चेन्नई सुपर किंग्स संघाने हैदराबादवर ७८ धावांनी मोठा विजय मिळवत प्लेऑफच्या शर्यतीत मुसंडी मारली आहे. चेन्नईने या मोठ्या विजयासह गुणतालिकेत तिसरे स्थान गाठले आहे. चेन्नईने ९ पैकी ५ सामने जिंकले असून ४ सामने गमावले आहेत. त्यामुळे संघाचे सध्या १० गुण आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला १६ गुणांची आवश्यकता आहे, त्यामुळे संघासाठी पुढील सर्व सामने महत्त्वाचे असणार आहेत. पण यादरम्यानच चेन्नईला एक मोठा धक्का बसला आहे, त्यांचा महत्त्वाचा गोलंदाज पुढील मुख्य सामन्यांना मुकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएल २०२४ मध्ये बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमान हा चेन्नईसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा गोलंदाज ठरला आहे. पण मुस्तफिजूर संघाच्या पुढील सामन्यांना मुकणार आहे. याचे कारण म्हणजे बांगलादेश विरूद्ध झिम्बाब्वे टी-२० मालिका. बांगलादेशचा संघ ३ मेपासून घरच्या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी बांगलादेश आपली तयारी अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या मालिकेत खेळणार आहे.

हेही वाचा-IPL 2024: एम एस धोनीच्या नावे मोठा विक्रम, आयपीएलच्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

मुस्तफिझूर रहमान चेन्नईच्या पुढील सामन्यांमधून होणार बाहेर

बांगलादेश क्रिकेटने या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी २९ एप्रिल रोजी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये शाकिब अल हसन आणि मुस्तफिझूर रहमान हे दोन अनुभवी खेळाडू पहिल्या तीन सामन्यांसाठी घोषित केलेल्या संघाचा भाग नाहीत. जर मुस्तफिझूर संघाचा भाग नसला तरी या मालिकेसाठी तो बांगलादेशला जाणार आहे.

आयपीएलच्या १७व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान २ मे रोजी बांगलादेशला परतणार आहे. त्यानंतर फिटनेस चाचणीचा आधारे मालिकेतील शेवटच्या २ सामन्यांसाठी त्याच्या संघातील समावेशाबाबत निर्णय घेतला जाईल.

हेही वाचा- T20 World Cup साठी न्यूझीलंडकडून अनोख्या पद्धतीने संघाची घोषणा, IPL मधील ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

३ ते १२ मे दरम्यान ही टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या दरम्यान चेन्नईचे महत्त्वाचे ३ सामने खेळवले जाणार आहेत. ५ मे रोजी पंजाब किंग्सविरूद्ध, १० मे रोजी गुजरातविरूद्ध, १२ मे रोजी राजस्थानविरूद्ध, खेळवले जाणार आहेत. चेन्नईसाठी प्लेऑफच्या दृष्टीने हे महत्त्वाचे सामने असणार आहेत. त्यामुळे मुस्तफिझूरची अनुपस्थिती संघासाठी मोठा धक्का असणार आहे. मुस्तफिझूर संघात नसेल तर त्याच्या जागी महिश तीक्ष्णाला खेळवले जाते. संघातील ताळमेळही त्याच्यामुळे बिघडला जातो. विश्वचषकासाठी पासपोर्टच्या कामाकरता मुस्तफिझूर संघाबाहेर होता, तेव्हाही संघ संयोजनामध्ये चेन्नईला फटका बसला होता. मुस्तफिझूरच्या अनुपस्थितीत चेन्नई कसा मार्ग काढणार,याकडे सर्वांच्या नजरा असतील.