RR vs RCB Highlights, IPL 2024 : आयपीएल २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा ४ गडी राखून पराभव केला आहे. यासह, राजस्थानने क्वालिफायर-२ सामन्यात आपले स्थान पक्के केले आहे, जेथे संजू सॅमसनच्या संघाचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल. नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रथम खेळताना आरसीबीने १७२ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने ३३ धावा केल्या, शेवटच्या षटकांमध्ये महिपाल लोमररने १७ चेंडूत ३२ धावा करत बंगळुरूला या धावसंख्येपर्यंत नेले. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करायला उतरल्यावर राजस्थान संघाने दमदार सुरुवात केली, मात्र मधल्या षटकांमध्ये धावगतीवर अंकुश लागल्याने सामना रोमांचक झाला होता. मात्र रियान पराग, शिमरॉन हेटमायर आणि रोव्हमन पॉवेल यांच्या महत्त्वपूर्ण खेळींनी राजस्थान रॉयल्सने क्वालिफायरमध्ये धडक मारली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Highlights, IPL 2024 Eliminator : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ एलिमिनेटर सामन्यात नऊ वर्षांनी पुन्हा आमनेसामने आले होते. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा ४ गडी राखून पराभव करत क्वालिफायर २ मध्ये धडक मारली. याआधी दोन्ही संघांनी २०१५ साली एलिमिनेटर सामना खेळवला होता. त्यावेळी हा सामना एकतर्फी झाला होता. ज्यामध्ये आरसीबीने बाजी मारली होती.

18:21 (IST) 22 May 2024
RR vs RCB IPL 2024 Eliminator : विराट इतिहास रचण्यासाठी सज्ज!

आयपीएलच्या सुरुवातीपासून विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे. कोहलीने अनेक वर्षे संघाचे नेतृत्वही केले आहे. आयपीएलच्या इतिहासात कोहलीने आतापर्यंत २५१ सामन्यांच्या २४३ डावांमध्ये ७९७१ धावा केल्या आहेत. सध्या कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. कोहली आता त्याच्या आठ हजार आयपीएल धावा पूर्ण करण्यापासून २९ धावा दूर आहे. एलिमिनेटर सामन्यात कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध २९ धावा केल्या, तर तो आयपीएलमध्ये ८ हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल.आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला आयपीएलमध्ये ही कामगिरी करता आलेली नाही.

18:00 (IST) 22 May 2024
RR vs RCB IPL 2024 Eliminator : सामना पावसामुळे रद्द झाल्यास कोणाला मिळणार क्वालिफायरची संधी?

राखीव दिवशीही हवामान सहकार्य करत नाही असे मानू या, तर पंच किमान ५-५ षटकांचा सामन आयोजित करण्याचा प्रयत्न करतील. हेही शक्य नसेल तर सुपर ओव्हर घेण्यात येईल. मात्र सुपर ओव्हर्सचा पण सामना खेळला गेला नाही, तर कोणता संघ क्वालिफायर खेळणार, हे पॉइंट टेबलवर ठरवले जाईल. गुणतालिकेत दोन्हीपैकी जो संघ अव्वल स्थानावर राहिला होता, तो संघ दुसरा क्वालिफायर खेळण्यासाठी पात्र ठरेल. त्याचबरोबर दुसरा संघ बाहेर पडेल. या नियमामुळे आरसीबीला मोठा फटका बसणार आहे. जर सामना रद्द झाला, तर आरसीबी संघ बाहेर पडेल आणि राजस्थान रॉयल्स पुढच्या फेरीत म्हणजे दुसरा क्वालिफायर सामना खेळेल.

17:23 (IST) 22 May 2024
RR vs RCB IPL 2024 Eliminator :नऊ वर्षांनी एलिमिनेटर सामन्यात राजस्थान-बंगळुरु आमनेसामने

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग ६ सामने जिंकून प्लेऑफ्समध्ये पोहोचला आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सला गेल्या ५ सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. अशा स्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला एलिमिनेटर सामन्यात आपली विजयाची मालिका कायम राखायची आहे. २०१५ मध्ये, जेव्हा या दोन संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला गेला, तेव्हा हा सामना आरसीबीने एकतर्फी पद्धतीने जिंकला होता. त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ गडी गमावून १८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ १०९ धावा करून सर्वबाद झाला होता. अशा स्थितीत राजस्थान रॉयल्सवर यावेळीही दडपण असणार आहे.

17:19 (IST) 22 May 2024
RR vs RCB IPL 2024 Eliminator : साखळी फेरीत दोन्ही संघांची कामगिरी कशी होती?

राजस्थान रॉयल्स संघाने साखळी फेरीतील १४ पैकी ८ सामने जिंकले आणि ५ सामने गमावले. त्याचवेळी पावसामुळे एक सामना रद्द झाला. राजस्थानने या हंगामाची सुरुवात चांगली केली होती. त्याने पहिल्या ९ सामन्यांपैकी ८ जिंकले होते. मात्र गेल्या ५ सामन्यांमध्ये त्याची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. हे 5 सामने त्याने मे महिन्यातच खेळले आहेत. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मे महिन्यात एकाही पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही. मे महिन्यात त्याने या मोसमातील ६ सामने खेळले असून सर्व सामने जिंकले आहेत. मात्र, आरसीबीची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या ८ सामन्यांपैकी फक्त १ सामना त्यांनी जिंकला होता.

IPL 2024, RR vs RCB Highlights : राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आरसीबीचा आयपीएल २०२४ मधील प्रवास इथेच संपला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १७३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने १९ षटकात ६ गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला.