Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians IPL 2024 Highlights: आयपीएल २०२४ च्या आठव्या सामन्यात हैदराबादने मुंबईवर ३१ धावांनी विजय मिळवला. हैदराबादने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करत २७६ धावा केल्या. संघातील टॉप ५ फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. हैदराबादने दिलेल्या २७७ धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी चांगला प्रयत्न केला पण त्यांना २४६ धावांवर समाधान मानावे लागले.

Live Updates

IPL 2024 Highlights, SRH vs MI: सनरायझर्स हैदराबाद विरूध्द मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये आयपीएलचा ८वा सामना खेळवण्यात आला. पण चांगल्या प्रयत्नानंतरही मुंबईला ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.

00:02 (IST) 28 Mar 2024
SRH vs MI: रेकॉर्डसचा पडला पाऊस

मुंबई वि हैदराबाद सामन्यात दोन्ही संघांनी कडवी झुंज दिली. मुंबईच्या गोलंदाजांनी केलेल्या चुका फलंदाजांनी धावा करत भरून काढण्याचा प्रयत्न केला. मुंबईने २७७ धावांच्या लक्ष्यात २४६ धावा करत कडवी झुंज दिली. यासह एखाद्या आयपीएल आणि टी-२० सामन्यात ५२३ धावा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर या सामन्यात सर्वाधिक ३८ षटकार फलंदाजांच्या बॅटमधून लगावले गेले. त्याचसोबत मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावसंख्येचा टप्पा गाठणारा पहिला संघ ठरला. तर ४ फलंदाजांनी एकाच सामन्याच २५ पेक्षा कमी चेंडूत आपले अर्धशतक झळकावले.

23:25 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: हैदराबादचा मुंबई इंडियन्सवर ३२ धावांनी दणदणीत विजय

हैदराबादच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकात चांगली गोलंदाजी केली. यासह हैदराबादच्या संघाने मुंबई इंडियन्सवर ३१ धावांनी विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरूवात करून देत पॉवरप्लेमध्ये ६७ धावां केल्या. रोहित-इशाननंतर तिलक आणि नमन धीरने संघाचा डाव उचलून धरला. तिलक वर्माने शानदार अर्धशतक झळकावले. हार्दिक पंड्याने येताच एक षटकार लगावला पण नंतर तो मोठी खेळी करू शकला नाही आणि स्वस्तात बाद झाला. टीम डेव्हिडने २२ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. तर रोमारियो शेफर्डने ६ चेंडूत १५ धावा केल्या. मुंबई संघाने चांगली फलंदाजी केली खरी पण गोलंदाजी करताना केलेल्या चुका आणि त्यामुळे दिलेल्या अतिरिक्त धावांचा संघाला फटका बसला.

23:15 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: हार्दिक पंड्याच्या रूपात मुंबईला पाचवा धक्का

उनाडकटच्या अखेरच्या चेंडूवर हार्दिक २४ धावा करत झेलबाद झेलबाद झाला. कर्णधार पंड्याकडून दमदार फलंदाजीची अपेक्षा असताना तो २० चेंडूत १ षटकार आणि १ चौकारासह अवघ्या २४ धावा करून बाद झाला.

23:04 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: ३ षटकांत मुंबईला किती धावांची आवश्यकता

मुंबई इंडियन्सने टीम डेव्हिडने २ षटकार आणि चौकार लगावत संघाची धावसंख्या २१० वर नेली. मुंबईला विजयासाठी १८ चेंडूत ६८ धावांची आवश्यकता आहे.

22:49 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: मुंबई-हैदराबादचा सामना रोमांचक वळणावर

मुंबई वि हैदराबादमधील सामन्यातील रोमांच प्रत्येक षटकासह वाढत चालला आहे. सध्या मुंबईचा संघ १४ षटकांत ३ बाद १८२ धावांवर खेळत आहे. मुंबईला विजयासाठी ३६ चेंडूत ९६ धावांची गरज आहे. तिलक वर्मा ६४ धावांवर खेळत आहे तर हार्दिक पंड्या १९ धावांवर खेळत आहे.

22:35 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: हैदराबादच्या खात्यात तिसरी विकेट

जयदेव उनाडकटने ११ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नमन धीरला झेलबाद केले. धीरने बाद होण्यापूर्वी १४ चेंडूत २ षटकार आणि २ चौकारासह ३० धावा केल्या.

22:31 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: तिलक वर्माचे शानदार अर्धशतक

तिलक वर्माने शाहबाजच्या १०व्या षटकात ३ दणदणीत षटकार लगावत २२ धावा केल्या. तिलकने ११ व्या षटकाच्या चेंडूवर शानदार चौकार लगावत २४ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. ५ षटकार आणि २ चौकार लगावले.

22:09 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: पॉवरप्लेनंतर मुंबईची धावसंख्या

रोहित (२६) आणि इशान किशनने (३४) संघाला एक शानदार सुरूवात करून दिली, पण त्यांना फार काळ मैदानात टिकता आले नाही. पॉवरप्लेमध्ये संघाने २ बाद ७६ धावांचा टप्पा गाठला आहे. सध्या मैदानावर तिलक वर्मा ४ धावा आणि नमन धीर ७ धावा करत मैदानात आहेत.

22:00 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: रोहित शर्मा झेलबाद, मुंबईला मोठा धक्का

रोहितला चौथ्या षटकात एक जीवदान मिळाले पण त्याचा जास्त फायदा मुंबईला झाला नाही. पॅट कमिन्सच्या दुसऱ्या चेंडूवर रोहितने गगनचुंबी षटकार लगावला पण पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. रोहितने बाद होण्यापूर्वी १२ चेंडूत ३ षटकार आणि एका चौकारासह २६ धावा केल्या. पण दोन्ही खेळाडूंनी बाद होण्यापूर्वी संघाला जबरदस्त सुरूवात करून दिली. दोघांनी ५ षटकात ६७ धावा केल्या.

21:57 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: शाहबाजच्या चेंडूवर इशान किशन झेलबाद

एका षटकात २३ धावा करत इशानने रोहितच्या साथीने संघाची धावसंख्या ३ षटकात ५०वर नेऊन ठेवली. इशानने शाहबाजच्या पहिल्या चेंडूवर षटकार खेचला. दुसरा चेंडूही षटकारासाठी मारताना झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने १३ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकारासह ३४ धावा केल्या.

21:52 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: रोहित-इशानची शानदार फटकेबाजी

रोहित शर्मा आणि इशान किशनने वादळी फलंदाजी करत ३ षटकात ५० धावांचा टप्पा गाठला आहे. रोहित ७ चेंडूत १८ धावा केल्या, तर इशान किशनने वादळी फलंदाजी करत ११ चेंडूत २८ धावा केल्या. इशानने भुवनेश्वर एका षटकात २३ धावा केल्या.

21:45 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: मुंबई इंडियन्सच्या डावाला सुरूवात

रोहित शर्माने भुवनेश्वरच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावत चांगली सुरूवात केली. त्यानंतर चौथ्या चेंडूवर इशाननेही चौकार लगावत चांगली सुरूवात करून दिली. तर दुसऱ्या षटकात दोघांनी मिळून १८ धावा केल्या. सध्या मुंबईची धावसंख्या २७ धावा आहे.

21:36 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीने केली निराशा

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी या सामन्यात निराशा केली आहे. क्वेना मफाका या युवा गोलंदाजाने ४ षटकात सर्वाधिक ६६ धावा दिल्या. तर एकही विकेट नाही मिळवली. त्यानंतर कोएत्झीने ५७ धावा देत ६ वाइड टाकत १ विकेट घेतली. पियुष चावला आणि मुलानी २ षटकात अनुक्रमे ३४ आणि ३३ धावा दिल्या तर चावलाने १ विकेट घेतली. पांड्याने ४६ धावा देत १ विकेट घेतली. बुमराहने ४ षटकांत सर्वात कमी ३६ धावा दिल्या.

21:30 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: सनरायझर्सच्या फलंदाजांची वादळी फलंदाजी

ट्रेव्हिस हेड - २४ चेंडूत ३ षटकार आणि ९ चौकारासह ६२ धावा

अभिषेक शर्मा - २३ चेंडूत ७ षटकार आणि २ चौकारासह ६३ धावा

एडन मारक्रम - २८ चेंडूत १ षटकार आणि २ चौकारासह ४२ धावा

हेनरिक क्लासेन - ३४ चेंडूत ७ षटकार आणि ४ चौकारासह ८० धावा

21:22 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: हैदराबादने तोडला आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्येचा रेकॉर्ड

सनरायझर्स हैदराबादने अविश्वसनीय फलंदाजी करत २७७ धावांचा टप्पा गाठला आहे. आय़पीएलमधील २६३ धावा ही सर्वात मोठी धावसंख्या होती, हा रेकॉर्ड मोडत हैदराबादने २७७ धावा केल्या आहेत. हैदराबादचा सलामीचा फलंदाज मयंक अग्रवात स्वस्तात बाद झाला असला तरीही हेड (६२) आणि अभिषेक शर्मा (६३) यांच्या शानदार अर्धशतकी खेळाच्या जोरावर ७ षटकांत १०० धावांचा पल्ला गाठला. हे दोघे बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या क्लासेन (८०) आणि मारक्रम (४२) या दोघांनी संघाचा डाव उचलून धरत विक्रमी धावसंख्या उभारली.

21:15 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: क्लासेनचे शानदार अर्धशतक, हैदराबादची धावसंख्या २५० पार

हेड आणि अभिषेक शर्मानंतर क्लासेननेही शानदार अर्धशतक झळकावले. क्लासेनने २४ चेंडूत ५१ धावा करत मैदानात कायम आहे. यासह १९ षटकांमध्येच संघाने २५० धावांचा आकडा गाठला आहे.

21:09 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: हैदराबादने तोडला स्वत:चा विक्रम

हैदराबादचा आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या २३१धावा होती. त्यांनी २०१९ च्या राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात घरच्या मैदानावरच २ बाद २३१ धावा केल्या होत्या. त्यांनी सध्याच्या घडीला १८ षटकांत ३ बाद २४३ धावा केल्या आहेत.

21:05 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: मफाका मुंबईला पडला महागात

दक्षिण आफ्रिकेचा अंडर-१९ संघाचा गोलंदाज क्वेना मफाकाला मुंबईने आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी दिली. पण मुंबईसाठी तो खूप महागडा ठरला. मफाकाने ४ षटकांत तब्बल ६६ धावा दिल्या आहेत.

20:53 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: १५ षटकांनंतर हैदराबादने गाठला २०० धावांचा टप्पा

सनरायझर्स हैदराबादने १५ षटकांत २०० धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सला खराब गोलंदाजीचा फटका बसला आहे. क्लासेन १२ चेंडूत २६ धावा तर मारक्रम २१ चेंडूत ३२ धावा करत क्रिझवर आहेत. हेड आणि अभिषेक शर्माने संघाला खूपच चांगली सुरूवात करून दिली.

20:40 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: मुंबईच्या खात्यात तिसरे यश

पियुष चावलाच्या ११ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अभिषेक शर्मा झेलबाद झाला. त्याने बाद होण्यापूर्वी २३ चेंडूत सात षटकार आणि ३ चौकारांच्या आधारे ६३ धावांची वादळी खेळी केली. सध्या हैदराबादकडून मारक्रम आणि क्लासेनची जोडी मैदानात आहे.

20:35 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: अभिषेक शर्माचे शानदार अर्धशतक

हैदराबादच्या अभिषेक शर्माने अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक केले आहे. आयपीएलमधील हे तिसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. गगनचुंबी षटकारांच्या आधारे त्याने गोलंदाजांवर आपले अधिराज्य गाजवले.

