श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याने काही महिन्यांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून जाहीर केलेली निवृत्ती मागे घेतली. पण आता हा खेळाडू बांगलादेशविरूध्दच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेमधून बाहेर पडला आहे.आयसीसीने त्याला सिल्हेटमध्ये सुरू असलेल्या सामन्यातील त्याच्या वर्तनामुळे निलंबित केले. हसरंगाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली होती. परंतु मंगळवारी बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची १७ सदस्यीय संघात निवड करण्यात आली तेव्हा त्याने निवृत्ती मागे घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

– quiz

मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात या २६ वर्षीय खेळाडूने अंपायरच्या निर्णयाला असहमती दर्शवली आणि ज्यामुळे आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले. ज्यामुळे त्याला निलंबित केले गेले. बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आयसीसीने निलंबित केल्यानंतर अष्टपैलू वानिंदू हसरंगा इंडियन प्रीमियर लीगच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी उपलब्ध होऊ शकतो.

ICC ने माहिती दिली की हसरंगा आठ ‘डिमेरिट पॉईंट्स’च्या उंबरठ्यावर पोहोचला आहे, ज्याचे रूपांतर खेळाडू आचारसंहितेच्या कलम ७.६ नुसार चार निलंबन गुणांमध्ये झाले आहे. जे दोन कसोटी सामने किंवा चार एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निलंबनाच्या समान आहे.

आयसीसीने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, हसरंगा खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी आयसीसी आचारसंहितेच्या अनुच्छेद २.८ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले आहेत. जो आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयाविरूद्ध असहमत दर्शविण्याशी संबंधित आहे. आयसीसीने सांगितले की, बांगलादेशविरुद्ध नुकत्याच संपलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हसरंगाने ३७व्या षटकात मैदानावरील पंचाकडून त्याची कॅप हिसकावून घेतली आणि सामन्यातील पंचांची खिल्ली उडवली.

आयसीसीने सांगितले की, ‘या उल्लंघनासाठी त्याला ५० टक्के फीचा दंड ठोठावण्यात आला आहे आणि तीन डिमेरिट पॉइंट्स त्याच्या खात्यात जोडण्यात आले आहेत. यामुळे २४ महिन्यांत त्याचे एकूण डिमेरिट गुण ८ झाले. हसरंगाच्या खात्यात आधीच पाच डिमेरिट गुण होते, त्यापैकी तीन गेल्या महिन्यात दांबुला येथे अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान जोडले गेले. तेव्हा बांगलादेशविरुद्धच्या दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठीही त्याला निलंबित करण्यात आले होते.

चार निलंबनाचे गुण म्हणजे चार एकदिवसीय किंवा चार टी-२० किंवा दोन कसोटी सामन्यांवरील बंदी असते. जर हसरंगाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेत कसोटीत खेळण्याचा निर्णय घेतला नसता तर २०२४ च्या टी-२० विश्वचषकातील पहिले चार सामने खेळण्याची त्याला संधी मिळाली नसती.

सनरायझर्स हैदराबादला फायदा

हसरंगा जो आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही सामन्यांसाठी अनुपलब्ध होता तो आता हैदराबादच्या ताफ्यात सामील होऊ शकतो. त्याला SRH ने त्याच्या १.५ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत संघात सहभागी करून घेतले. आयसीसीच्या या बंदीच्या हैदराबाद संघाला नक्कीच फायदा झाला आहे. कारण या बंदीमुळे तो सुरूवातीच्या सामन्यांसाठी संघात उपलब्ध असेल. तो एक अष्टपैलू खेळाडू असल्याने बॅट आणि बॉलने दोन्हीने उत्कृष्ट कामगिरी करत संघात समतोल राखू शकतो.

पहिल्या दोन आठवड्यांसाठी जाहीर केलेल्या IPL वेळापत्रकानुसार, हैदराबादचा संघ कोलकाता येथे २३ मार्च रोजी कोलकाता नाइट रायडर्सशी भिडणार आहे. यानंतर २७ मार्चला मुंबई इंडियन्स विरुद्धच्या लढतीसाठी हैदराबादला रवाना होतील आणि त्यानंतर ३१ मार्चला गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यासाठी अहमदाबादला जातील.

हसरंगाशिवाय पंचाशी हस्तांदोलन करताना असभ्य भाषेत बोलल्याबद्दल आयसीसीने श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसला त्याच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावला आणि त्याच्या खात्यात तीन डिमेरिट गुण जमा केले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 sri lankan cricketer wanindu hasaranga suspended by icc benefited sunrisers hyderabad bdg