IPL 2024, Chennai Super Kings vs Gujarat Titans: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने गिलच्या गुजरात टायटन्सचा तब्बल ६३ धावांनी पराभव केला. धोनीने संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराजच्या खांद्यावर दिली. ऋतुराज हा मैदानात असो वा मैदानाबाहेर सर्वच निर्णय हे धोनीच्या मार्गदर्शनाखाली घेतो. गुजरातविरूध्दच्या सामन्यात याचा प्रत्यय पुन्हा पाहायला मिळाला. चेन्नईने फलंदाजीसाठी जडेजाच्या आधी नवा खेळाडू समीर रिझवीला मैदानात पाठवले. त्यापूर्वी गायकवाडने रिझवीला जडेजाच्या आधी फलंदाजीला पाठवायचं का याचा सल्ला धोनीकडून घेतला आणि मग रिझवीला मैदानात पाठवलं. ज्याच्या व्हीडिओ सध्या पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान शिवम दुबे मैदानावर तुफान फटकेबाजी करत होता. त्याने २२ चेंडूत ५१ धावांची आतिषबाजी करत बाद झाला. तो बाद झाला तर जडेजा फलंदाजीला येणार असेल सर्वांना वाटत होते. पहिल्या सामन्यात आरसीबीविरूध्द खेळताना समीर रिझवीला न पाठवता जडेजा मैदानात आला होता आणि दुबेसोबत मिळून त्याने चेन्नईला विजय मिळवून दिला. या सामन्यातही तसंच काहीसं होईल, असं वाटलं होतं. पण नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड धोनीकडे गेला आणि त्याने समीर रिझवीला फलंदाजीसाठी पाठवायचं का याचा सल्ला घेतला. धोनीने होकार देताच गायकवाड बाहेर आला आणि डगआऊटमध्ये बसलेल्या रिझवीला फलंदाजीसाठी तयार होण्याचं सांगितलं. जडेजा फलंदाजीला जाण्यासाठी पूर्ण तयार असताना ऋतुराजने नव्या फलंदाजाला मैदानात पाठवण्याचा निर्णय घेतला, जो संघासाठी खूपच फायदेशीर ठरला.

चेन्नई-गुजरात सामन्याचा हा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. कर्णधाराच्या मेसेजनंतर समीर रिझवी मैदानात जाण्यासाठी सज्ज होता. दुबे बाद होताच समीर मैदानात पोहोचला. राशीद खानसारखा उत्कृष्ट फिरकी गोलंदाज समोर होता, त्याच्याकडून पहिला चेंडू येताच समीर बॅट फिरवली आणि चेंडू थेट षटकारासाठी पोहोचला. त्याच षटकात समीरने अजून एक षटकार लगावत सर्वांनाच प्रभावित केले. पहिल्याच आयपीएल सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत त्याने या टी-२० लीगमध्ये पाऊल ठेवले. त्याच्या या ५ चेंडूत १४ धावांच्या खेळीसह चेन्नईने २०० चा आकडा पार केला.

चेन्नईने २० षटकांत २०६ धावा करत गुजरातसमोर धावांचा डोंगर उभारला. गोंलदाजीतही चेन्नईने बाजी मारत गुजरातच्या फलंदाजांना फार काळ मैदानात टिकू दिले नाही आणि आयपीएलमधील सलग दुसरा विजय नोंदवला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 ruturaj gaikwad checks with ms dhoni before sending sameer rizvi ahead of ravindra jadeja for batting in csk vs gt match watch video bdg