Rohit Sharma in KKR for IPL 2025 : मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माबाबत अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. अलीकडेच रोहित शर्मा आणि केकेआरचा सहायक प्रशिक्षक अभिषेक नायरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओतील रोहितच्या काही विधानांवरून तो मुंबई इंडियन्स संघातून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगत होती. केकेआर संघाने तो व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवर पोस्ट केला होता; मात्र काही वेळातच त्यांनी तो डिलीट केला. अशातच हिटमॅनचा एक नवा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, जो पाहिल्यानंतर आता रोहित शर्मा आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स सोडून कोलकाता नाईट रायडर्स संघातून खेळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माचा हा फोटो KKR vs MI सामन्यापूर्वीची आहेत; ज्यामध्ये रोहित कोलकात्याच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन संघाच्या खेळाडूंशी बोलताना दिसत आहे. हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा विविध चर्चांना सुरू झाली आहे.

रोहित शर्माचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

कोलकाता आणि मुंबई यांच्यातील आयपीएल २०२४ सामना शनिवारी रात्री एक तासापेक्षा जास्त उशिरा सुरू झाला. कोलकात्यातील संततधारेत चाहते सामना सुरू होण्याची वाट पाहत असताना, स्टार स्पोर्ट्स आणि जिओ सिनेमाने केकेआर ड्रेसिंग रूममध्ये रोहितच्या उपस्थितीचे थेट व्हिज्युअल दाखवले. त्यात रोहित केकेआरच्या काही खेळाडूंशी संवाद साधताना दिसतोय.
यावेळी तिथे कोलकाताचे सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाज मनीष पांडे, गोलंदाज वरुण चक्रवर्ती व यष्टिरक्षक के. एस. भरत उपस्थित होते.

रोहित शर्मा पुढच्या सीजनपासून MI सोडून KKR मध्ये होणार सामील?

हा व्हिडीओ आणि KKR ने डिलीट केलेल्या आधीच्या व्हिडीओवरून असे बोलले जात आहे की, रोहित शर्मा पुढच्या सीजनपासून MI सोडून KKR मध्ये सामील होऊ शकतो.

आयपीएल २०२५ च्या आधी, एक मेगा लिलाव होईल आणि संघांची पुनर्रचना केली जाईल. खेळाडूंना त्यांच्या संघांबरोबर राहण्याची आणि इच्छा असल्यास संघापासून दूर राहण्याची संधी मिळेल. मात्र, एमआयने रोहित शर्माला ज्या प्रकारे वागणूक दिली, त्यावर तो काय त्याचे चाहतेही खूश नाहीत. अशा स्थितीत तो पुढील वर्षी दुसऱ्या फ्रँचायजीसाठी खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

“भावा, हे मंदिर मी बनवलंय; पण हे माझं शेवटचं…” रोहित शर्माच्या ‘त्या’ VIDEO ने खळबळ; MI मधून बाहेर पडण्याची चर्चा

दरम्यान, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू व माजी KKR गोलंदाजी प्रशिक्षक वसिम अक्रम यानेही रोहित शर्माने पुढील वर्षी कोलकाता फ्रँचायजीमध्ये सामील व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. वसिम अक्रम म्हणाला होता की, मला वाटतं तो पुढच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्समध्ये नसेल. मला त्याला केकेआरमध्ये पाहायला आवडेल. कल्पना करा की, तो तिथे सलामीला आहे, गौथी एक मार्गदर्शक म्हणून, अय्यर एक कर्णधार म्हणून. काय मजबूत फलंदाजी असेल.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 rohit sharma intense meeting with kolkata knight riders coaches players after deleted viral video netizens next season in kolkata talks sjr