Rinku Singh Get Virat Kohli Bat : विराट कोहलीची जगातील महान फलंदाजांमध्ये गणना केली जाते. पण क्रिकेटच्या मैदानाबाहेरही तो अनेकांचा मित्र आहे. हा अनुभवी खेळाडू अनेकदा ज्युनिअर खेळाडूंना मदत करताना दिसतो. ज्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यात पुन्हा एकदा तो अशाच एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. कोलकत्ता नाइट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंहने अलीकडेच विराट कोहलीकडे एका बॅटची मागणी केली होती, यावेळी विराट ‘तुला आधीच एक बॅट दिली’ असल्याचे म्हणत त्याला पुन्हा बॅट देण्यास नकार देतो, ज्यानंतरही रिंकू सिंह त्याच्याकडून बॅट मिळवण्याचा प्रयत्नात होता. अखेर आता त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले असून विराटकडून त्याने दुसरी बॅट मिळवली आहे. विराटची बॅट मिळाल्यानंतरचा आनंद रिंकूच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता. याचा एक व्हिडीओ केकेआरने एक्सवर पोस्ट केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओमध्ये रिंकू समोरून अगदी हसतमुख चेहऱ्याने नवीकोरी बॅट घेऊन येताना दिसत आहे. यावेळी समोर उभे असलेले लोक त्याला विचारतात, रिंकू भाई बॅट मिळाली का? ज्यावर तो हसत “हो बॅट मिळाली” असे सांगून निघून जातो.

दरम्यान २१ एप्रिल रोजी कोलकत्ता नाइट रायडर्स आणि आरसीबी यांच्यातील सामन्यापूर्वी रिंकू आणि विराटचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये, रिंकू विराटकडून बॅट मागताना दिसत आहे. विराटने यापूर्वी त्याला एक बॅट दिली जी रिंकूकडून स्पिनर विरोधात खेळताना तुटली. यानंतर पुन्हा दोन्ही टीम समोरासमोर आल्या तेव्हा रिंकू सिंहने पुन्हा एकदा विराट कोहलीकडे बॅट मागितली.

केकेआरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यात रिंकू कोहलीकडून दुसरी बॅट मिळवण्याचा प्रयत्न करत होता. रिंकू विराटची बॅट चेक करत असतानाच विराट त्याला विचारतो, आधी दिलेली बॅट कुठे आहे, आता दुसरी बॅट मागतोयस तो? यावर रिंकू उत्तर देतो की, स्पिनर विरोधात खेळताना ती बॅट तुटली. ही गोष्ट ऐकताच विराट त्याला दुसरी बॅट देण्यास नकार देतो. पण रिंकू त्याला समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो.

इडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या मॅचनंतरही रिंकू सिंह विराट कोहलीशी बॅटबाबत बोलताना दिसला. यानंतर केकेआरने आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात रिंकू कोहलीकडून मिळालेली दुसरी बॅट दाखवताना दिसतोय. यात विराटकडून बॅट मिळल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो.

विराटच्या बॅटची किंमत किती?

विराट कोहली एमआरएफच्या बॅटने खेळतो. त्याच्या बॅटची किंमत लाखो आहे. हा खेळाडू त्याच्या इच्छेनुसार बॅट तयार करु घेतो. विराट कोहलीला ही बॅट मोफत मिळते. एवढेच नाही तर बॅटवर एमआरएफचे स्टिकर लावण्यासाठी त्याला करोडो रुपये मिळतात. विराट कोहली हा क्रिकेटपटू आहे जो बॅट स्टिकर्समधून सर्वाधिक कमाई करतो. विराट कोहलीचा एमआरएफबरोबर १०० कोटी रुपयांचा करार आहे. एमआरएफच्या बॅटने खेळण्यासाठी त्याला दरवर्षी १२.५ कोटी रुपये मिळतात.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 rinku singh finally gets second bat from virat kohli kkr vs rcb match kkr shares video sjr