Delhi Capitals Co Owner Parth Jindal Social media post: संजू सॅमसनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ८६ धावांची शानदार खेळी केली.सॅमसनने अवघ्या ४६ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांसह ही खेळी केली. सॅमसन ज्या सीमारेषेजवळ झेलबाद झाल्याने त्यावरूनही वाद निर्माण झाला होता. संजू षटकारासाठी खेळलेला फटका शाई होपने सीमारेषेजवळ टिपला, पण त्याने ज्या पद्धतीने तो झेल टिपला ते पाहता क्षेत्ररक्षकाचा पाय सीमारेषेला स्पर्श करत असल्याचा भास होत होता. पण तिसऱ्या पंचांनी त्याला झेलबाद घोषित केले. इथे मैदानात गोंधळ सुरू होता तर तिथून दिल्लीचे मालक पार्थ जिंदालही आऊट आहे आऊट आहे. आता यानंतर पार्थ जिंदाल यांच्या सोशल मीडिया पोस्टने लक्ष वेधलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पार्थ जिंदाल यांच्या सामन्यातील प्रतिक्रियेनंतर सामना संपल्यानंतर त्यांनी संजू सॅमसन आणि राजस्थान संघाचे संघमालक यांची भेट घेतली. ज्याचा व्हीडिओ दिल्ली कॅपिटल्सने शेअर केला आहे. दिल्लीने व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “आमचे सहमालक पार्थ जिंदाल यांनी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि मालक मनोज बदाले यांची अरुण जेटली स्टेडियमवर भेट घेतली. आगामी आयसीसी पुरुषांच्या टी-२० विश्वचषकासाठी निवड झाल्याबद्दल पार्थ यांनी आरआरचा कर्णधार सॅमसनचे अभिनंदनही केले.”

पार्थ जिंदाल यांनी हा व्हिडिओ रिपोस्ट करत संजू आऊट झाल्यावर ते खूप उत्साहित का झाला हे सांगितले. पार्थ जिंदाल यांनी लिहिले की, “मनोज आणि संजू यांची भेट घेत संवाद साधून छान वाटलं, कोटलावरील संजूची तुफान फटकेबाजी अविश्वसनीय होती, संजूने आम्हा सगळ्यांनाचं चिंतेत टाकलं होतं आणि म्हणून जेव्हा तो बाद झाला तेव्हा माझी अशी प्रतिक्रिया होती. त्याला शुभेच्छा देण्याचं भाग्यही मला लाभलं. आमच्या संघातील मुलांनी मोठा विजय मिळवला.”

दिल्ली-राजस्थानच्या सामन्यात दिल्लीने दिलेल्या २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सॅमसनने केलेल्या ८६ धावांच्या खेळीनंरही रॉयल्स संघाला आठ विकेट्सवर २०१ धावाच करता आल्या. रियान पराग (२७) आणि शुभम दुबे (२५) हे चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करण्यात अपयशी ठरले. दिल्लीकडून कुलदीप यादव, मुकेश कुमार तर खलील अहमदने प्रत्येकी दोन विकेट घेतले. या विजयासह दिल्लीचे १२ सामन्यातील सहा विजयांसह १२ गुण झाले आहेत. संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर असला तरी ११ सामन्यांत १६ गुणांसह रॉयल्स संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 parth jindal explains reason behind the reaction of out hai on sanju samson wicket with social media post rr vs dc bdg