भारताचे माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिध्दू पुन्हा एकदा कॉमेंट्रीच्या मैदानात पुन्हा परतणार आहेत. आयपीएल २०२४ च्या हंगामात इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहे. नवजोत सिंग सिध्दू यांनी याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्येही कॉमेंट्री केली आहे. राजकारण बाजूला ठेवून नवज्योतसिंग सिद्धू इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या हंगामात समालोचन करताना दिसणार आहेत. मात्र तो बराच काळ क्रिकेट जगतापासून दूर होते. स्टार स्पोर्ट्सने या माजी क्रिकेटपटूचे कॉमेंट्री बॉक्समध्ये पुनरागमन होत असल्याचे घोषणा केली आहे. त्यामुळे नवजोत सिंग सिध्दू लोकसभा निवडणुकीपासून दूर राहणार आहेत आणि निवडणूकही लढवणार नाहीत, असे चित्र दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

– quiz

किंबहुना, ते बऱ्याच काळापासून सक्रिय राजकारणापासून दूर होते. स्टार स्पोर्ट्सने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर एक पोस्ट टाकली आहे. ज्यात त्यांनी, कॉमेंटरी बॉक्सचा सरदार परतला. असे फोटोला कॅप्शन दिले आहे.

आयपीएल २०२४ मधील समालोचकांपैकी नवज्योत सिंग सिद्धू एक असणार आहेत. त्यांची कॉमेंट्रीची खास शैली चाहत्यांना नेहमीच भावली आहे. त्यांना खेळाचे ज्ञान आहेच, पण कॉमेंट्री करत असताना मध्येच त्यांच्या कविता आणि विनोदाने ते चाहत्यांचे मनोरंजन करतात. नवजोत सिंग सिध्दू स्टार स्पोर्ट्सवर कॉमेंट्री करणार आहेत. मात्र ते इंग्रजी, हिंदी की पंजाबी कोणत्या भाषेत समालोचन करणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

नवजोत सिंग सिध्दू यांची पंजाबी आणि हिंदी कॉमेंट्री खूप प्रसिद्ध आहे. IPL 2024 च्या कॉमेंट्रीसाठी स्टार स्पोर्ट्सने अनेक विविध समालोचकांची नावे जोडली आहेत. विविध भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकण्याची संधी मिळणार आहे. पण स्टारकडे फक्त आयपीएलसाठी टीव्हीवर लाइव्ह प्रसारणाचे हक्क आहेत, त्यामुळे त्यांची कॉमेंट्री फक्त टीव्हीवरच ऐकायला मिळणार आहे. या मेगा स्पर्धेचे डिजिटल अधिकार जिओसिनेमाकडे असून तेथील कॉमेंट्री टीम वेगळी आहे.

नवज्योतसिंग सिद्धूच्या यांच्यासाठी गेला काही काळ फारच धामधुमीचा होता. त्यांनी राजकारणात प्रवेश केला खरा पण तिथे त्यांना फारसे यश मिळाले नाही. त्यासोबतच त्यांना द कपिल शर्मा शो सोडावा लागला. काही काळानंतर सर्वात धक्कादायक गोष्ट ठरली ती म्हणजे त्यांना एका प्रकरणात तुरूंगवासही झाला होता. दरम्यानच त्यांच्या पत्नीला कर्करोगाचे निदान झाल्याने त्यांना फार त्रास सहन करावा लागला होता. या खडतर प्रवासानंतर आता पुन्हा ते कॉमेंट्रीच्या मैदानात उतरणार आहेत. जिथे त्यांना खूप प्रसिध्दी मिळाली होती.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत नवज्योत सिंग सिध्दू यांना प्रश्न विचारण्यात आला की, “कॉमेंट्री बॉक्समध्ये परतण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात? तेव्हा त्यांनी उत्तर देताना सांगितले, “कॉमेंट्री माझ्या रक्तात आहे, ती माझी ओळख आहे. जसे महान गुरूंनी आम्हाला आमची पगडी दिली आणि माझी ओळख ही पगडी आहे. मी खूप भाग्यवान माणूस आहे की माझा छंद हा माझा व्यवसाय आहे. तुमच्याकडे असे लोक असतील ज्यांना क्रिकेटपटू व्हायचे होते, ते आता डॉक्टर आहेत, ज्यांना खेळाडू व्हायचे होते पण आज ते व्यवसाय करत आहेत. आपल्याला जे आवडतं, ते करण्याची फार कमी जणांना संधी मिळते. माझ्यासाठी समालोचन हे वरदान आहे. कॉमेंट्री हे जणू माझ्या घरच्या मैदानात खेळण्यासारखे आहे आणि यात मला खूप आनंदही मिळतो.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 navjot singh sidhu returns to commentry in 17th edition of indian premiere league will stay away from lok sabha election bdg