IPL 2024 Rishabh Pant Video: आयपीएल २०२४ मधील ४० वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. दिल्लीने हा सामना ४ धावांनी जिंकला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत चांगलाच फॉर्मात दिसला. पंतने आपल्या खेळीत ५ चौकार आणि ८ जबरदस्त षटकार मारले. विशेषत: शेवटच्या ओव्हरमध्ये पंत ज्या पद्धतीने खेळला, त्यामुळे संघाची धावसंख्या २०० पार पोहोचू शकली; ज्यासाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा खिताब मिळाला. पण, पंतच्या वेगवान फलंदाजीदरम्यान एका षटकाराने बीसीसीआयच्या कॅमेरामनला दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने केलेल्या एका कृतीने आता चाहत्यांचे मन जिंकले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऋषभने षटकार ठोकलेला चेंडू थेट जाऊन कॅमेरामनला लागला, ज्यामुळे तो जखमी झाला. सामना संपल्यानंतर ऋषभने कॅमेरामनची माफी मागितली आणि त्याला लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना केली. पंतचा हा व्हिडीओ आयपीएलच्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

सामना संपल्यांतर कॅमेरामनची माफी मागत ऋषभ पंत म्हणाला की, माफ करा, देबाशिष भाई… तुम्हाला दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, पण मला आशा आहे की, तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल, शुभेच्छा.

ऋषभ पंतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायलर होत असून चाहत्यांना तो खूप आवडला आहे.

ऋषभ पंतची तुफान खेळी

ऋषभ पंतने गुजरात टायटन्सविरुद्ध जबरदस्त अर्धशतक झळकावले. पंतने ४३ चेंडूत ८८ धावांची खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान पंतने ५ चौकार आणि ८ शानदार षटकार मारले. या दरम्यान पंतचा स्ट्राईक रेट २०४ राहिला आहे. आयपीएल २०२४ मधील पंतचे हे तिसरे अर्धशतक होते. आता पंतही ऑरेंज कॅपच्या शर्यतीत उतरला आहे. आयपीएल २०२४ मध्ये पंतने ९ सामन्यात ३४२ धावा केल्या आहेत. या मोसमात पंतने २७ चौकार आणि २१ षटकार मारले आहेत.

हेही वाचा – VIDEO : “महागडा सलमान खान” आयपीएलदरम्यान युजवेंद्र चहलचा ‘राधे भाई’ अवतार पाहून तुम्हीही हसून व्हाल लोटपोट

गुजरात टायटन्सचा पराभव केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सलाही पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे. दिल्लीचा ९ सामन्यांमधला हा चौथा विजय आहे. याशिवाय पंतच्या संघाने ५ सामने गमावले आहेत. आता दिल्लीचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.