Ravindra Jadeja out obstructing the field : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ६१ व्या सामन्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी फलंदाज रवींद्र जडेजा विचित्र पद्धतीने धावबाद झाला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या त्याच्या एका मोठ्या चुकीमुळे संघाचे मोठे नुकसान झाले. धावांचा पाठलाग करताना १६व्या षटकातील पाचव्या चेंडूवर तो धावबाद झाला. त्याच्या रनआउटने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. त्यामुळे रवींद्र जडेजाला आऊट घोषित करण्यात आलेला नियम काय होता, जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवींद्र जडेजा कसा आऊट झाला?

रवींद्र जडेजाने आवेश खानचा चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने खेळला. यानंतर त्यांचा ऋतुराज गायकवाडसोबत धाव घेताना ताळमेळ नीट भसला नाही आणि जडेजा अडचणीत आला. त्याला दुसरी धाव घ्यायची होती, पण ऋतुराजने त्याला माघारी पाठवले. दरम्यान, यष्टीरक्षक संजू सॅमसनने नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो केला. चेंडू स्टंपऐवजी जडेजाच्या पाठीवर लागला. तो स्टंपसमोर होता. अंपायरनी जडेजाची चूक असल्याचे सांगून त्याला ‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’ नियमानुसार धावबाद घोषित केले, ज्यानंतर जडेजा निराश दिसला आणि त्याने अंपारशी चर्चा केली. मात्र अंपायर आपल्या निर्णयवार ठाम राहिले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

काय आहे ‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’ नियम?

मेरीलेबोन क्रिकेट क्लब या क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या संस्थेने ‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’ नियम खेळाडूंना आऊट घोषित करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. लॉर्ड्स क्रिकेटच्या वेबसाइटवर नियम ३७ मध्ये याचा उल्लेख आहे. नियम ३७.१.१ नुसार, कोणताही फलंदाज जेव्हा चेंडू खेळल्यानंतर, तो विरोधी संघाच्या क्षेत्ररक्षकांच्या कामात जाणीवपूर्वक अडथळा आणतो, तेव्हा तो क्षेत्ररक्षणात अडथळा आणतो. जर त्याने आपल्या शब्दातून किंवा कृतीतून असे केले, तर त्याला घोषित केले जाते.

हेही वाचा – CSK vs RR : विजयासह चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेऑफ्सच्या आशा कायम, राजस्थान रॉयल्सचा सलग तिसरा पराभव

आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा हे घडलं –

आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा ‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’ नियमानुसार फलंदाज बाद झाला आहे. जडेजापूर्वी २०१३ मध्ये युसूफ पठाण आणि २०१९ मध्ये अमित मिश्रा अशाप्रकारे बाद झाले होते. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना युसूफ पठाण रांचीमध्ये पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याने बाद झाला होता. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्ससाठी अमित मिश्रा २०१९ मध्ये विशाखापट्टणममध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध या नियमानुसार बाद झाला होता.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 ravindra jadeja given out obstructing the field during csk vs rr match video viral vbm