हैदराबादच्या विजयासह मुंबई इंडियन्स संघाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. पाच जेतेपदं नावावर असलेल्या मुंबईच्या संघावर २०२२नंतर प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली. लखनौनं दिलेलं १६६ धावांचं लक्ष्य हैदराबादने लीलया पार केलं. हार्दिक पंड्या या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईची कामगिरी सर्वसाधारण झाली.

हेही वाचा – SRH vs LSG : नितीश कुमार रेड्डीने सीमारेषवर अप्रतिम झेल पकडत चाहत्यांना केले आश्चर्यचकित, पाहा VIDEO

लक्षवेधी लढत : यशोमती ठाकूर यांच्यासमोर भाजपचे आव्हान
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Indian Cricket Team Creates History Becomes First Team To Score 5 T20I International Century in 2024 IND vs SA Tilak Varma
IND vs SA: तिलक वर्माच्या शतकासह भारतीय संघाने घडवला इतिहास, टी-२० क्रिकेटमध्ये २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
Dhananjay munde latest marathi news
भाजपमधील दुखावलेले कार्यकर्ते आपल्याकडे वळवण्याचे धनंजय मुंडेंसमोर आव्हान
Suryakumar Yadav made big mistake in India lost the second T20I against South Africa
Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘ती’ चूक टीम इंडियाला पडली महागात, यजमानांनी भारताच्या तोंडचा घास हिरावला
readers feedback on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : आगलाव्या भाषणावर आयोग गप्प राहील…
yogendra yadav BJP Traitor Party
भाजप देशद्रोही पक्ष – योगेंद्र यादव

लखनौनं प्रथम फलंदाजी करताना १६५ धावांची मजल मारली. कर्णधार के. एल. राहुल, क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनस, कृणाल पंड्या यांना मोठी खेळी करता आली नाही, पण आयुश बदोनी आणि निकोलस पूरन यांनी पाचव्या विकेटसाठी ५२ चेंडूत ९९ धावांची भागीदारी केली. पूरनने २६ चेंडूत ४८ तर बदोनीने ३० चेंडूत ५५ धावांची खेळी केली. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने १२ धावांत २ विकेट्स पटकावल्या.

अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी तडाखेबंद सलामीची भागीदारी करत हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हेडने ३० चेंडूत ८ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ८९ धावांची खेळी केली. अभिषेकने २८ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ७५ धावांची खेळी केली. या दोघांच्या झंझावातामुळे १० विकेट्स आणि ६२ चेंडू राखून प्रचंड फरकाने विजय साकारला. अवघ्या पाऊण तासात ट्रॅव्हिस-अभिषेक जोडीने लखनौच्या लक्ष्याचा फडशा पाडला.

मुंबई इंडियन्स हंगामागणिक कामगिरी

  • २००८-प्राथमिक फेरी
  • २००९- प्राथमिक फेरी
  • २०१०-उपविजेते
  • २०११-प्लेऑफ्स
  • २०१२-प्लेऑफ्स
  • २०१३-विजेते
  • २०१४- प्लेऑफ्स
  • २०१५-विजेते
  • २०१६- प्राथमिक फेरी
  • २०१७-विजेते
  • २०१८-प्राथमिक फेरी
  • २०१९-विजेते
  • २०२०-विजेते
  • २०२१-प्राथमिक फेरी
  • २०२२-प्राथमिक फेरी
  • २०२३- प्लेऑफ्स
  • २०२४-प्राथमिक फेरी