आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत ६४ सामने खेळवले गेले आहेत. आता साखळी फेरीत फक्त ६ सामने बाकी आहेत आणि दोन संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर तीन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. हंगामातील ६४व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध विजय मिळवला. या विजयाचा सर्वाधिक फायदा सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्जला झाला आहे. हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्याच्या अगदी जवळ आले आहेत. प्लेऑफच्या २ जागांसाठी चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवानंतर लखनऊ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्ससाठी प्लेऑफमध्ये पोहोचणे सोपे नाही, दिल्लीचा नेट रन रेट उणे ०.३७७ आहे, त्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचणे अशक्य आहे. याचसोबत त्यांनी साखळी टप्प्यातील त्यांचे सर्व १४ सामने खेळले आहेत.

लखनऊ सुपर जायंट्स संघ आता जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतो कारण त्यांचा फक्त एक सामना बाकी आहे. पण लखनऊचा नेट रन रेट उणे ०.७८७ आहे. त्याच वेळी, सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज आधीपासूनच १४ गुणांवर आहेत आणि या दोन्ही संघांचा नेट रन रेटही चांगला आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही संघांना प्ले ऑफमध्ये पोहोचणे सोपे झाले आहे.

हेही वाचा- IPL 2024: हार्दिकला येताना पाहताच रोहित-सूर्या-तिलक उठून गेले? मुंबई इंडियन्स संघातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

दिल्लीच्या विजयाने बदललं प्लेऑफचं समीकरण

सनरायझर्स हैदराबादने या मोसमात आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. ज्यामधील ७ सामने जिंकले आहेत तर ५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर सनरायझर्स हैदराबादचे आता दोन सामने शिल्लक आहेत. सनरायझर्स हैदराबादला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी या दोनपैकी एक सामना जिंकावा लागेल. त्यांचा नेट रन रेट ०.४०६ आहे. याचा अर्थ हैदराबादला फक्त एका विजयाची गरज आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्ज १३ सामन्यांत ७ विजय आणि ५ पराभवांसह १४ गुणांवर आहे. त्यांचा नेट रन रेट ०.५२८ आहे. चेन्नई सुपर किंग्जला येथून प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागेल.

हेही वाचा – IPL 2024: दिल्लीने लखनऊवर मिळवला विजय अन् राजस्थान रॉयल्सने प्लेऑफमध्ये मारली धडक

सलग पाच विजयांसह उत्कृष्ट पुनरागमन केलेल्या प्लेऑफ गाठण्यासाठी आरसीबीला प्रथम त्यांच्या शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून १४ गुण गाठावे लागतील. नंतर आशा करावी लागेल की त्यांचा नेट रन रेट इतर संघांपेक्षा चांगला असेल. हे केवळ आरसीबीसाठी पुरेसे नाही. त्याच वेळी, सनरायझर्स हैदराबादने आपले उर्वरित दोन्ही सामने गमावले किंवा लखनऊने शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकणार नाही, अशी आशाही बाळगावी लागेल. अगदी सर्वच गोष्टी आरसीबीच्या बाजूने घडतील, याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे हैदराबाद आणि चेन्नई संघासाठी सामना जिंकत प्लेऑफ गाठणे, अधिक सोपे असणार आहे.

आतापर्यंत फक्त २ संघांना आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करता आले आहे. कोलकाता नाईट रायडर्स हा या वर्षी प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. त्याचवेळी, आता राजस्थान रॉयल्सनेही पात्रता मिळवली आहे. या दोन्ही संघांना साखळी टप्प्यातील शेवटचा सामना एकमेकांविरुद्ध खेळायचा आहे. प्लेऑफसाठीच्या उर्वरित दोन जागांवर कोण शिक्कामोर्तब करणार याकडे सर्वांच्या नजरा असतील.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 playoff scenario delhi capitals win over lucknow super giants helpful for csk and srh to qualify easily read details bdg