IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings Highlights : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२४ च्या ६८ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा २७ धावांनी पराभव करून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले. प्लेऑफसाठी पात्र ठरणारा आरसीबी हा चौथा संघ ठरला. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात प्रथम खेळताना आरसीबीने २० षटकांत ५ गडी गमावून २१८ धावा केल्या होत्या. यानंतर प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी बंगळुरूला चेन्नईला २०० धावांवर रोखायचे होते. म्हणजेच प्लेऑफ्समध्ये जाण्यासाठी आरसीबीला हा सामना १८ धावांनी जिंकावा लागणार होता. मात्र, आरसीबीने सीएसकेला १९१ धावांवर रोखत २७ धावांनी विजय मिळवला.

Live Updates

Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings Highlights : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ ३३ वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यापैकी २१ सामन्यात धोनीच्या सीएसकेने आणि ११ सामन्यात विराटच्या आरसीबीने बाजी मारली आहे. त्याचबरोबर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.

00:13 (IST) 19 May 2024
RCB vs CSK : आरसीबीने सीएसकेचा २७ धावांनी पराभव करत प्लेऑफ्समध्ये मारली दमदार एन्ट्री

'करा या मरो'च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा २७ धावांनी पराभव केला. यासह आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. प्रथम खेळताना आरसीबीने २० षटकांत ५गडी गमावून २१८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जला ७ विकेट्सवर केवळ १९१ धावा करता आल्या.

https://twitter.com/RCBTweets/status/1791904821576094021

लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला चांगली सुरुवात करता आली नाही. डावाच्या पहिल्याच चेंडूवर संघाने कर्णधार ऋतुराज गायकवाडची विकेट गमावली होती. त्यानंतर लवकरच संघाला आणखी एक धक्का बसला. पण, तिसऱ्या विकेटसाठी रचिन रवींद्र आणि अजिंक्य रहाणे यांनी ६६ (४१ चेंडू) धावांची भागीदारी करून संघाला स्थैर्य मिळवून दिले, मात्र त्यानंतर संघाला स्थैर्य मिळवून देता आले नाही. जडेजा आणि धोनीने सातव्या विकेटसाठी ६१ धावांची (२७ चेंडू) भागीदारी करून संघाला पुन्हा विजयाच्या जवळ आणले होते. मात्र ,तरी शेवटी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

23:53 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : प्लेऑफ्ससाठी १२ चेंडूत ३५ धावांची गरज

18 षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 166 धावा आहे. चेन्नईला विजयासाठी 13 चेंडूत 53 धावा करायच्या आहेत आणि प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी 35 धावा करायच्या आहेत. रवींद्र जडेजा 17 चेंडूत 31 तर एमएस धोनी सात चेंडूत 13 धावांवर खेळत आहे.

23:48 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : धोनी-जडेजाने सावरला चेन्नईचा डाव

17 षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या 6 विकेटवर 151 धावा आहे. चेन्नईला विजयासाठी 18 चेंडूत 68 धावा करायच्या आहेत आणि प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी 49 धावा करायच्या आहेत. रवींद्र जडेजा 12 चेंडूत 18 तर एमएस धोनी सहा चेंडूत 7/12 धावांवर खेळत आहे.

https://twitter.com/oldschoolrizz/status/1791894857986060307

23:36 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : चेन्नईची सहावी विकेट पडली

चेन्नई सुपर किंग्जने 15 व्या षटकात 129 धावांवर सहा विकेट गमावल्या. चेन्नईला विजयासाठी 30 चेंडूत 90 धावा आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी 71 धावा करायच्या आहेत. रवींद्र जडेजा आणि एमएस धोनी क्रीजवर आहेत.

https://twitter.com/SwapnilPan63015/status/1791892673152045496

23:27 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : चेन्नईला पाचवा धक्का बसला

शिवम दुबेच्या रूपाने चेन्नईला पाचवा धक्का बसला. त्याला केवळ सात धावा करता आल्या. त्याला कॅमेरून ग्रीनने लॉकी फर्ग्युसनच्या हाती झेलबाद केले. मिचेल सँटनर सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी रवींद्र जडेजा क्रीजवर उपस्थित आहे. 14 षटकांनंतर संघाची धावसंख्या 125/5 आहे.

https://twitter.com/CricketGhostly/status/1791889683162730884

23:22 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : रचिन रवींद्र ६१ धावा करून रन आऊट

रचिन रवींद्र ६१ धावा करून धावबाद झाला. दोन धावांच्या लोभापायी तो बाद झाला. रवींद्र जडेजा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी शिवम दुबे उपस्थित आहेत.

https://twitter.com/ShamimCricSight/status/1791889402152567047

23:21 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : रचिनने ३१ चेंडूत अर्धशतक ठोकले

रचिन रवींद्रने या सामन्यात 31 चेंडूत षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. या मोसमातील त्याचा हा पहिला षटकार होता. संपूर्ण मोसमात तो खेळला नाही, पण या महत्त्वाच्या सामन्यात त्याने अप्रतिम फलंदाजी करुन दाखवली आहे.