20:16 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: ७ षटकांत १०१ धावा

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची हैदराबादकडून धुलाई सुरूच आहे. अभिषेक शर्मा आणि हेडने संघाचा डाव ७ षटकांत १०१ धावा केल्या. ७व्या षटकापर्यंत हेडने २२ चेंडूत ६१ धावा तर अभिषेक शर्मा ८ चेंडूत २७ धावांवर खेळत आहे.

20:10 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: हेडचे अर्धशतक

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची हेड आणि अभिषेक शर्माने जबरदस्त धुलाई केली आहे. हेडने अवघ्या १८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कोएत्झीच्या सहाव्या षटकात दोघांनी २३ धावा केल्या.

19:57 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: पंड्याने मिळवून दिली पहिली विकेट

पाचव्या षटकात पंड्याने पहिलाच चांगला चेंडू टाकत संघाला पहिली विकेट मिळवून दिली आहे. मयंक पुल शॉट खेळायला गेला पण टीम डेव्हिडने त्याला झेलबाद केले. मयंकने १३ चेंडूत एका चौकारासह ११ धावा केल्या.

19:54 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: ३ षटकांतच हैदराबादची धावसंख्या ४० वर

पहिल्या ३ षटकांत हेड आणि अग्रवालने ४० धावा केल्या आहेत. मुंबईचा नवा गोलंदाज मफाका आणि कर्णधार पंड्याची चांगलीच धुलाई केली. हेड ३१ धावा आणि अग्रवाल ७ धावा करत मैदानात कायम आहेत.

19:36 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: सामन्याच्या पहिल्या डावाला सुरूवात

मुंबई आणि हैदराबादमधील पहिल्या डावाला सुरूवात झाली आहे. १७ वर्षीय मफाका नवा चेंडू सोपवला आहे. तर हैदराबादकडून ट्रेव्हिस हेड आणि मयंक अग्रवाल सलामीसाठी उतरले आहेत.

19:17 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: रोहित शर्माचा मुंबई इंडियन्ससाठी २०० वा आयपीएल सामना

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा २०११ पासून संघाचा भाग आहे. रोहित मुंबईसाठी त्याचा आज २००वा आयपीएल सामना खेळत आहे. तर सोबतच मुंबई इंडियन्ससाठी २०० सामने खेळणारा तो पहिला फलंदाज आहे. सामन्यापूर्वी रोहितला सचिन तेंडुलकरकडून एक खास जर्सी देण्यात आली.

https://twitter.com/mipaltan/status/1772979737347903801

19:10 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: सनरायझर्स हैदराबादची प्लेईंग इलेव्हन

ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मारक्रम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद,शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय, जयदेव उनाडकट

https://twitter.com/SunRisers/status/1772983289239720157

19:08 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पीयूष चावला, गेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका

https://twitter.com/mipaltan/status/1772983374883242188

19:02 (IST) 27 Mar 2024
SRH vs MI: मुंबईने नाणेफेक जिंकली

सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स सामन्यातील नाणेफेक संघाने मुंबई संघाने जिंकली असून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिकने नाणेफेक जिंकत प्लेईंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. ल्युक वुडच्या जागी दक्षिण आफ्रिकचा अंडर-१९ संघाचा खेळाडू क्वेन मफाका याला मुंबईने आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी दिली आहे. तर हैदराबादने ट्रेव्हिस हेड आणि जयदेव उनाडकटला संघात सामील केले आहे.

 

Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians IPL 2024 Live Score in Marathi

IPL 2024 Sunrisers Hyderabad  vs Mumbai Indians Highlights: मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात हैदराबाद संघाने बाजी मारली आहे. हैदराबादने मुंबईवर ३१ धावांनी विजय मिळवत आयपीएल २०२४ मधील पहिला विजय नोंदवला आहे.

Story img Loader