IPL 2024 Nita Ambani MI Dressing Room : आयपीएल २०२४ मध्ये कॅप्टन हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सचा लखनऊ सुपर जायंट्सने १८ धावांनी पराभव केला. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाचा शेवटही गोड झाला नाही. या सामन्यात मुंबईचा संघ २१५ धावांचे आव्हान असताना २० षटकांमध्ये १९६ धावांपर्यंतच पोहोचू शकला. शेवटच्या सामन्यातील या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे खेळाडू अतिशय निराश होत ड्रेसिंग रूममध्ये परतले. याच सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी यांनी ड्रेसिंग रूममध्ये पोहोचून निराश खेळाडूंचे सांत्वन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी वर्ल्ड कपसाठी भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूंना विशेष शुभेच्छा दिल्या. या संदर्भातील व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा