IPL 2024 All Team Changes: बहुप्रतिक्षित इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2024 चा हंगाम अखेरीस आपल्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये लिलाव झाला होता, या लिलावात सर्वच संघाचा चेहरा बदलला आहे. सर्वच संघांमध्ये जुन्या खेळाडूंसह नवे चेहरे दिसणार आहेत. आयपीएलपूर्वीच सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे मुंबई इंडियन्सचा संघ. IPL मधील यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने आपला कर्णधार बदलून रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा देण्यात आली. यामुळे मुंबई इंडियन्स संघाला चाहत्यांचा प्रचंड रोष सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर आता आयपीएलच्या १० संघांमध्ये या हंगामासाठी कोणते बदल झाले आहेत, हे जाणून घेऊया.

– quiz

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
Free Aadhaar update details in marathi
Free Aadhaar update: उरला फक्त शेवटचा १ दिवस, आधारकार्डशी संबंधित ‘हे’ काम पटापट करा, अन्यथा…;
DoT recruitment 2024 Apply for Sub Divisional engineer salary up to Rs 151100
DoT recruitment 2024: सब-डिव्हिजन इंजीनिअरच्या पदासाठी होणार भरती;१,५१,१०० रुपयांपर्यंत मिळेल पगार, आताच करा अर्ज
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
Venkatesh Iyer Completed His MBA and Now Pursuing PhD in Finance
IPL 2025: आयपीएल लिलावात २३ कोटींपेक्षा जास्त बोली अन् आता होणार डॉक्टर, कोण आहे हा खेळाडू?

चेन्नई सुपर किंग्ज
गतविजेते चेन्नईने संघात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत ५ वेळा आयपीएलची ट्ऱॉफी जिंकणाऱ्या चेन्नई संघाची जबाबदारी यंदाही कॅप्टन कुल एम एस धोनीच्या खांद्यावर असेल. चेन्नईने यंदा ४५.२ कोटी खर्च करत ९ खेळाडूंना आपल्यासोबत जोडले आहे. सीएसकेने न्यूझीलंड संघाचे स्फोटक फलंदाज डॅरेल मिचेल आणि युवा खेळाडू रचिन रवींद्र आणि महागडा अनकॅप्ड खेळाडू समीर रिझवी (८.४ कोटी) यांना लिलावात खरेदी करत फलंदाजी बाजू अधिक मजबूत केली आहे. यानंतर शार्दुल ठाकूरला चेन्नईने लिलावात खरेदी केल्याने सीएसकेमध्ये त्याचे पुनरागमन झाले आहे. याव्यतिरिक्त मुस्ताफिझूर रहमान आणि युवा विकेटकिपर फलंदाज अवनिश राव अरावल्ली यांनाही संघात सामील करण्यात आले आहे.

हेही वाचा IPL 2024: विजेतेपदाच्या बरोबरीने सोशल मीडियावरही CSK, MIचा दबदबा; सर्वाधिक फॉलोअर्स असलेले टॉप ५ संघ कोणते?

मुंबई इंडियन्स
आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघात सर्वात मोठे बदल झाले आहेत. आयपीएल २०२४ पूर्वी मुंबई संघाने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले आणि यशस्वी कर्णधार रोहित शर्मा संघात असतानाही MIने पांड्याला संघाचा कर्णधार म्हणून घोषित केले. याचदरम्यान अष्टपैलू कॅमेरून ग्रीन याला मुंबई संघाकडून आरसीबीने ट्रेड केले. मुंबईच्या संघाने लिलावापूर्वी अनेक अनकॅप्ड खेळाडूंना रिलीज केले. यानंतर लिलावात मुंबईने ८ नव्या खेळाडूंना खरेदी केले.या खरेदीसह मुंबईचा संघाची गोलंदाजी बाजू पूर्णपणे बदलली आहे. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज गेराल्ड कोएत्झी, अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी, श्रीलंकेचे दोन खेळाडू दिलशान मधुशंका, नुवान थुशारा यांना संघात सामील केले. तर त्याचसोबत ४ अनकॅप्ड खेळाडूंनाही लिलावात त्यांच्या मूळ किंमतीसह खरेदी केले.

गुजरात टायटन्स
आयपीएलसारख्या स्पर्धेत आपल्या पहिल्याच सीझनमध्ये चॅम्पियन ठरणारा गुजरात टायटन्सचा संघ यंदाच्या मोसमात बदलेला दिसणार आहे. पहिले आयपीएल टाटयल जिंकवून देणारा त्यांचा कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघात गेल्याने २०२४ मध्ये युवा खेळाडू शुबमन गिल संघाचे नेतृत्त्व करणार आहे. हार्दिक एक अष्टपैलू खेळाडू असल्याने त्याची जागा कोण घेणार हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असणार आहे. याचसोबत सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विश्वचषकातील भारताचा हिरो मोहम्मद शमी पायाच्या शस्त्रक्रियेमुळे यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. याचसोबत जीटीने फलंदाज शाहरूख खानला, त्याचसोबत अफगाणिस्तानचा अझमतुल्ला ओमरझाई यांना लिलावात खरेदी केले, जे संघासाठी गेमचेंजर ठरू शकतात. त्याचसोबत GT च्या ताफ्यात स्पेन्सर जॉन्सन आणि जोशुआ लिटीलसोबत उमेश यादव, कार्तिक त्यागी आहेत. संघातील मोठं नाव म्हणजे केन विलियमसनही यंदाच्या मोसमात खेळताना दिसू शकतो.

हेही वाचा IPL 2024: नवे कर्णधार, महागडे खेळाडू, स्मार्ट रिप्ले सिस्टमसारखे नवे नियम आणि बरंच काही…

कोलकाता नाईट रायडर्स
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ त्यांच्या नियमित कर्णधारासह यंदाच्या मोसमात खेळताना दिसणार आहे.२०२३ च्या मोसमात श्रेयस अय्यरला दुखापत झाल्याने तो स्पर्धेबाहेर होता, त्यामुळे गेल्यावर्षी नितीश राणा संघाचा कर्णधार होता. पण यंदा श्रेयस अय्यर आयपीएल खेळणार असून तो संघाचे नेतृत्त्व करेल आणि राणा उपकर्णधार असेल. श्रेयस अय्यरला रणजी ट्रॉफीदरम्यान पुन्हा दुखापतीचा त्रास झाला होता, पण आता एनसीएने त्याला फिट घोषित केले. फिट घोषित केल्यानंतरही श्रेयसला पायाची मर्यादित हालचाल करण्याची सूचना देण्यात आली आहे. केकेआरने आयपीएल लिलावात मिचेल स्टार्कला विक्रमी २४ कोटी ७५लाख किंमतीत खरेदी केले आहे. त्यासोबतच अफगाणिस्तानचा गोलंदाज मुजीब उर रहमानही संघात दाखल झाला आहे. मनिष पांडे, केएस भरत, चेतन सकारिया या भारतीय खेळाडूंना ताफ्यात समाविष्ट केलं. केकेआरने २८पैकी १३ खेळाडूंना रिटेन केले होते, ज्यात त्यांचे शानदार कामगिरी करणारे गोलंदाज आणि षटकारांचा बादशाह ठरलेला रिंकू सिंगसह मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे.

राजस्थान रॉयल्स
भारताचा विकेटकिपर फलंदाज संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान संघ पुन्हा एकदा आयपीएलचे जेतेपद जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. राजस्थान महत्त्वाच्या अनेक खेळाडूंना लिलावापूर्वी रिटेन केले होते. त्यांचा महत्त्वाचा गोलंदाज प्रसिध कृष्णा दुखापतीतून सावरला होता. पण पुन्हा एकदा त्याच्या डाव्या क्वाड्रिसेप्स टेंडनवर शस्त्रक्रिया झाल्याने संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. राजस्थानने देवदत्त पडिक्कल आणि जो रूट यांना रिलीज केले. तर संघाने लिलावात आवेश खान, टी-२० चा शानदार फलंदाज रोव्हमन पॉवेल आणि अनकॅप्ड खेळाडू शुभम दुबे यांना खरेदी केले. तर यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेलसारखे शानदार कामगिरी करणारे युवा खेळाडू आणि जोस बटलर, रवी आश्विन, युजवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्टसारखे अनुभवी चेहरेही आहेत.