23:10 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : ग्लेन मॅक्सवेलने आपल्या षटकात फक्त ४ धावा दिल्या

ग्लेन मॅक्सवेलने 11व्या षटकात केवळ चार धावा दिल्या. मॅक्सवेलचा चेंडू खूप फिरत आहे. 12 षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 91 धावा आहे. रचिन रवींद्र 29 चेंडूत 41 धावांवर खेळत आहे. त्याने 4 चौकार आणि एक षटकार मारला आहे. शिवम दुबे 9 चेंडूत 4 धावांवर खेळत आहे.

23:04 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : अजिंक्य रहाणे ३३ धावा करून बाद

अजिंक्य रहाणेने या सामन्यात 33 धावांची खेळी खेळली आणि तो बाद झाला. फर्ग्युसनच्या चेंडूवर डुप्लेसिसने त्याचा झेल टिपला. त्याने रचिनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 66 धावांची चांगली भागीदारी केली. आता शिवम दुबे फलंदाजीसाठी क्रीझवर आला आहे.

https://twitter.com/Shashwa51960283/status/1791883329626620379

22:58 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : रचिन आणि रहाणे यांच्यात अर्धशतकी भागीदारी

आतापर्यंत रचिन आणि रहाणे यांच्यात 34 चेंडूत 59 धावांची भागीदारी झाली आहे. सीएसके संघाने 8 षटकात 2 बाद 78 धावा केल्या आहेत. रहाणे सध्या 31 तर रचिन रवींद्र 39 धावांसह खेळत आहे.

https://twitter.com/Shashwa51960283/status/1791883329626620379

22:45 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : अजिंक्य-रचिनने सावरला चेन्नई सुपर किंग्जचा डाव

अजिंक्य रहाणे आणि रचिन रवीद्रने चेन्नई सुपर किंग्ज संघांची पडझड थांबवली आहे. त्यामुळे सीएसके संघाने 6 षटकात 2 बाद 58 धावा केल्या आहेत. यश दयालने 2 षटकात 22 धावा देत एक विकेट घेतली. रचिन रवींद्र 16 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 23 धावांवर खेळत आहे.अजिंक्य रहाणे 13 चेंडूत 22 धावांवर खेळत आहे. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.

https://twitter.com/Mahesh_jnv10/status/1791880199308792155

22:27 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : दोन षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या १ बाद १९ धावा

दोन षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या 19/1 आहे. मोहम्मद सिराजने बेंगळुरूसाठी दुसरे षटक टाकले, ज्यामध्ये 7 धावा आल्या. चेन्नईकडून रचिन रवींद्रने 7 चेंडूत 10 धावा आणि डॅरिल मिशेलने 4 चेंडूत 4 धावा केल्या.

22:16 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : पहिल्याच चेंडूवर चेन्नईला धक्का, कर्णधार गायकवाड गोल्डन डकवर बाद

डावाच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या रूपाने चेन्नई सुपर किंग्जने पहिली विकेट गमावली. बंगळुरूसाठी डावाचे पहिले षटक टाकणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने गायकवाडला खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आता डॅरिल मिशेल फलंदाजीला आला आहे.

22:03 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : बंगळुरूने चेन्नईला दिले २१९ धावांचे लक्ष्य

'करो या मरो' या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 4 गडी गमावून 218 धावा केल्या. आता आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला 200 धावांच्या आत मर्यादित ठेवावे लागेल. आरसीबीसाठी विराट कोहलीने 29 चेंडूत 47 धावा, फाफ डू प्लेसिसने 39 चेंडूत 54 धावा, रजत पाटीदारने 23 चेंडूत 41 धावा आणि कॅमेरून ग्रीनने 17 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या. मिचेल सँटनर वगळता चेन्नईच्या सर्व गोलंदाजांची धुलाई झाली.

https://twitter.com/RCBTweets/status/1791866743746420873

21:53 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : दिनेश कार्तिक सहा चेंडूत १४ धावा करून बाद

