IPL 2024 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Highlights : आयपीएल २०२४ मधील ५५ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने १६ चेंडू शिल्लक असताना सूर्याच्या शतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेट्सने पराभव केला आहे. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या शतकी भागीदारीमुळे मुंबईला विजयाची नोंद करण्यात यश आले. प्रथम खेळताना हैदराबादन संघाने १७३ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. एकवेळ २६ धावांवर मुंबईची एक विकेट पडली होती, पण पुढच्या ५ धावांत संघाने ३ विकेट गमावल्या. मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा सूर्यकुमार यादवने केल्या, ज्याने ५१ चेंडूत १०२ धावांची शतकी खेळी केली. त्याने टिळक वर्मासोबत १४३ धावांची भागीदारी केली, ज्यांच्या बॅटमधून ३२ चेंडूत २७ धावा केल्या.
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Highlights: आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांत आतापर्यंत २3 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचा दबदबा राहिला आहे. कारण मुंबईने २3 पैकी १3 सामन्यात विजय मिळवला असून हैदराबादने १० सामन्यात विजय मिळवला आहे.
मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ७ गडी राखून पराभव केला आहे. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने नाबाद शतक झळकावले. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने १७३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १७.२ षटकांतच लक्ष्य गाठले. मुंबईसाठी सूर्याने ५१ चेंडूत नाबाद १०२ धावा केल्या. त्याने १२ चौकार आणि ६ षटकार मारले. तिलक वर्माने नाबाद ३७ धावा केल्या. रोहित शर्मा ४ धावा करून बाद झाला. इशान किशन ९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेडने ४८ धावा केल्या. पॅट कमिन्सने नाबाद ३५ धावा केल्या. नितीश रेड्डीने २० धावा केल्या. यादरम्यान मुंबईकडून हार्दिक पंड्या आणि पियुष चावलाने प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. बुमराह आणि कंबोजने १-१ विकेट घेतली.
मुंबईला विजयासाठी २५ धावांची गरज आहे. संघाने १६ षटकांत ३ गडी गमावून १४९ धावा केल्या आहेत. तिलक वर्मा ३४ धावा करून खेळत आहे. सूर्यकुमार यादव ८१ धावा करून खेळत आहे. या दोघांमध्ये ११८ धावांची भागीदारी झाली.
मुंबई इंडियन्सचा तगडा फलंदाज सूर्यकुमार यादव स्फोटक कामगिरी करताना दिसत आहे. त्याने 30 चेंडूत अर्धशतक केले आहे. या मोसमातील त्याचे हे चौथे अर्धशतक आहे. त्याचबरोबर त्याचे कारकिर्दीतील हे ३४ वे अर्धशतक आहे. त्याच्यासोबतच फलंदाज तिलक वर्माही चांगली कामगिरी करत आहे. दोघांमध्ये ८८* धावांची भागीदारी आहे. १३ षटकांनंतर संघाची धावसंख्या ११९/३ आहे.
https://twitter.com/CricinfoHindi/status/1787531824803324342
मुंबई इंडियन्सची धावसंख्या १०० धावांच्या पुढे गेली आहे. संघाने १२ षटकांत ३ गडी गमावून १०५ धावा केल्या आहेत. सूर्या ४८ धावा करून खेळत आहे. तिलक वर्मा २५ धावा करून खेळत आहे. सूर्याने ५ चौकार आणि ३ षटकार मारले आहेत. मुंबईला विजयासाठी ६९ धावांची गरज आहे.
https://twitter.com/Shebas_10dulkar/status/1787531729693286883
सूर्या आणि तिलक यांच्यातील अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली. सूर्या ३२ धावा करून खेळत आहे. तिलक वर्मा १९ धावा करून खेळत आहे. मुंबईने ९ षटकांत ३ गडी गमावून ८३ धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सने ७ षटकांत ३ गडी गमावून ७४ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव ३२ धावा करून खेळत आहे. त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले आहेत. तिलक वर्मा १० धावा करून खेळत आहे.
मुंबईला विजयासाठी ९० चेंडूत १३८ धावांची गरज आहे. संघाने ५ षटकांत ३ गडी गमावून ३६ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव ४ धावा करून खेळत आहे. तिलक वर्माला अद्याप खाते उघडता आलेले नाही.
मुंबई इंडियन्सची तिसरी विकेट पडली. नमन धीर शून्यावर बाद झाला. भुवनेश्वर कुमारने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मुंबईने ४.१ षटकात ३ गडी गमावून ३१ धावा केल्या आहेत.
रोहित शर्माच्या रूपाने मुंबईला दुसरा धक्का बसला. पॅट कमिन्सने त्याला आपला बळी बनवले. त्याला केवळ चार धावा करता आल्या. सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उपलब्ध आहे. चार षटकांनंतर संघाची धावसंख्या ३१/२ आहे.
https://twitter.com/Shebas_10dulkar/status/1787519794327277792
इशान किशनने पहिल्या चेंडूपासूनच आपली फटकेबाजी सुरू केली. पहिल्या षटकातील दोन चेंडूवर चौकारासह डावाला सुरूवात केली. पण दुसऱ्या षटकात तो यान्सनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
हैदराबादने दिलेल्या १७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबईकडून रोहित-इशानची जोडी मैदानात आली आहे. इशानने पहिल्या दोन चेंडूवर चौकार लगावत सामन्याला सुरूवात केली. तर रोहितने एक चौकार लगावत पहिल्या षटकात १४ धावा केल्या.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ८ गडी गमावून १७३ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी चांगली सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी झाली. बुमराहने हैदराबादला पहिला धक्का दिला. त्याने अभिषेकला बाद केले. त्याला केवळ ११ धावा करता आल्या. तिसरा धक्का मयंक अग्रवालच्या रूपाने बसला. त्याला केवळ पाच धावा करता आल्या. यानंतर पियुष चावलाने हेडला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या सलामीवीराने सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४८ धावा केल्या.
https://twitter.com/IPL/status/1787512572775661622
त्याचबरोबर नितीश रेड्डी २०, क्लासेन दोन, जॅन्सेन १, शाहबाज १०, अब्दुल तीन धावा करू शकले. तर कमिन्स ३५ धावा करून नाबाद राहिला आणि सनवीर आठ धावा करून नाबाद राहिला. मुंबईकडून हार्दिक पंड्या आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. त्याचवेळी अंशुल कंबोज आणि जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
पियुष चावलाने हैदराबादला आठवा धक्का दिला. त्याने अब्दुल समदला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला केवळ तीन धावा करता आल्या. सनवीर सिंग दहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी पॅट कमिन्स आहे. १७ षटकांनंतर संघाची धावसंख्या १३६/८ आहे.
https://twitter.com/in_trend_today/status/1787508421043933220
हैदराबादची सातवी विकेट पडली आहे. शाहबाजनंतर जॅन्सन बाद झाला. तो १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला हार्दिक पंड्याने बाद केले. हैदराबादने १६ षटकांत ७ गडी गमावून १२५ धावा केल्या आहेत.
हार्दिक पंड्याने सनरायझर्स हैदराबादला सहावा धक्का दिला. त्याने १२० धावांच्या स्कोअरवर शाहबाज अहमदला बाद केले. त्याला केवळ १० धावा करता आल्या. अब्दुल समद आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी मार्को जॉन्सन क्रीजवर उपस्थित आहे.
पियुष चावला हा हैदराबादसाठी अडचणीचा ठरला आहे. प्रथम त्याने ट्रॅव्हिस हेडची (४८) विकेट घेतली. आता ३८ वर्षीय गोलंदाजाने हेनरिक क्लासेनला गोलंदाजी बाद केले. त्याला केवळ दोन धावा करता आल्या. शाहबाज अहमद सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. १३ षटकांनंतर संघाची धावसंख्या १०१/५ आहे.
हैदराबादची चौथी विकेट पडली. नितीश १५ चेंडूत २० धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्याने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हैदराबादने ११.१ षटकांत ४ गडी गमावून ९२ धावा केल्या आहेत. क्लासेन एका धाव घेतल्यानंतर खेळत आहे.
सनरायझर्स हैदराबादची तिसरी विकेट पडली आहे. ट्रॅव्हिस हेड ३० चेंडूत ४८ धावा करून बाद झाला. पियुष चावलाने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हैदराबादने १०.३ षटकात ९० धावा केल्या आहेत. नितीश रेड्डी १९ धावा करून खेळत आहे. क्लासेनला अद्याप खाते उघडता आलेले नाही.
https://twitter.com/swapnalikharat_/status/1787498626953912701
या सामन्यात पहिल्या विकेटसाठी अंशुलचा शोध संपला. त्याने तिसऱ्याच षटकात मयंक अग्रवालला बोल्ड केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मयंकला केवळ पाच धावा करता आल्या. नितीशकुमार रेड्डी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आले आहेत. त्याला साथ देण्यासाठी ट्रॅव्हिस हेड (४६) उपस्थित आहे. आठ षटकांनंतर संघाची धावसंख्या ७१/२ आहे.
https://twitter.com/OneCricketApp/status/1787495105655451984
जसप्रीत बुमराहने हैदराबादला पहिला धक्का दिला. सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने अभिषेक शर्माला जसप्रीत बुमराहकरवी झेलबाद केले. युवा फलंदाज आणि हेड यांच्यात पहिल्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी झाली. शर्मा ११ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यासह पॉवरप्लेही संपला. मयंक अग्रवाल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. सहा षटकांनंतर संघाची धावसंख्या ५६/१ आहे.
https://twitter.com/AnandMohanchou8/status/1787492290841452799
ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यातील अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली. हेड ३३ धावांवर, तर अभिषेक ११ धावा करून खेळत आहे. हैदराबादने ५ षटकांत बिनबाद ५१ धावा केल्या आहेत. मुंबईसाठी कंबोजने पाचवे षटक टाकले. या षटकांत त्याने ट्रॅव्हिस हेडला जीवदान दिले. कारण कंबोजने आपल्या षटकांत २ नो बॉल टाकले.
https://twitter.com/paracetamol_uff/status/1787491387790721294
मुंबई इंडियन्ससाठी जसप्रीत बुमराहने चौथे षटक टाकले. या षटकात त्याने फक्त ४ धावा दिल्या. हैदराबादने ३२ धावा केल्या आहेत. अभिषेक ११ धावा करून खेळत आहे. ट्रॅव्हिस हेड १६ धावा करून खेळत आहे. हे दोघे इतर गोलंदाजांचा चांगला समाचार घेताना दिसत आहेत.
हैदराबादने पहिल्या षटकात ७ धावा केल्या आहेत. ट्रॅव्हिस हेड एका चौकाराच्या मदतीने ४ धावा करून खेळत आहे. अभिषेक शर्मा एका धावेवर खेळत आहे. हैदराबादने चांगली सुरुवात केली आहे. मुंबईने दुसरे ओव्हर अंशुल कंबोजकडे सोपवले आहे.
https://twitter.com/InsideSportIND/status/1787485612561281409
मुंबई इंडियन्स : इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, अंशुल कंबोज, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
https://twitter.com/IPL/status/1787476309670576465
सनरायझर्स हैदराबादः अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिच क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॉन्सन, पॅट कमिन्स (क), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत सनरायझर्स हैदराबाद प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. कर्णधार हार्दिक पंड्याने सांगितले की, या सामन्यात त्यांचा संघ एका बदलाने खेळताना दिसेल. अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी मिळाली आहे.
आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांत आतापर्यंत २२ सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचा दबदबा राहिला आहे. कारण मुंबईने २२ पैकी १२ सामन्यात विजय मिळवला असून हैदराबादने १० सामन्यात विजय मिळवला आहे.
आयपीएल २०२४ चा ५५ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात ६ मे म्हणजेच सोमवारी होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना संध्याकाळी साडेसातपासून सुरु होणार आहे. नाणेफेक सात वाजता पार पडेल.
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या शेवटच्या सामन्यात वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर धावा करणे कठीण होते. फलंदाजी करणे सोपे असो वा अवघड, नाणेफेक जिंकणारा कर्णधार दव असल्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो. या मैदानावर २०० पेक्षा कमी धावसंख्येचा बचाव करणे सोपे नाही.
वानखेडे स्टेडियमवर तब्बल वर्षभरानंतर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. या मैदानावर दोन्ही संघांमधील शेवटचा सामना २१ मे २०२३ रोजी झाला होता. त्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने २० षटकात ५ विकेट गमावत २०० धावा केल्या होत्या. यानंतर मुंबई इंडियन्सने १८ षटकांत २ बाद २०१ धावा करत सामना जिंकला. सनरायझर्स हैदराबाद सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे मागील पराभवाचा बदला घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.