६६ धावांवर नाबाद खेळत आहे. त्याचवेळी केएल राहुलही ४७ धावा करून उभा आहे. लखनौचा स्कोअर १५९/३ आहे.

20:55 (IST) 17 May 2024
MI vs LSG : निकोलस पूरनकडून मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई

१३ षटकांनंतर लखन सुपर जायंट्सची धावसंख्या ३ विकेटवर ११३ धावा आहे. केएल राहुल ३३ चेंडूत ४० धावांवर खेळत आहे. त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. तर निकोलस पुरन १३ चेंडूत २९ धावांवर खेळत आहे. त्याने २ चौकार आणि ४ षटकार मारले आहेत.

20:45 (IST) 17 May 2024
MI vs LSG : ११ षटकांनंतर लखनऊ सुपर जायंट्सची धावसंख्य ३ बाद ८१ धावा

११ षटकांनंतर लखनऊ सुपर जायंट्सची धावसंख्या ३ विकेटवर ८१ धावा आहे. केएल राहुल २८ चेंडूंत दोन षटकारांसह २९ धावांवर खेळत आहे. तर निकोलस पुरन सहा चेंडूत एक षटकार मारत सात धावांवर खेळत आहे.

https://x.com/CricWatcher11/status/1791487453863272523

20:30 (IST) 17 May 2024
MI vs LSG : दीपक हुडा ११ धावा करून बाद

पियुष चावलानेही लखनऊला तिसरा धक्का दिला. त्याने १०व्या षटकात दीपक हुडाला नेहल वढेराकडे झेलबाद केले. त्याला केवळ ११ धावा करता आल्या. निकोलस पुरन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी केएल राहुल क्रीजवर उपस्थित आहे. ९.४ षटकांनंतर संघाची धावसंख्या ६९/३.https://x.com/CricWatcher11/status/1791482505352433700

20:13 (IST) 17 May 2024
MI vs LSG : लखनऊला दुसरा धक्का! स्टॉइनिस २८ धावा करून बाद

पियुष चावला सहावे षटक टाकायला आला. केएल राहुलने चावलाच्या गोलंदाजीवर दोन षटकार ठोकले. मात्र, चावलाने शेवटच्या चेंडूवर मार्कस स्टॉइनिसला बाद केले. २२ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने २८ धावा करून तो बाद झाला. ६ षटकांनंतर लखनऊची धावसंख्या २ बाद ४९ धावा आहे.

https://x.com/Retrograde1521/status/1791479593066529180

20:06 (IST) 17 May 2024
MI vs LSG : पाच षटकानंतर लखनऊची धावसंख्या १ बाद ३५ धावा

पाच षटकांनंतर लखनऊ सुपर जायंट्सची धावसंख्या एका विकेटवर ३५ धावा आहे. मार्कस स्टॉइनिस २० चेंडूत २७ धावांवर खेळत आहे. त्याने ५ चौकार मारले आहेत. तर केएल राहुल ९ चेंडूत ५ धावांवर खेळत आहे.

19:52 (IST) 17 May 2024
MI vs LSG : अर्जुन तेंडुलकरने केवळ ३ धावा दिल्या

अर्जुन तेंडुलकरने दुसऱ्या षटकात केवळ ३ धावा दिल्या. दोन षटकांनंतर लखनऊ सुपर जायंट्सची धावसंख्या एका विकेटवर सात धावा आहे. मार्कस स्टॉइनिस सात चेंडूत तीन तर केएल राहुल चार चेंडूत एका धावेवर खेळत आहे. या षटकात मार्कस स्टॉइनिस थोडक्यात बचावला.

https://x.com/kingrunmachine/status/1791473841530872041

19:40 (IST) 17 May 2024
MI vs LSG : लखनऊला पहिला धक्का

लखनऊला पहिला धक्का एका धावेवर बसला. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नुवान तुषाराने देवदत्त पडिक्कलला बाद केले. तो एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. यंदाच्या मोसमात त्याची बॅट शांत राहिली आहे. मार्कस स्टॉइनिस तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी केएल राहुल आहे.

https://x.com/SureshBhadiya_9/status/1791471076482146405

19:12 (IST) 17 May 2024
MI vs LSG : पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स : इशान किशन (यष्टीरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, हार्दिक पंड्या (कर्णधार), नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा.

https://x.com/IPL/status/1791464067510480933

लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान.

19:07 (IST) 17 May 2024
MI vs LSG : मुंबईने नाणेफेक जिंकून निवडली गोलंदाजी

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत लखनऊ सुपर जायंट्स प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.

https://x.com/IPL/status/1791461594662072774

18:24 (IST) 17 May 2024
MI vs LSG : लखनऊ सुपर जायंट्स संघाला एकजुटीने कामगिरी करण्यात अपयश

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने तीन अर्धशतकांसह १३६.३६ च्या स्ट्राइक रेटने ४६५ धावा केल्या आहेत. मात्र, त्याचा स्ट्राईक रेट चर्चेचा विषय राहिलाय. निकोलस पूरन (१६८.९२ च्या स्ट्राइक रेटने ४२४ धावा) यांनी चांगली कामगिरी केली, परंतु संघ म्हणून संघ अपयशी ठरला.

https://x.com/IPL/status/1791446183321502039

17:52 (IST) 17 May 2024
MI vs LSG : रोहित शेवटच्या सहा डावात अपयशी

मुंबईच्या फलंदाजांनी पूर्णपणे निराश केले, गोलंदाजीत जसप्रीत बुमराह (१३ सामन्यांत २० बळी) इतर गोलंदाजांना चांगली कामगिरी करण्यास प्रेरित करू शकला नाही. या सामन्यात पंड्या, रोहित, बुमराह आणि विश्वचषक संघात समाविष्ट असलेल्या सूर्यकुमार यादववर लक्ष असेल. रोहित गेल्या सहा डावांत अपयशी ठरला असून त्याची सर्वोच्च धावसंख्या ही १९ धावा आहे. त्याचबरोबर पंड्यालाही अष्टपैलूची भूमिका चांगल्या प्रकारे बजावता आली नाही. सूर्यकुमार यादवने तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावून आत्मविश्वास वाढवला आहे.

17:49 (IST) 17 May 2024
MI vs LSG : मुंबई आणि लखनऊमध्ये कोणत्या संघाचा वरचष्मा ?

मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आतापर्यंत ५ सामने खेळले गेले आहेत. यापैकी लखनौने ४ सामन्यात विजय मिळवला असून मुंबईने फक्त १ सामना जिंकला आहे. केकेआर कडून ९८ धावांनी पराभूत झाल्यानंतर, लखनऊ सुपर जायंट्सला सनरायझर्स हैदराबादने १० विकेट्सने आणि दिल्ली कॅपिटल्सचा १९ धावांनी पराभूत केले.

https://x.com/IPL/status/1791409174196408602

IPL 2024 Mumbai Indians vs Lucknow Super Giants Live Match Score in Marathi

Mumbai Indians vs Lucknow Super Giants Highlights : मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आतापर्यंत ६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी लखनऊने ५ सामन्यात विजय मिळवला असून मुंबईने फक्त १ सामना जिंकला आहे.

Story img Loader