हेही वाचा IPL 2024: पॅट कमिन्स चालवणार शेन वॉर्नचा वारसा? ट्वेन्टी२० प्रकारात पहिल्यांदाच कर्णधाराच्या भूमिकेत

दिल्ली कॅपिटल्स
यंदाच्या आयपीएलमधून दिल्ली संघाचा नियमित कर्णधार ऋषभ पंत पुनरागमन करणार आहे. एनसीएकडून त्याला फिट घोषित केले असून तो संघाचे कर्णधारपदही सांभाळणार आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली संघाने २०२३ च्या मोसमाच्या अखेरीस चांगली कामगिरी केली होती. दिल्ली संघाने सर्फराज खानला रिलीज केले. दिल्ली संघाने युवा अनकॅप्ड विकेटकिपर फलंदाज कुमार कुशाग्रसाठी मोठी किंमत मोजत त्याला संघात सामील केले. त्याचसोबत झाय रिचर्डसन, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स आणि इतर काही अनकॅप्ड खेळाडूंना संघात सामील केले. मिचेल मार्श, इशांत शर्मा, कुलदीप यादल, अक्षर पटेल, लुंगी एनगिडीस पृथ्वी शॉ हे काही महत्त्वाचे चेहरेही संघात आहेत. आयपीएल सुरू होण्याआधीच हॅरी ब्रुकने माघार घेतली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
विराट कोहलीचा संघ म्हणून ओळख असलेला आरसीबी त्यांच्या पहिल्या वहिल्या जेतेपदाला गवसणी घालण्याच्या इराद्याने यंदाही मैदानात उतरणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवरून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं नाव बदललं आहे. आरसीबी संघाने यंदाच्या लिलावात त्यांचे गोलंदाजी युनिट अधिक मजबूत केले आहे. अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन या गोलंदाजांना खरेदी केले. याचसोबत त्यांनी कॅमेरून ग्रीनला मुंबई इंडियन्स संघाकडून ट्रेड केले.तर आरसीबीने लिलावापूर्वी हसरंगा, हर्षल पटेल, हेझलवूड, फिन अॅलेन, डेव्हिड विली या खेळाडूंना रिलीज केले.

सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबाद संघाने यंदाच्या आयपीएलपूर्वी आयपीएलमधील दुसरा सर्वात महागडा खेळाडू पॅट कमिन्स याला संघाचे कर्णधारपद दिले आहे. संघाने कमिन्सला २० कोटीला खरेदी केले, सोबतच ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, जयदेव उनाडकट यांनाही संघात सामील केले तर दोन अनकॅप्ड खेळाडूंना खरेदी केले. याशिवाय अब्दुल समद, अभिषेक शर्मा, ग्लेन फिलीप्स, हेनरिक क्लासेन, वॉशिंग्टन सुंदरसारखे खेळाडूही संघाचा भाग आहे.

हेही वाचा IPL 2024 मध्ये स्मार्ट रिप्ले सिस्टीम आणण्याच्या तयारीत, वाचा काय आहेत फायदे

पंजाब किंग्ज
भारताचा आक्रमक सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील संघाने आयपीएल लिलावापूर्वी १९ खेळाडूंनी रिटेन करत ५ खेळाडूंना रिलीज केले होते. लिलावात पंजाब संघाने हर्षल पटेल, ख्रिस वोक्स आणि राईली रूसो यांना कोटींच्या घरात खरेदी केले तर ५ अनकॅप्ड खेळाडूंना त्यांच्या मूळ किंमतीसह संघात सामील केले.लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेयरस्टो, जितेश शर्मा, सॅ्म करन, सिकंदर रझा, अर्शदीप सिंग, कगिसो रबाडा सारखे खेळाडूही संघाचा भाग आहेत.

लखनऊ सुपर जायंट्स
केएल राहुलच्या नेतृत्त्वाखालील संघ लखनऊ सुपर जायंट्स संघाने भारताच्या गोलंदाजांना खरेदी करण्यासाठी ९ कोटी खर्च केले. आयपीएलपूर्वी इंग्लंडच्या मालिकेदरम्यान राहुलला दुखापत झाली होती, त्यानंतर तो आयपीएल खेळणार की नाही असा संभ्रम होता. एनसीएने त्याला आयपीएल खेळण्यासाठी फिट केले असले तरी त्याला सुरूवातीचे सामने विकेटकिपिंग न करण्याचा सूचना दिल्या आहेत. ज्यामध्ये शिवम मावी आणि अनकॅप्ड खेळाडू एम सिध्दार्थचा समावेश आहे.यासोबतच त्यांनी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विली आणि ऑस्ट्रेलियाचा अॅश्टन टर्नरला घेतलं आहे. यासोबतच यंदाच्या मोसमासाठी केएल राहुल संघाचा कर्णधार असेल आणि कृणाल पांड्याऐवजी निकोलस पुरनकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी असेल. नव्या खेळाडूंसह क्विंटन डी कॉक, दिपक हुडा, मार्क वुड, काईली मेयर्स स्टॉयनिस रवी बिश्नोईसारखे अनेक एकापेक्षा एक कमाल खेळाडू संघात आहेत.

Story img Loader