Suresh Raina Helps Limping MS Dhoni Viral Video: चेन्नई सुपर किंग्सचा थाला एम एस धोनी यंदाही जबरदस्त फॉर्मात आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात धोनीने आपल्या वादळी फलंदाजीने सर्वांनाच चकित केले. धोनीने शेवटच्या षटकात फलंदाजीला येत सलग तीन षटकार लगावत संघाला विजयाच्या अधिक जवळ नेले. यंदाच्या मोसमातही धोनी विकेटकीपिंग आणि फलंदाजी दोन्ही करताना दिसत आहे. पण प्रत्येक सामन्यानंतर धोनीला चालताना त्रास होत असल्याचे दिसते. धोनी बर्फाची पट्टी पायाला बांधून फिरतो. असाच एका सामन्यानंतरचा धोनीचा रैन्नासोबतचा व्हीडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रैन्ना धोनीचा हात धरून त्याला खाली उतरण्यासाठी मदत करताना दिसत आहे.
– quiz
धोनी आणि सुरेश रैन्ना हे दोघेही एकमेकांशी बोलत टीम हॉटेलमधून बाहेर असताना या व्हीडिओमध्ये दिसत आहेत. हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर रैन्ना निघणार असतो तितक्यात उतरण्यासाठी पायऱ्या येतात आणि चालताना त्रास होत असलेल्या धोनीला रैन्ना मदत करतो. रैन्ना धोनीचा हात धरून त्याला पायऱ्या उतरण्यासाठी मदत करतो. हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. खाली उतरल्यानंतर रैन्ना धोनीला भेटून निघतो. तर धोनी टीम बसमध्ये चढतो. पूर्ण वेळ धोनीला चालताना खूप त्रास होत असल्याचे दिसत आहे.
सुरेश रैना आणि एमएस धोनी यांची मैत्री खूप जुनी आणि अतूट आहे. धोनीने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तेव्हा रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.यावरून यांच्या घट्ट मैत्रीचा अंदाज आपण लावू शकतो. रैनाला मिस्टर आयपीएल म्हणूनही ओळखले जाते, त्याच्या नावे आयपीएलमध्ये अनेक विक्रम आहेत. सुरेश रैन्नाने चेन्नई सुपर किंग्जकडून अनेक सामने खेळले आहेत. सीएसकेचे चाहते धोनीला थाला म्हणतात, तर त्यांनी सुरेश रैनाला चिन्ना थाला हे नाव दिले आहे.
आयपीएल २०२३ मध्ये धोनीच्या नेतृत्त्वाखाली CSKने पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले आणि त्यानंतर त्याने चाहत्यांना वचन दिले की तो आणखी एक वर्ष त्याच्या चाहत्यांसाठी आयपीएल खेळेल आणि त्याने आपले वचन पूर्ण केले आहे. २०२३ च्या आयपीएलनंतर धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. यानंतर धोनी एकदम फिट असल्याचे समजले जात होते. पण धोनीला त्रास होत असूनही तो संघासाठी आणि चाहत्यांसाठी खेळत आहे, असे संघाचे गोलंदाजी सहप्रशिक्षक एरिक सिमन्स यांनीही मुंबईच्या सामन्यानंतर सांगितले.