IPL 2024 CSK vs GT: रवींद्र जडेजा सोशल मिडियावर सक्रिय असतो. त्याच्या पोस्ट, फोटो, व्हीडिओ व्हायरल असतात. पण आता जडेजाची एक कमेंट व्हायरल झाली आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिच्यामागे जडेजाचा फोटो आहे. या फोटोवरील जडेजाची कमेंट भन्नाट आहे. याचसोबत आज चेन्नई सुपर किंग्सचा सामना गुजरात टायटन्सविरूध्द खेळवला जात आहे.

रिवाबाने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला होता, या फोटोच्या मागे चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीमधील जडेजाचा फोटो होता. त्या फोटोवर कमेंट करताना जडेजाने लिहिले की, ‘माझा हुकूम आहे, लवकर इकडे ये.’ रिवाबाने टी-शर्ट घातला होता, ज्यावर ‘हुकुम’ असे लिहिले आहे. जडेजाच्या कमेंटवर लाईक्सचा चाहत्यांनी पाऊस पाडला आहे. रिवाबाही आयपीएलमधील सीएसकेचे सामने पाहायला येतात. रिवाबा जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत. गेल्या वर्षी चेन्नईने आयपीएलचे पाचवे जेतेपद जिंकले तेव्हा रिवाबा धोनीच्या पाया पडताना दिसली होती.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Ravindra Jadeja Comment on Wife Rivaba Post
पत्नी रिवाबाच्या पोस्टवरील जडेजाची कमेंट व्हायरल

जडेजा गेल्या अनेक हंगामापासून चेन्नई सुपर किंग्स संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. २०२३ मध्ये, जडेजानेच शेवटच्या चेंडूवर चौकार मारून चेन्नईला चॅम्पियन बनवले आणि त्यानंतर धोनीने त्याला मिठी मारत उचलून घेतले होते, या प्रसंगाचा फोटो, व्हीडिओ व्हायरल झाला होता.

आज चेन्नईच्या घरच्या मैदानावर सीएसकेचा सामना गुजरातविरूध्द होत आहे. गुजरातने सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईकडून सलामीवीर रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड यांनी तुफान फटकेबाजी करत चांगली सुरूवात करून दिली. या दोघांनीही पॉवरप्लेमध्ये ६९ धावा केल्या. रचिन रवींद्र २० चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांसह शानदार ४६ धावा करत बाद झाला.

Story img Loader