19व्या षटकात 18 धावा आल्या आणि एक विकेट पडली. दिनेश कार्तिक सहा चेंडूत 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. 19 षटकांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धावसंख्या 3 बाद 205 धावा. कॅमेरून ग्रीन 16 चेंडूत 37 धावांवर खेळत आहे. त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. ग्लेन मॅक्सवेल एका चेंडूत चार धावांवर आहे.

https://twitter.com/abhaysaw2604/status/1791867020402733235

21:45 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : पाटीदार 41 धावा करून बाद झाला

रजत पाटीदारच्या रूपाने आरसीबीला तिसरा धक्का बसला. तो शार्दुल ठाकूरकरवी डॅरिल मिशेलच्या हाती झेलबाद झाला. पाटीदार 41 धावांची तुफानी इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात त्याने कॅमेरून ग्रीनसोबत 71 धावांची भागीदारी केली. दिनेश कार्तिक पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. 18 षटकांनंतर संघाची धावसंख्या 187/3 आहे.

https://twitter.com/mustafamasood0/status/1791864142053220839

21:40 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : पाटीदार अर्धशतकाच्या जवळ पोहोचला

शार्दुल ठाकूरने 17 वे षटक टाकले. या षटकात दोन षटकार मारले गेले. 17 षटकांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 171 धावा आहे. रजत पाटीदार 22 चेंडूत 41 धावांवर खेळत आहे. त्याने 2 चौकार आणि 4 षटकार मारले आहेत. कॅमेरून ग्रीन 12 चेंडूत 23 धावांवर खेळत आहे. त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.

21:31 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : कॅमेरून ग्रीनला मिळाले जीवदान

16 षटकांनंतर बंगळुरूची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 155 धावा आहे. रजत पाटीदार 17 चेंडूत 28 धावांवर खेळत आहे. त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. तर कॅमेरून ग्रीन आठ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने ११ धावांवर खेळत आहे. या दरम्यान कॅमेरूनला एक जीवदान मिळाले. त्याचा सीमारेषेवर ऋतुराज गायकवाडने झेल सोडला

https://twitter.com/NewsTamilTV24x7/status/1791861513419940121

21:21 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : सिमरजीतच्या षटकात आल्या १९ धावा

सिमरजीत सिंगने 14 वे षटक टाकले. या षटकात एकूण 19 धावा झाल्या. 14 षटकांनंतर बंगळुरूची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 132 धावा आहे. रजत पाटीदार 13 चेंडूत 22 धावांवर खेळत आहे. त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. तर कॅमेरून ग्रीन तीन चेंडूत सहा धावांवर खेळत आहे.

21:14 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : फाफ डू प्लेसिस अर्धशतक झळकावल्यानंतर धावबाद

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 13 षटकांत 2 बाद 113 धावा केल्या आहेत. फॅफ डुप्लेसिस 39 चेंडूत 54 धावा करून धावबाद झाला. रजत पाटीदारने सरळ शॉट खेळला. चेंडू सँटनरच्या हाताला लागून स्टंपला लागला. डुप्लेसिस धावबाद झाला. रजत पाटीदार 11 धावा करून क्रीजवर. कॅमेरून ग्रीन हा नवा फलंदाज आहे.

https://twitter.com/xAbhinavMishra/status/1791857215692845180

21:04 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : फाफ डू प्लेसिसने झळकावले अर्धशतक

फाफ डू प्लेसिसने 35 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. बेंगळुरूच्या धावांचा वेग पुन्हा वाढला आहे. 12 षटकांनंतर बेंगळुरूची धावसंख्या एका विकेटवर 108 धावा आहे. फाफ डू प्लेसिस 36 चेंडूत 51 धावांवर खेळत आहे. तर रजत पाटीदार सात चेंडूत एका षटकारासह 9 धावांवर खेळत आहे.

https://twitter.com/Tolaramgodara2/status/1791854589849063821

20:56 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : आरसीबीची पहिली विकेट पडली

मिचेल सँटनरने आरसीबीला पहिला धक्का दिला. त्याने 10व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विराट कोहलीला झेलबाद केले. या सामन्यात किंग कोहली 47 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 162.06 च्या स्ट्राईक रेटने तीन चौकार आणि चार षटकार मारले. धडाकेबाज फलंदाज आणि फाफ डुप्लेसिस यांच्यात पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी झाली. रजत पाटीदार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

https://twitter.com/AnitaSisodiya16/status/1791852829998829740

20:47 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : आठ षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या बिनबाद 60 धावा

8 षटकांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धावसंख्या एकही विकेट न पडता 60 धावा आहे. विराट कोहली 22 चेंडूत 32 धावांवर खेळत आहे. त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. फाफ डू प्लेसिस 27 चेंडूत 28 धावांवर खेळत आहे. त्याच्या बॅटमधून दोन चौकार आणि एक षटकार आला.

