IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings Highlights : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२४ च्या ६८ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा २७ धावांनी पराभव करून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले. प्लेऑफसाठी पात्र ठरणारा आरसीबी हा चौथा संघ ठरला. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात प्रथम खेळताना आरसीबीने २० षटकांत ५ गडी गमावून २१८ धावा केल्या होत्या. यानंतर प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी बंगळुरूला चेन्नईला २०० धावांवर रोखायचे होते. म्हणजेच प्लेऑफ्समध्ये जाण्यासाठी आरसीबीला हा सामना १८ धावांनी जिंकावा लागणार होता. मात्र, आरसीबीने सीएसकेला १९१ धावांवर रोखत २७ धावांनी विजय मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings Highlights : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ ३३ वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यापैकी २१ सामन्यात धोनीच्या सीएसकेने आणि ११ सामन्यात विराटच्या आरसीबीने बाजी मारली आहे. त्याचबरोबर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.

19:46 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : किंग कोहलीने शार्दुलच्या षटकात मारले दोन षटकार

शार्दुल ठाकुरने तिसरे षटक टाकले. या षटकात किंग कोहलीने दोन षटकार मारले. 3 षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या एकही विकेट न पडता 31 धावा आहे. विराट कोहली 9 चेंडूत 19 तर ​​प्लेसिस 9 चेंडूत 12 धावांवर खेळत आहे. कोहलीने दोन षटकार आणि एक चौकार लगावला आहे. प्लेसिसच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार आला.

19:35 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : कोहली-प्लेसिसकडून आरसीबीच्या डावाला सुरुवात

आरसीबीचा डाव सुरू झाला आहे. कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली सलामीला फलंदाजीसाठी उतरले आहेत. या सीझनमध्ये दोघेही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसले आहेत. या दोन्ही दिग्गजांना साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्यात संघाला चांगली सुरुवात करून द्यायची आहे. त्याचवेळी तुषार देशपांडे डावातील पहिले षटक टाकले. या षटकात फक्त २ धावा आल्या.

19:13 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुर: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज.

चेन्नई सुपर किंग्ज : रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महिष तिक्षाना

19:08 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली

चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. या सामन्यात आपला संघ एका बदलाने खेळताना दिसणार असल्याचे कर्णधार रुतुराज गायकवाड यांनी सांगितले. मोईन अलीच्या जागी मिचेल सँटनरला संधी मिळाली आहे.

18:51 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : हवामान खात्याचा अंदाज काय?

भारतीय हवामान खात्याने १८ मे रोजी मध्य बंगळुरू परिसरात ताशी ४०-५० किमी वेगाने वारे, वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगळुरूमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सतत पाऊस पडत आहे आणि हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सीएसके आणि आरसीबी यांच्यातील सामन्यादरम्यान पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सामना सुरू होण्याच्या वेळी म्हणजे संध्याकाळी ७.३० वाजता आकाश ढगांनी झाकले जाण्याची शक्यता आहे. मात्र, चिन्नास्वामी स्टेडियममधील ड्रेनेज व्यवस्था चांगली असल्याने पाऊस थांबल्यानंतर अर्ध्या तासात खेळ सुरू होऊ शकतो, ही दिलासादायक बाब आहे.

18:29 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : आरसीबीसमोर ऋतुराजला रोखण्याचे आव्हान

या हंगामात कर्णधार ऋतुराज गायकवाडने चेन्नईसाठी सर्वाधिक धावा केल्या असून त्याच्याकडून ही लय कायम राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आरसीबीसमोर त्याला रोखण्याचे आव्हान आहे. सलामीवीर रचिन रवींद्रनेही उपयुक्त खेळी खेळली आहे. गेल्या चार डावांत अपयशी ठरलेल्या शिवम दुबेकडूनही चांगली कामगिरी अपेक्षित आहे. गोलंदाजीत सिमरजीत सिंग आणि तुषार देशपांडे या वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. संघात मुस्तफिजुर रहमान, मथिशा पाथिराना आणि दीपक चहर यांची उणीव आहे. महेंद्रसिंग धोनीची उपस्थिती चेन्नईसाठी प्रेरणास्रोत आहे पण दुखापतीमध्ये तो कितपत योगदान देऊ शकतो हे पाहणे बाकी आहे.

18:07 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : आरसीबी आणि सीएसके यांच्यातील सामन्यात कोणाचे वर्चस्व राहिले?

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ ३२ वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यापैकी २१ सामन्यात धोनीच्या सीएसकेने आणि १० सामन्यात विराटच्या आरसीबीने बाजी मारली आहे. त्याचबरोबर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.

17:46 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : आरसीबीने जोरदार पुनरागमन केले

आरसीबी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सहा सामन्यातील पराभवाची मालिका खंडीत केल्यानंतर सलग पाच विजयांची नोंद केली आहे. ऑरेंज कॅपधारक विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये असून गेल्या पाचपैकी तीन सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके झळकावली आहेत. मागील दोन सामन्यांमध्ये दुहेरी आकडा गाठू न शकलेल्या कर्णधार फाफ डू प्लेसिसकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. रजत पाटीदार आणि कॅमेरून ग्रीन मधल्या फळीत चांगले खेळत आहेत. महिपाल लोमरोर आणि दिनेश कार्तिक यांच्याकडूनही संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

17:37 (IST) 18 May 2024
RCB vs CSK : प्लेऑफ्सच्या एका तिकीटासाठी विराट-धोनीच्या संघांची प्रतिष्ठा पणाला

सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्याने कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघ प्लेऑफ्समध्ये पोहोचला आहे. आता फक्त एका जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे आणि सीएसके आणि आरसीबी हे दोन संघ शर्यतीत आहेत. उत्तम धावगती आणि अधिक गुण (१३ गुण आणि ०.५२८ धावगती) यामुळे चेन्नईचा दावा मजबूत आहे. या मैदानावरील आठ सामन्यांत त्यांना फक्त एकदाच आरसीबीकडून पराभव पत्करावा लागला आहे. तर आरसीबीचे १२ गुण आहेत आणि त्याचा निव्वळ धावगती ०.३८७ आहे.

IPL 2024 Highlights, RCB vs CSK : आयपीएल २०२४ मधील ६८वा सामना बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला.या सामन्यात रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने आले होते. दोन्ही संघांसाठी प्लेऑफ्सच्या दृष्टीने विजय महत्त्वाचा असल्याने दिग्गज खेळाडूंसाठी हा सामना प्रतिष्ठेचा होता. ज्यामध्ये विराटच्या आरसीबीने २७ धावांनी सीएसकेचा पराभव करत प्लेऑफ्समध्ये दमदार एन्ट्री मारली.