Prithvi Shaw Gulabi Saree Song Video: “गुलाबी साडी आणि लाली लाल लाल…” हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. सध्या सगळीकडेच गाजत असलेल्या या गाण्याने आयपीएलमधील ही प्रवेश केला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉचा या गाण्यावरील व्हीडिओ व्हायरल होत आहे. दिल्ली कॅपिटल्सने स्वत हा व्हीडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पृथ्वी शॉ दिल्लीच्या संघासोबत प्रवास करताना आणि फोटोशूट करतानाचा हा व्हीडिओ आहे. शॉ या गाण्यावर थिकरतानाही दिसला. शॉ प्रवासामध्ये गाणं ऐकत असतो आणि तेव्हाच त्याला व्हीडिओ शूट करणारा सहकारी विचारतो, तू कुठलं गाणं ऐकतो आहेस? शॉ उत्तर देताना म्हणाला, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल…आणि हे गाणं सांगतानाही तो त्या गाण्याची स्टेप करताना दिसला. यानंतर त्याचे फोटोशूटचे काही फोटोस यामध्ये आहेत, त्यावेळेसही या गाण्यावरचे स्टेप्स तो करताना दिसत आहे. दिल्लीने शेअर केलेल्या या व्हीडिओवर अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. शॉचा हा व्हीडिओही चांगला व्हायरल झाला आहे.

यंदा पृथ्वी शॉ चांगल्या फॉर्मात असून दिल्लीसाठी तो सातत्याने धावा करत आहे. शॉने ४ सामन्यांमध्ये एकूण १५१ धावा केल्या आहेत, यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १६०च्या आसपास राहिला आहे. शॉ यंदा सातत्याने धावा करत असून तो फॉर्मात परतला आहे. दिल्ली कॅपिटल्सची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. दिल्लीने आतापर्यंत ६ सामन्यांपैकी फक्त २ सामने जिंकले आहेत, तर ४ सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. दिल्लीचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना आता बुधवारी गुजरात टायटन्स विरूध्द होणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 prithvi shaw gulabi sadi reel goes viral delhi capitlas bdg