RR vs KKR Match abandoned due to rain : आयपीएल २०२४ चा ७० वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार होता, परंतु मुसळधार पावसामुळे तो रद्द करण्यात आला आहे. ज्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइटर्स या दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ गुण देण्यात आले. ज्यामुळे राजस्थान रॉयल्सचे मोठे नुकसाने झाले आहे. कारण आता राजस्थान रॉयल्सचे १७ गुण झाले असून टॉप -२ मधून बाहेर पडला आहे. हा सामना रद्द झाल्याचा फायदा सनरायझर्स हैदराबाद संघाला झाला आहे. कारण तो संघ टॉप-२ मध्ये दाखल झाला आहे. अशा प्रकारे प्लेऑफ्सचे समीकरण स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणाच सामना कोणाविरुद्ध होणार जाणून घेऊया.

केकेआर आणि एसआरचमध्ये रंगणार पहिला क्वालिफायर सामना –

आयपीएल २०२४ मधील प्लेऑफ्सचे चार संघ निश्चित झाले आहेत, ज्यामध्ये अनुक्रमे कोलकात नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघांचा समावेश आहे. पॉइंट टेबलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघ पहिल्या स्थानावर आहे. या संघाचे २० गुण आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता पहिल्या क्वालिफायरमध्ये केकेआर संघाचा सामना हैदराबाद संघाशी होणार आहे. हा सामना २१ मे रोजी अहमदाबादच्या मैदानावर होणार आहे. जो संघ पहिला क्वालिफायर जिंकेल तो थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. त्या पराभूत संघाला आणखी एक संधी मिळेल.

आरआर आणि आरसीबी संघात रंगणार एलिमिनेटर सामना –

राजस्थान रॉयल्स संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. या दोन संघांमधील एलिमिनेटर सामना २२ मे रोजी अहमदाबादच्या मैदानावर होणार आहे. या सामन्यात जो संघ हरेल, त्या आयपीएल २०२४ मधील त्याचा प्रवास संपणार आहे. यानंतर एलिमिनेटरचा विजेता संघ आणि क्वालिफायर-१ मधील पराभूत संघ क्वालिफायर-२ मध्ये आमनेसामने येतील. या सामन्यातील विजेता संघ क्वालिफायर-१ मधील विजेत्याशी फायनलमध्ये भिडेल. हा सामना २६ मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल.

हेही वाचा – IPL 2024 : ‘आता तुला कसं वाटतयं आई?’, आरसीबीला विजय मिळवून दिल्यानंतर यश दयाल व्हिडीओ कॉलवर भावूक

शेवटचा साखळी सामना पावसामुळे रद्द –

आयपीएल २०२४ चा ७० वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार होता, परंतु मुसळधार पावसामुळे तो रद्द करण्यात आला आहे. ज्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइटर्स या दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ गुण देण्यात आले. ज्यामुळे राजस्थान रॉयल्सचे मोठे नुकसाने झाले आहे. कारण आता राजस्थान रॉयल्सचे १७ गुण झाले असून टॉप -२ मधून बाहेर पडला आहे. हा सामना रद्द झाल्याचा फायदा सनरायझर्स हैदराबाद संघाला झाला आहे. कारण तो संघ टॉप-२ मध्ये दाखल झाला आहे.

हेही वाचा – RCBच्या विजयानंतर बेभान झालेल्या चाहत्यांचे गैरवर्तन, CSKच्या फॅन्सशी धक्काबुक्की केल्याचा VIDEO व्हायरल

राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का –

आयपीएल २०२४ च्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर, केकेआर सोबतचा सामना रद्द झाल्यामुळे राजस्थान रॉयल्सला खूप नुकसान सहन करावे लागले आहे. रविवारीच सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा ४ गडी राखून पराभव करत १७ गुण मिळवले. अशा परिस्थितीत, राजस्थान रॉयल्सला टेबलच्या टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्यासाठी केकेआरविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक होते. कारण कोलकात्याविरुद्धच्या विजयामुळे राजस्थानला १८ गुण मिळाले असते आणि त्यांचा संघ थेट क्वालिफायर १ मध्ये पोहोचला असता. पण सामना रद्द झाल्यामुळे आता राजस्थानचे १७ गुण झाले आहेत, परंतु त्याचा नेट रन रेट हेदराबादपेक्षा कमी आहे. आता टेबलमध्ये टॉप-२मध्ये स्थान मिळविणाऱ्या संघांना फायनलमध्ये पोहोचण्याच्या २ संधी मिळतात.

हेही वाचा – IPL 2024 : महिनाभर पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या RCB चा ‘विजयी’ षटकार, ‘या’ ५ खेळाडूंनी पालटले नशीब

आयपीएल २०२४च्या प्लेऑफ वेळापत्रक:

क्वालिफायर-१: केकेआर विरुद्ध एसआरएच, २१ मे, अहमदाबाद
एलिमिनेटर: आरसीबी विरुद्ध आरआर, २२ मे, अहमदाबाद
क्वालिफायर -२: क्वालिफायर १ पराभूत वि एलिमिनेटर विजेता, २४ मे, चेन्नई
फायनल – क्वालिफायर १ विजेता विरुद्ध क्वालिफायर २ विजेता ,२६ मे, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई,

Story img Loader