MI vs RR Highlights, IPL 2024 Match 14: आयपीएल २०२४ चा १४वा सामना आज म्हणजेच १ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आरआरच्या शानदार गोलंदाजीसमोर मुंबईचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले.मुंबईचा संघ २० षटकांत ९ बाद १२५ धावाच करता आल्या. तर प्रत्युत्तरात राजस्थानने रियान परागच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर ६ विकेट्स आणि ४ षटके राखून १२६ धावांचे लक्ष्य सहज गाठले.
Mumbai Indians vs Rajasthan Royals IPL 2024 Highlights: मुंबई इंडियन्स वि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात संजूच्या नेतृत्वाखालील राजस्थानचा संघ सरस ठरला. आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी मुंबई संघाचा मोठा पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला.
राजस्थान रॉयल्सचा शानदार गोलंदाज ट्रेंट बोल्टला त्याच्या पॉवरप्लेमधील भेदक गोलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. बोल्टने ४ षटकात ३ विकेट्स घेत २२ धावा दिल्या. त्याने पहिल्याच षटकात लागोपाठ रोहित शर्मा आणि नमन धीर यांची विकेट घेत संघाला मोठे यश मिळवून दिले. तर पुढील षटकातील दुसऱ्या चेंडूवर डेवाल्ड ब्रेविसला गोल्डन डकवर बाद केले.
६व्या षटकातच रियान परागने २ षटकार आणि एक चौकार लगावत २७ चेंडू राखून मुंबईवर ६ विकेटने सहज विजय मिळवला आहे. रियान परागने या सामन्यात खेळताना शानदार अर्धशतकही झळकावले. मुंबईने दिलेल्या १२५ धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरूवातही फार चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात त्यांना यशस्वी जैस्वालची विकेट मिळवली. त्यानंतर सॅमसन आणि बटलर स्वस्तात बाद झाले पण रियान परागने शेवटपर्यंत मैदानात थांबत संघाला विजय मिळवून दिला.
या पराभवासह मुंबईचा संघाने सलग तीन सामने गमावत पराभवाची हॅटट्रिक साधली आहे, तर राजस्थानने सलग तीन सामने जिंकत विजयाची हॅटट्रिक साधली आहे.
मुंबई इंडियन्सकडून आकाश मधवालने राजस्थानला सहज वाटत असलेला विजय सहजतेने मिळवू दिला नाही. मधवालने संजू सॅमसनला क्लीन बोल्ड तर बटलरला स्वस्तात बाद करत राजस्थानला धक्के दिले. तर नंतर सेट झालेल्या अश्विनला बाद करत त्यांना अजून एक धक्का दिला. पण त्याच्याशिवाय कोणत्याच गोलंदाजाची साथ मिळाली नाही
रियान परागने ३९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५४ धावांची शानदार खेळी केली आणि ४ षटके राखून संघाला विजय मिळवून दिला.
आकाश मधवालने त्याच्या कोट्यातील चौथ्या षटकात संघाला अजून एक विकेट मिळवून दिली आहे. रियान पराग आणि अश्विनची जोडी मैदानात पाय रोवून उभी होती. पण १३व्या षटकात त्याने दुसऱ्याच चेंडूवर अश्विनला आपल्या गोलंदाजीवर झेलबाद केले. तिलक वर्माकडून झेलबाद होण्यापूर्वी अश्विनने १६ चेंडूत एका चौकारासह १६ धावा केल्या.
Now ▶️: Madh Max ??
— Mumbai Indians (@mipaltan) April 1, 2024
Keep it going, Akash bhava! ?#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #MIvRR pic.twitter.com/JuJPuXzvKx
राजस्थानने १० षटकांत ३ बाद ७३ धावा केल्या आहेत. रियान पराग आणि आर अश्विनची जोडी मैदानात कायम असून २५ धावांची भागीदारी केली आहे. आता राजस्थानला विजयासाठी ६० चेंडूत ५३ धावांची गरज आहे.तर मुंबईला विजयासाठी ७ विकेट्स हव्या आहेत.
सॅमसनला झेलबाद केल्यानंतर आकाश मधवाल सातवे षटक टाकण्यासाठी आला. येताच तिसऱ्या चेंडूवर त्याने स्फोटक फलंदाज जोस बटलरला सीमारेषेजवळ झेलबाद केले. बाद होण्यापूर्वी १६ चेंडूत २ चौकारांसह बटलरने १३ धावा केल्या होत्या.
