नितीश रेड्डीचा विजयी षटकार आणि हैदराबादच्या संघाने आपल्या घरच्या मैदानावरील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सहज पराभव केला. हैदराबादने ११ चेंडू आणि ६ विकेट्स राखून शानदार विजय मिळवला. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांनी संघाला पॉवरप्लेमध्ये एक शानदार सुरूवात करून दिली. संपूर्ण सामन्यात चेन्नईच्या वेगवान गोलंदाजांनी खूप धावा दिल्या. ज्याचा संघाला मोठा फटका बसला.

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत ५ गडी गमावून १६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने १८.१ षटकांत ४ गडी गमावून १६६ धावा केल्या आणि सामना ६ गडी राखून जिंकला. चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव आहे.

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रचार थांबला; आता चेंडू मतदारांच्या कोर्टात, २० नोव्हेंबरची प्रतिक्षा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी

हैदराबादच्या सलामीवीरांनी संघाला दणदणीत सुरूवात करून दिली. पहिल्या षटकात हेडचा झेल सुटला, ज्याचा चेन्नईला फटका बसला अन् अखेरच्या चेंडूवर त्याने षटकार लगावला. अभिषेक शर्माने तर आपल्या फलंदाजीने सर्वांनाच चकित केले. त्याने १२ चेंडूत ३७ धावा करत सामना चेन्नईपासून दूर नेला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी १७ चेंडूत ४६ धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी दीपक चहरने तोडली. तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चहरने अभिषेक शर्माला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केले.

अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि एडन मारक्रम दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. महिश तीक्ष्णाने १०व्या षटकात हेडला बाद केले. हेडने २४ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३१ धावांची खेळी खेळली. १४ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोईन अलीने एडन मारक्रमला एलबीडब्ल्यू आऊट केले. मारक्रमने बाद होण्यापूर्वी ३६ चेंडूत ५० धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ४ चौकार आणि १ षटकार पाहायला मिळाला. मोईन अलीने १६व्या षटकात शाहबाज अहमदला एलबीडब्ल्यू आऊट केले. शाहबाजने १९ चेंडूंत १८ धावा केल्या. मोईन अलीच्या विकेट्सने सामन्याचा रोख बदलला असं एक क्षण वाटलं होतं पण हैदराबादच्या फलंदाजांनी संघाला शानदार विजय मिळवून दिला.

हेनरिक क्लासेनने ११ चेंडूत १० धावा करून नाबाद राहिला. तर नवा खेळाडू नितीश रेड्डी ८ चेंडूत १४ धावा करून नाबाद राहिला. चेन्नई सुपर किंग्सकडून मोईन अलीला २ विकेट मिळाल्या. त्याच्याशिवाय दीपक चहर आणि महेश तीक्ष्णा प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्स अवघ्या १६५ धावा करू शकल्या. शिवम दुबेने सर्वाधिक ४५ धावांची खेळी खेळली. त्याने २४ चेंडूंत २ चौकार आणि ४ षटकार लगावले. त्याच्याशिवाय अजिंक्य रहाणेने ३५, रवींद्र जडेजाने ३१ आणि ऋतुराज गायकवाडने २६ धावा केल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, पॅट कमिन्स, शाहबाज अहमद आणि जयदेव उनाडकट यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.