LSG vs RR Match Highlights: संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेलच्या वादळी १२१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर राजस्थानने लखनऊ संघावर दणदणीत विजय मिळवला आहे. राजस्थानने लखनऊने दिलेल्या १९७ धावांचा पाठलाग करत ७ विकेट्स आणि १ षटक राखून विजय मिळवला. या विजयासह पहिल्या क्रमांकावर असलेल्या राजस्थानचा संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे आणि संघाने आपले स्थान कायम ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपरजायंट्सने पाच विकेट गमावून १९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने एका षटकात केवळ तीन विकेट्स गमावून सामना सहज जिंकला. राजस्थानचा हंगामातील नऊ सामन्यांमधील हा आठवा विजय आहे. तर लखनऊला नऊ सामन्यांतील चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थानची सुरूवात चांगली झाली असली तरी यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलर मोठी खेळी करू शकले नाहीत. यशस्वीने २४ धावा तर बटलर ३४ धावा करत बाद झाला. तर रियान परागही १४ धावा करत बाद झाला. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात ६० धावांवर संघाने पहिली विकेट गमावली. १८ चेंडूत ३४ धावा करून खेळत असलेल्या बटलरला यश ठाकूरने क्लीन बोल्ड केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेला कर्णधार संजू सॅमसन शेवटपर्यंत क्रीजवर राहिला. दरम्यान, यशस्वी आणि रियान पराग यांच्या विकेट पडल्या, पण पाचव्या क्रमांकावर आलेल्या ध्रुव जुरेलने आपल्या घरच्या मैदानावर मोसमातील पहिले अर्धशतक ठोकले. या अर्धशतकाचे सेलिब्रेशन करताना त्याने पुन्हा एकदा सॅल्युट केले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 rr beat lsg by 7 wickets sanju samson and dhruv jurel 112 runs partnership bdg