राजस्थान रॉयल्सने पॉवरप्लेमध्ये २ बाद ४६ धावा केल्या आहेत. सामन्याच्या पहिल्याच षटकात पहिली विकेट गमावल्यानंतर सॅमसनने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मधवालने त्याला क्लीन बोल्ड केले. सध्या मैदानावर रियान पराह २ धावा आणि बटलर १२ धावा करत आहेत.
आकाश मधवालच्या गोलंदाजीवर संजू सॅमसन क्लीन बोल्ड झाला. आकाश मधवालच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये संघात संधी मिळाली नाही. पण या सामन्यात संधी मिळताच त्याने त्याच्या पहिल्याच षटकात संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली आहे. संजूने बाद होण्यापूर्वी १० चेंडूत ३ चौकार मारत १२ धावा केल्या.
WELCOME BACK ?
— ?????? (@Shebas_10dulkar) April 1, 2024
Wicket in his 2nd delivery for Akash Madhwal ??#MIvRR pic.twitter.com/WiaOBVQF0P
बुमराहच्या चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बटलरने शॉट खेळला. झेल टिपण्यासाठी हार्दिकने डाइव्ह मारली खरी पण चेंडू थोडक्यासाठी चुकला आणि झेल सुटला. ४ षटकांनंतर राजस्थानची धावसंख्या १ बाद ४१ धावा आहे. सॅमसन १२ धावा तर बटलर १० धावा करत मैदानात कायम आहेत
क्वेना मफाकाच्या पहिल्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल झेलबाद झाला. क्वेना मफाकाच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार लगावले खरे पण पुढच्याच चेंडूवर झेलबाद झाला. क्वेना मफाका गेल्या सामन्यात महागडा ठरला होता पण या सामन्यात त्याने पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवल्याने सगळ्यांनाच दिलासा मिळाला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळेस तीन विकेट्स घेण्याच्या यादीत युझवेंद्र चहलने बुमराहची बरोबरी केली आहे. बुमराह आणि चहलने २० वेळा सर्वाधिक वेळा एका सामन्यात ३ विकेट्स घेतल्या आहेत. चहलने या सामन्यात ४ षटकात ११ धावा देत ३ विकेट्स मिळवल्या.
नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सने केवळ १२५ धावाच केल्या. राजस्थानच्या अप्रतिम आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. अखेरच्या षटकात बुमराहने एक चौकार लगावल्याने संघाला १२५ धावांचा आकडा गाठता आला. मुंबई इंडियन्सने राजस्थानला विजयासाठी १२६ धावांचे आव्हान दिले आहे. पहिल्याच षटकात मुंबईला सलग दोन मोठे धक्के बसले. रोहित शर्मा आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला नमन धीर बोल्टच्या गोलंदाजीवर गोल्डन डकवर बाद झाले. त्यानंतर तिसऱ्या षटकात डेवाल्ड ब्रेविसही पहिल्याच चेंडूवर बोल्टकडून बाद झाला. संघाचा डाव सावरत असलेला इशान किशन पण १६ धावा करत बाद झाला.
पॉवरप्लेमध्येच ४ विकेट्स गमावल्यानंतर तिलक वर्मा आणि पंड्याने ५० अधिक धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या १०० च्या जवळ आणून ठेवली. पण दोघेही फार काळ मैदानात टिकू शकले नाही. मुंबईच्या एकाही फलंदाजाने ४० धावांचा आकडा गाठला नाही. राजस्थानकडून बोल्ट आणि चहलने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर नांद्रे बर्गरने २ विकेटस आणि आवेश खानने १ विकेट घेतली.
Innings Break ‼️
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2024
An impressive bowling and fielding performance restricts #MI to 125/9??
Will #RR be the second away team to win this season? ?
Scorecard ▶️ https://t.co/XL2RWMFLbE #TATAIPL | #MIvRR pic.twitter.com/g61btpmOPy
अखेरच्या षटकांमध्ये वादळी फलंदाजी करण्यासात माहिर असलेला डेव्हिड अवघ्या १७ धावा करत बाद झाला. डेव्हिडला आजच्या सामन्यात संघाला गरज असताना महत्त्वपूर्ण खेळी खेळण्यात अपयश आले. बर्गरच्या गोलंदाजीवर डेव्हिड १९व्या षटकात मोठा फटका खेळण्याचा नादात झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने २४ चेंडूत एका चौकारासह १७ धावा केल्या.
