IPL 2024, Gujarat Titans vs Punjab Kings: शशांक सिंहच्या ६२ धावांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने शानदार विजय मिळवला. इम्पॅक्ट प्लेअर आशुतोष शर्मा आणि शशांक सिंह यांनी डेथ ओव्हर्समध्ये वादळी फलंदाजी करत संघाला ३ विकेट्सने विजय मिळवून दिला. पंजाब किंग्जने १ चेंडू बाकी ठेवत लक्ष्य गाठले आणि सामना ३ गडी राखून जिंकला. गुजरातने दिलेल्या २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब संघाची सुरूवात चांगली झाली नसली तरी शशांक सिंह आणि इम्पॅक्ट प्लेअर आशुतोष शर्मा यांनी संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंजाब किंग्जची १५० धावांवर आपली ६वी विकेट गमावली. यष्टिरक्षक जितेश शर्माने ८ चेंडूत २ षटकारांच्या मदतीने १६ धावा केल्या, पण तो मैदानात फार काळ टिकू शकला नाही. इम्पॅक्ट खेळाडू आशुतोष शर्माही शेवटच्या षटकात झेलबाद झाला. त्याने १७ चेंडूत ३१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. आशुतोष आणि शशांक सिंगमध्ये ७व्या विकेटसाठी २२ चेंडूत ४३ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे सामन्याला एक वेगळे वळण मिळाले. आशुतोष बाद झाल्यानंतर शशांक सिंगने संघाला विजय मिळवून देत माघारी परतला.

हेही वाचा: IPL 2024: पंजाबने ‘चुकून’ खरेदी केलेल्या शशांकची सिंगची ८ चेंडूत २१ धावांची वादळी खेळी, वाचा लिलावात नेमकं काय झालं होतं?

२०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली. कर्णधार शिखर धवन काही विशेष करू शकला नाही आणि १ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उमेश यादवने धवनला क्लीन बोल्ड केले. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात पंजाब किंग्जने दुसरी विकेट गमावली. नूर अहमदने जॉनी बेअरस्टोला क्लीन बोल्ड केले. त्याने बाद होण्यापूर्वी बेअरस्टोने १३ चेंडूत २२ धावा केल्या.

प्रभसिमरन सिंग आणि सॅम करन यांनी तिसऱ्या विकेटसाठी १६ धावांची भागीदारी केली. नूर अहमदने प्रभसिमरनला मोहित शर्माकरवी झेलबाद केले. सिमरनने २४ चेंडूत ३५ धावा केल्या. पुढच्याच षटकात अजमतुल्ला ओमरझाईने सॅम करनची विकेट घेतली. सिकंदर रझा आणि शंशाक सिंग यांनी ५व्या विकेटसाठी चांगली भागीदारी रचत होते पण मोहित शर्माने सिकंदर रझाला बाद केले. रझाने १६ चेंडूंत १५ धावा केल्या.

तत्त्पूर्वी पंजाब किंग्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने २० षटकांत १९९ धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलने ४८ चेंडूत ८९ धावांची खेळी केली. फलंदाजीने सुरूवात करताना साहा आणि गिलने पहिल्या विकेटसाठी २९ धावांची भागीदारी केली. साहा ११ धावा करत बाद झाला पण शुबमन गिल ८९ धावांची नाबाद परतला. विलियमसनने गिलला चांगली साथ देत २६ धावा केल्या पण तोही मोठी खेळी न करता झेलबाद झाला. विजय शंकरलाही ८ चेंडूत रबाडाने तंबूत धाडले. त्यानंतर आलेल्या राहुल तेवतियाने ८ चेंडूत २३ धावांची वादळी खेळी करत गिलसोबत संघाचा डाव १९९ पर्यंत नेला.

पंजाबकडून कागिसो रबाडाने २ विकेट्स मिळवल्या. त्याच्याशिवाय हरप्रीत ब्रार आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली.