विल जॅक्सचे शतक आणि कोहलीच्या विराट फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने गुजरातवर ४ षटके आणि ९ विकेट्स राखून मोठा विजय मिळवला. अखेरच्या चेंडूवर मोठा षटकार खेचत विल जॅक्सने आपले शतक पूर्ण केले. गुजरातने दिलेल्या २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट आणि विल जॅक्सच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन केले. आरसीबी संघाने १६ षटकांत १ गडी गमावून २०६ धावा केल्या. अवघी एक विकेट गमावत आरसीबीने मिळवलेल्या या विजयानंतर गुणतालिकेत २ गुण मिळवले आहेत.

विराट कोहली आणि विल जॅक्सची जोडी शेवटपर्यंत नाबाद राहिली. विराटने ४४ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या जोरावर ७० धावा केल्या. तर शतकी कामगिरी केलेल्या विल जॅक्सने ४१ चेंडूत १० षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने १०० धावा पूर्ण केल्या. विल जॅक्सची विराटला मिळालेली साथ महत्त्वपूर्ण ठरली. या दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी १६६ धावांची भागीदारी केली. तर संघाला चांगली सुरूवात करून देणाऱ्या फाफ डू प्लेसिसने १२ चेंडूत ३ षटकार आणि एका चौकारासह २४ धावा करत साई सुदर्शनच्या गोलंदाजीवर बाद झाला.

Virat Kohli poor batting average in 2024
Virat Kohli : विराट कोहलीच्या संपूर्ण कारकिर्दीत जे घडलं नव्हतं, ते २०२४ मध्ये घडलं; नक्की काय झालं? जाणून घ्या
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Virat Kohli Viral Video in IND vs NZ 2nd Test Match at Pune
Virat Kohli : विराट कोहलीने आऊट झाल्यानंतर रागाच्या भरात असं काही केलं की… VIDEO होतोय व्हायरल
Virat Kohli worst shot of his career against Mitchell Santner video viral
Virat Kohli : विराट कोहली फुलटॉसवर त्रिफळाचीत; चाहते अवाक, सोशल मीडियावर चर्चेला उधाण,VIDEO व्हायरल
Virat Kohli New Records in IND vs NZ 1st Test Match
Virat Kohli : विराट कोहलीने घडवला इतिहास! भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
Virat Kohli completes 9000 Test runs fourth Indian to record feat with Amazing Fifty in IND vs NZ
Virat Kohli: किंग कोहलीची कसोटीमध्ये ‘विराट’ कामगिरी, तेंडुलकर-द्रविड यांच्यानंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला चौथा भारतीय फलंदाज
IND vs NZ 1st Test Updates Tim Southee left former India opener Virender Sehwag
IND vs NZ : टिम साऊदीने स्फोटक खेळीच्या जोरावर मोडला वीरेंद्र सेहवागचा मोठा विक्रम, बंगळुरुमध्ये केला ‘हा’ खास पराक्रम
Rohit Sharma Reveals Virat Kohli Took Responsibility of Batting At No 3 in IND vs NZ Bengaluru Test
IND vs NZ: “विराटला ही जबाबदारी…”, कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला का पाठवलं? रोहित शर्माने केला मोठा खुलासा

तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २०० धावा केल्या. फलंदाजी करताना गुजरातची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. वृध्दिमान साहा अवघ्या ५ धावा करत बाद झाला, तर शुबमन गिलही अपयशी ठरला. त्याने १९ चेंडूत एका चौकारासह केवळ १६ धावा केल्या आणि मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या भारताच्या युवा फलंदाजांनी गुजरातला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. साई सुदर्शन आणि शाहरूख खान यांनी मधल्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली.

साई सुदर्शनने शेवटपर्यंत नाबाद राहत ४९ चेंडूत ४ षटकार आणि ८ चौकारांसह ८४ धावा केल्या. तर शाहरूखने आयपीएलमधील आपले पहिले अर्धशचतक झळकावत ३० चेंडूत ५ षटकार आणि ३ चौकारांसह ५८ धावा केल्या. सिराजच्या घातक वेगवान चेंडूवर शाहरूख क्लीन बोल्ड झाला नसता तर त्याने अजून काही धावांची नक्कीच भर घातली असती. यानंतर आलेल्या डेव्हिड मिलरने साई सुदर्शनला चांगली साथ देत १९ चेंडूत २६ धावा केल्या.