१०० धावांचा आकडा गाठल्यानंतर मुंबईने आठवी विकेट गमावली. चहलच्या १७ व्या षटकात कोएत्झी हेटमायरकडून झेलबाद झाला. त्याने बाद होण्याआधी ९ चेंडूत ४ धावा केल्या. सध्या मुंबईचा संघ ८ बाद ११२ धावांवर खेळत आहे. मैदानात सध्या डेव्हिड आणि बुमराहची जोडी आहे.
मुंबईने १५व्या षटकात १०० धावांचा टप्पा गाठला आहे. पॉवरप्लेमध्ये गमावलेले ४ विकेट्स आणि मधल्या फळीतील काही काळ स्थिरावलेल्या फलंदाजीनंतर मुंबईने १५ षटकांत ७ बाद १०२ धावा केल्या आहेत. मैदानात सध्या टीम डेव्हिड आणि गेराल्ड कोएत्झी आहेत.
५ विकेट्स गेल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या धावसंख्येची जबाबदारी पूर्णपणे तिलक वर्माच्या खांद्यावर होती. ज्याने अनेकदा संघासाठी मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी केली आहे. पण चहलच्या चेंडूवर शॉट मारायला गेला आणि तो अश्विनकडून झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी तिलकने २९ चेंडूत २ षटकारांसह ३२ धावा केल्या. सध्या मुंबईछी धावसंख्या ७ बाद ९७ धावा आहे.
हार्दिक बाद झाल्यानंतर पियुष चावला फलंदाजीसाठी आला होता. पण आवेश खानच्या १२व्या षटकात पहिल्याच चेंडूवर चावला हेटमायरकडून झेलबाद झाला. हेटमारने शानदार झेल टिपत सहावी विकेट मिळवून दिली. चावलाने बाद होण्यापूर्वी ६ चेंडूत ३ धावा केल्या.
मुंबईच्या चार धक्क्यांनंतर तिलक आणि पंड्याने संघाच डाव सावरला. पण पंड्या फार काळ मैदानात टिकू शकला नाही. चहलच्या फिरकीमध्ये फसत पंड्या पॉवेलकडून झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी पंड्याने २१ चेंडूत ४ षटकारांच्या जोरावर ३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ११ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या ५ बाद ८३ धावा इतकी आहे.
WELL PLAYED, HARDIK PANDYA…!!!
— Johns. (@CricCrazyJohns) April 1, 2024
34 runs from 21 balls when Mumbai Indians was in big big trouble – with all pressure & noise from outside, he has batted so well. pic.twitter.com/tW04l6lISN
पॉवरप्लेनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या ४ बाद ४६ धावा केल्या आहेत. पहिल्याच षटकात मुंबईला सलग दोन मोठे धक्के बसले. रोहित शर्मा आणि नमन धीर गोल्डन डकवर बाद झाले. त्यानंतर डेवाल्ड ब्रेविसला पहिल्याच चेंडूवर बाद करत ३ विकेट्स मिळवल्या. तर बर्गरने इशान किशनला बाद करत चौथी विकेट मिळाली. त्यानंतर आलेल्या तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याने मुंबईचा डाव सावरला. सध्या पंड्या १६ धावांसह आणि तिलक वर्मा १२ धावांसह क्रिझवर आहेत.
मुंबई इंडियन्सला चौथा धक्का बसला आहे. सामन्यातील बर्गरच्या चौथ्या षटकात तिसऱ्या चेंडूवर झेलबाद झाला. तिन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर इशानवर संघाची जबाबदारी होती, त्याने प्रयत्नही केला पण फार काळ टिकू शकला नाही. इशानने बाद होण्यापूर्वी १४ चेंडूत १ षटकार आणि २ चौकारासह १६ धावा केल्या.
ट्रेंट बोल्टच्या सामन्यातील दुसऱ्याच षटकात मुंबईला तिसरा धक्का बसला आहे. डेवाल्ड ब्रेविस ही त्याच्या पहिल्याच चेंडूवर नांद्रे बर्गरकडून झेलबाद झाला.अशारितीने मुंबईचे तिन्ही फलंदाज गोल्डन डकवर बाद झाले आहेत.
GOLDEN DUCK FOR ROHIT SHARMA.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 1, 2024
GOLDEN DUCK FOR NAMAN DHIR.
GOLDEN DUCK FOR DEWALD BREVIS.
Trent Boult is on fire – 3 wickets with all on golden ducks…!!! ?? pic.twitter.com/zv0ulyqh6v
ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मा खातेही न उघडताच गोल्डन डकवर बाद झाला. रोहित बाद होताच वानखेडेमध्ये एकच भयाण शांतता पसरली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा गोल्डन डकवर बाद होणारा रोहित शर्मा पहिला खेळाडू आहे. तो १७ वेळा गोल्डन डकवर बाद झाला. रोहित शर्मानंतर आलेला नमन धीरही गोल्डन डकवर बाद होत पॅव्हेलियनमध्ये परतला.
इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल
समालोचक आणि माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी नाणेफेकीवेळी मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याचं नाव उच्चारलं. सर्वसाधारणपणे वानखेडे स्टेडियमवर नाणेफेकेवेळी मुंबईचा कर्णधार बोलायला आला की चाहत्यांचा जल्लोष टिपेला पोहोचतो. पण हार्दिकचं नाव घेताच काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मांजरेकर यांनी हार्दिकला टाळ्यांसह पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. टाळ्यांऐवजी हार्दिकची हुर्यो उडवण्यात आली. यानंतर मांजरेकर यांनी चाहत्यांना खेळभावना जपत वागण्याची सूचना केली.
? Toss ?@rajasthanroyals win the toss and elect to bowl against @mipaltan #TATAIPL | #MIvRR pic.twitter.com/pziDfHNIci

राजस्थान रॉयल्सने सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. राजस्थानच्या संघात एक मोठा बदल झाला, संघाचा गोलंदाज संदीप फिट नसल्याने त्याच्या जागी नांद्रे बर्गर प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळणार आहे. तर मुंबई इंडियन्सच्या संघात कोणताच बदल झालेला नाही.
रोहित मोठी खेळी खेळण्यासाठी उत्सुक असेल पण मुंबई संघाला मैदानावर पंड्याकडून चांगल्या निर्णयाची अपेक्षा असेल. पंड्याने आतापर्यंत वेगवान गोलंदाज बुमराहचा चांगला वापर केलेला नाही. बुमराह आणि पियुष चावला यांनी मुंबईच्या गोलंदाजी आक्रमणात अनुभवाची भर घातली, ज्यामुळे स्थानिक खेळाडू शम्स मुलाणीवरही विश्वास दिसून आला. मुलानी हा आयपीएलमधील नवा खेळाडू असला तरी त्याच्याकडे वानखेडे स्टेडियमवर खेळण्याचा प्रचंड अनुभव आहे. युवा वेगवान गोलंदाज क्वेना मफाका सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चांगलाच महागात पडला, पण या १७ वर्षीय दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाला या स्तरावर संधी मिळणे ही मोठी गोष्ट आहे. परंतु आता त्याला राजस्थानविरुद्धच्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.
राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. सॅमसन आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तसेच प्रतिभावान खेळाडू यशस्वी जैस्वाल या मोसमात पहिली मोठी धावसंख्या करण्यासाठी उत्सुक असेल. जैस्वाल त्याच्या घरच्या मैदानावर परतत आहे, जिथे त्याने उभय संघांमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात ६२ चेंडूत १२४ धावांची तुफानी खेळी केली होती. मात्र या सामन्यात त्यांच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मधल्या फळीत रियान परागवर विश्वास दाखवणे राजस्थानसाठी योग्य सिद्ध होत आहे.
जरी हा आयपीएलच्या १७ व्या हंगामाचा प्रारंभिक टप्पा असला तरी, मुंबई संघाला पराभवाची मालिका संपवायची आहे. त्याचा निव्वळ धावगती (-०.९२५) सुधारायची आहे. मुंबईला दुखापतीतून सावरणारा अनुभवी खेळाडू सूर्यकुमार यादवची उणीव भासत आहे. दोन्ही संघांमधील गेल्या पाच सामन्यांमध्ये मुंबई संघ चार विजयांची नोंद करण्यात यशस्वी ठरला आहे, परंतु संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने या हंगामात आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. या संघाने आपले दोन्ही सामने जिंकले असून या काळात त्यांच्या बहुतांश खेळाडूंची कामगिरी चांगली राहिली आहे.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका.
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युजवेंद्र चहल.
IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Highlights: मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२४ मधील सलग तिसरा सामना गमावला आहे. मुंबईच्या घरच्या मैदानावरील सामन्यात राजस्थानने एमआयचा ६ विकेट्सने पराभव केला.