Tom Moody says Hardik Pandya plan is longterm : रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आहे. फ्रँचायझीच्या या निर्णयावर चाहते अजूनही नाराज आहेत. मुंबई इंडियन्सची कमान आता हार्दिक पंड्याकडे आहे. ज्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ मध्ये पहिला सामना गमावला आहे. यानंतर हार्दिकच्या कर्णधारपदावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या सामन्यानंतर चाहत्यांनी हार्दिकला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले. आता रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद मिळू शकेल का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे. ज्यावर माजी दिग्गज खेळाडूचे वक्तव्य समोर आले आहे.

हार्दिकने पहिल्यांदा एमआयचे कर्णधारपद भूषवताना संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. सोमवारी १७व्या मोसमातील पहिल्या सामन्यात मुंबईचा गुजरातकडून ६ धावांनी पराभव झाला. अहमदाबादमध्ये खेळवण्यात आलेला हा सामना अतिशय रोमांचक होता, जो शेवटच्या षटकापर्यंत गेला. या सामन्यातील हार्दिकच्या काही निर्णयांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. हार्दिकला प्रेक्षकांनी बऱ्याच वेळ डिवचताना मैदानावर अनेकवेळा रोहित-रोहितच्या घोषणा दिल्या. हार्दिकचा पहिला सामना अपेक्षेप्रमाणे झाला नसावा, पण हा अष्टपैलू खेळाडू दीर्घ शर्यतीसाठी घोडा ठरेल असे मूडी यांना वाटते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना टॉम मूडी यांनी सांगितले की, “असे झाल्यास मला खूप आश्चर्य वाटेल. अचानक पाच किंवा आठ सामन्यांमध्ये कर्णधार बदलला गेला, तर ते फारच अदूरदर्शी ठरेल. कर्णधार म्हणून हार्दिक दीर्घकालीन निर्णय आहे. मला असे वाटते की हार्दिककडे नेतृत्वाची भूमिका सोपवणे जितके वादग्रस्त होते तितकेच ते अनेक लोकांसाठी, विशेषत: एमआय चाहत्यांसाठी धक्कादायक होते. मला वाटते की हा दीर्घकालीन निर्णय आहे.” एमआयचा कर्णधार या नात्याने पहिल्या सामन्यात हार्दिक काहीसा चिंतेत असल्याचे मूडी यांना वाटले. हार्दिकला एमआयचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांच्याबरोबर आशिष नेहरासारखे ट्यूनिंग विकसित करण्यास थोडा वेळ लागेल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – IPL 2024: “माझा हुकूम आहे…” पत्नी रिवाबाच्या पोस्टवरील जडेजाची कमेंट व्हायरल

टॉम मूडी पुढे म्हणाले, “हार्दिक पहिल्या सामन्यात थोडासा चिंतेत दिसत होता. गेल्या काही वर्षात गुजरातचा कर्णधार म्हणून हार्दिकला खूप शांत आणि अतिशय नियंत्रित असल्याचे आम्ही पाहिले आहे. त्यामुळे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यातील नाते खूप महत्त्वाचे आहे यात शंका नाही. आता मुंबई इंडियन्समध्ये बाउचर आणि हार्दिक यांच्यात हे नवीन नाते तयार होत आहे. प्रभावीपणे काम करण्यासाठी वेळ लागतो. याचा पहिल्या सामन्याशी काहीही संबंध नाही. हार्दिकच्या समोर काही आव्हाने आहेत. तो मुंबई इंडियन्ससारख्या मोठ्या फ्रँचायझीमध्ये आहे आणि त्याच्या आजूबाजूला काही मोठे खेळाडू आहेत, ज्यांना कर्णधारपदाचा खूप अनुभव आहे.”

Story img Loader