IPL 2024, Punjab Kings vs Sunrisers Hyderabad: पंजाबच्या घरच्या मैदानावर झालेल्या थरारक सामन्यात हैदराबादने अवघ्या २ धावांनी निसटता विजय मिळवला. सामन्याच्या सुरूवातीलाच बॅकफूटवर गेलेल्या हैदराबादसाठी नितीश रेड्डी तारणहार ठरला, त्याच्या खेळीमुळे हैदराबादला १८३ धावसंख्या गाठता आल्या. पण तरीही पंजाबच्या शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी अखेरच्या षटकात २९ धावांची गरज असताना २६ धावा केल्या. तर अखेरचे षटक टाकणाऱ्या उनाडकटने शर्थीचे प्रयत्न करत संघाला आवघ्या २ धावांनी विजय मिळवून दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

– quiz

सामन्यातील एक हायलाईट होणारा क्षण म्हणजे क्लासेनने केलेलं स्टंपिंग. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या ताशी १४० किलोमीटर वेगाने येणाऱ्या चेंडूवर क्लासेनने शिखर धवनला यष्टीचीत केले. वेगवान गोलंदाजाविरुद्ध ०.२५ सेकंदात केलेल्या या स्टंपिंगने सगळेच चकित झाले. १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनसमोर वेगवान धावा करण्याचे आव्हान होते. पण भुवनेश्वर कुमारने त्याला फार काळ मैदानात टिकू दिले नाही.

१८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खूपच खराब झाली. पंजाबने चार षटकांत केवळ १४ धावा करताना दोन मोठ्या विकेट गमावल्या होत्या. जॉनी बेअरस्टो आणि सॅम करन यांना स्वस्तात बाद केल्यानंतर आता जबाबदारी शिखर धवनच्या खांद्यावर आली आहे. भुवीने पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अब्दुल समदने स्लिपमध्ये धवनचा सोपा झेल सोडला आणि चेंडू चौकारासाठी सीमापार गेला. भुवनेश्वरने चौथा चेंडू गुड लेंथवर टाकला, ताशी १४० किमी वेगाने आलेल्या चेंडूवर धवनला पुढे जाऊन शॉट खेळायचा होता, पण तो त्याच्याच जाळ्यात अडकला.

चेंडू आऊटस्विंग झाला आणि धवन त्यावर फटका मारण्यासाठी चुकला. तो चेंडू थेट हेनरिक क्लासेनने टिपला आणि तो स्टंपवर आदळला. धवन क्रिजवर परतण्यापूर्वी क्लासेनने त्याला बाद केले होते. पंजाबला २० धावांवर तिसरा धक्का बसला. पंजाबने पॉवरप्लेनंतर २७ धावा केल्या होत्या, जी यंदाच्या आयपीएलमधील सर्वात कमी पॉवरप्ले धावसंख्या होती.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 shikhar dhawan got out by henrich klassen superb stumping on bhuvneshwar kumar 140 kmph ball pbks vs srh bdg