https://twitter.com/AnilKumarMev1/status/1791850594321498408

20:41 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : पावरप्लेच्या समाप्तीनंतर आरसीबीची धावसंख्या बिनबाद ४२ धावा

6 षटकांनंतर बेंगळुरूची धावसंख्या एकही विकेट न गमावता 42 धावा आहे. विराट कोहली 15 चेंडूत 22 धावांवर खेळत आहे. त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. तर फाफ डु प्लेसिस 21 चेंडूत 19 धावांवर खेळत आहे. त्याच्या बॅटमधून दोन चौकार आणि एक षटकार आला.

https://twitter.com/nammateamrcb/status/1791848895275991223

20:35 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : आरसीबीच्या धावांचा वेग थांबला

पावसानंतर खेळ सुरू झाल्यापासून जणू आता हा सामना वेगळ्याच खेळपट्टीवर खेळवला जात आहे. शेवटच्या दोन षटकांत केवळ सहा धावा झाल्या. 5 षटकांनंतर बेंगळुरूची धावसंख्या एकही विकेट न पडता 37 धावा आहे.

20:33 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : पावसानंतर पुन्हा सामना सुरू, विराट-डुप्लेसिस क्रीजवर उपस्थित

पाऊस थांबला असून पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. आरसीबी संघाने 4 षटकानंतर 35 धावा केल्या आहेत. फाफ डू प्लेसिस 13 धावा करून आणि विराट कोहली 21 धावा करून क्रीजवर आहे.

20:23 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : सामना कधी सुरू होणार?

चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पाऊस थांबला असून मैदानातील कव्हर्स काढले आहेत. पंचांनी मैदानाची पाहणी केली आणि रात्री 8.25 वाजता सामना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

https://twitter.com/crickexpress24/status/1791844478229282860

20:14 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : बंगळुरूमध्ये पाऊस थांबला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना पावसामुळे थांबवावा लागला होता. मात्र, बंगळुरूमधून आनंदाची बातमी आहे, पाऊस थांबला आहे. मैदानातून कव्हर्स काढले गेले आहेत. सुपर सॉपरचा वापर केला जात आहे. बंगळुरूने 3 षटकांत बिनबाद 31 धावा केल्या आहेत. विराट कोहली 9 चेंडूत 19 धावा करून क्रीजवर आहे आणि फॅफ डुप्लेसिस 9 चेंडूत 12 धावा केल्यानंतर क्रीजवर आहे.

https://twitter.com/Its_Parhan/status/1791842174952227109

20:11 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : विराटचा गगनचुंंबी षटकार स्टेडियमच्या छताला लागला

तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विराटने 'नो लुक' षटकार मारला. जेव्हा तुषार देशपांडे विकेटवर चेंडू टाकण्यासाठी आला तेव्हा विराटने डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने लहान लांबीच्या चेंडूवर षटकार मारला की चेंडू स्टेडियमच्या छताला लागला. ज्याची लांबी 98 मीटर होती. कोहलीचा हा नो सिक्स पाहून कर्णधार फाफ डु प्लेसिस अवाक झाला. एमएस धोनीही बॉलकडे पाहत राहिला. कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासह चाहतेही आनंदी दिसले.

https://twitter.com/IPL/status/1791837059428323554

19:50 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : पावसामुळे खेळ थांबला

3 षटकांचा खेळ सुरू असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. सध्या खेळ थांबवला आहे. आतापर्यंत ३ षटके खेळली गेली आहेत, ज्यामध्ये आरसीबीने बिनबाद 31 धावा केल्या आहेत. विराट कोहली 9 चेंडूत 19 तर ​​प्लेसिस 9 चेंडूत 12 धावांवर खेळत आहे. कोहलीने दोन षटकार आणि एक चौकार लगावला आहे. प्लेसिसच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार आला.

https://twitter.com/harshraj5056/status/1791836238569414941

IPL 2024 Highlights, RCB vs CSK : आयपीएल २०२४ मधील ६८वा सामना बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला.या सामन्यात रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने आले होते. दोन्ही संघांसाठी प्लेऑफ्सच्या दृष्टीने विजय महत्त्वाचा असल्याने दिग्गज खेळाडूंसाठी हा सामना प्रतिष्ठेचा होता. ज्यामध्ये विराटच्या आरसीबीने २७ धावांनी सीएसकेचा पराभव करत प्लेऑफ्समध्ये दमदार एन्ट्री मारली.