गुवाहाटी : अव्वल दोन संघांतील स्थान निश्चित करण्यासाठी उत्सुक असलेल्या राजस्थान रॉयल्ससमोर ‘आयपीएल’ क्रिकेटच्या सामन्यात आज, बुधवारी पंजाब किंग्जचे आव्हान असेल. गुवाहाटी (आसाम) येथे होणाऱ्या या सामन्यात राजस्थान संघाचा फलंदाज रियान परागच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष राहील. रियान मूळचा आसामचा आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
राजस्थानचा संघ सध्या १६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. त्यांनी उर्वरित दोनही सामने जिंकल्यास त्यांचे अव्वल दोनमधील स्थान निश्चित होईल. राजस्थानच्या संघाला पंजाबनंतर गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघाशी खेळावे लागणार आहे. त्याआधीच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या पंजाबला नमवण्याचा राजस्थानचा प्रयत्न असेल.
● वेळ : सायं. ७.३० वा.
● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा अॅप
First published on: 15-05-2024 at 05:10 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 rajasthan royals vs punjab kings match predictions zws