सध्या आयपीएल २०२४ म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा १७वा हंगाम खेळवला जात आहे. यंदाचे सर्वच संघ हे एकमेकांच्या तोडीस तोड असे आहेत, ज्यामध्ये विदेशी खेळाडूंसहित भारताचे आणि भारतातील अनकॅप्ड खेळाडूंचाही समावेश आहे. तर आयपीएलमधील सर्व संघांमध्ये महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भातील नेमके कोणकोणते खेळाडू आहेत याचा आढावा घेऊया.

महाराष्ट्र
यंदाच्या आयपीएल लिलावात काही नव्या खेळाडूंनाही आयपीएल संघाने खरेदी केले. यापैकी सुरूवातीला आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील कोणकोणते संघ आहेत. यामध्ये ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगारगेकर, मुकेश चौधरी, अर्शिन कुलकर्णी आणि राहुल त्रिपाठी हे महाराष्ट्रातील खेळाडू आहे.

Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Offical Sandip Bhondave Statement on Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad
Maharashtra Kesari 2025: “रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025 : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी; सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत
Ranji Trophy 2025 Mumbai defeated Meghalaya by an innings and 456 runs
Ranji Trophy 2025 : मुंबईचा मेघालयवर दणदणीत विजय; ८ विकेट्स आणि ८४ धावांसह शार्दूल ठाकूरचे महत्त्वपूर्ण योगदान
ICC T20 latest rankings announce Tilak Varma big jump in his T20 career batting rankings
ICC T20 Rankings : तिलक वर्माची ICC टी-२० क्रमवारीत मोठी झेप! कारकीर्दीत पहिल्यांदाच पटकावले ‘हे’ स्थान
Ranji Trophy 2025 Jammu Kashmir create history after beat Mumbai by 5 wickets in Elite group match
Ranji Trophy 2025 : जम्मू-काश्मीरने घडवला इतिहास! रोहित-यशस्वी रहाणे असतानाही मुंबईचा रणजीत दारूण पराभव
ICC Announces T20 Team of The Year 2024 Indias Rohit Sharma Named Captain of Squad
ICC T20I Team of The Year: ICC ने जाहीर केला सर्वाेत्कृष्ट टी-२० संघ २०२४, रोहित शर्मा कर्णधार; भारताच्या चार खेळाडूंना मिळाली संधी
Ranji Trophy 2025 Rohit Sharma suffers twin failure on Ranji return gets out for 28 in 2nd innings Mum vs JK match
Ranji Trophy 2025 : रोहित शर्मा रणजी ट्रॉफीच्या सलग दुसऱ्या डावात अपयशी, हिटमॅनचा झेलबाद झाल्याचा VIDEO व्हायरल

ऋतुराज गायकवाड आणि राजवर्धन हंगारगेकर
चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात अनेक मराठमोळ्या खेळाडूंचा भरणा आहे. महाराष्ट्रातील ऋतुराज गायकवाड आणि राजवर्धन हंगारगेकर हे दोन्ही खेळाडू चेन्नई संघात आहेत. महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाडकडे तर आता चेन्नई सुपर किंग संघाचे कर्णधारपदही आहे. यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी धोनीने त्याच्या खांद्यावरील कर्णधारपदाची जबाबदारी ही ऋतुराज गायकवाडकडे सोपवली. महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळताना जबरदस्त कामगिरी करणाऱ्या ऋतुराजने २०२० मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि पुढच्याच वर्षी म्हणजे २०२१ मध्ये तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला ज्याने ६२५ धावा केल्या होत्या. ऋतुराजच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आत्तापर्यंत सलग दोन सामने जिंकले आहेत.

चेन्नई सुपर किंग्सने राजवर्धनला २०२२ च्या आयपीएल मेगा लिलावामध्ये १.५ कोटी रुपये खर्चून संघात घेतले. राजवर्धनने आत्तापर्यंत आयपीएल मधील दोन सामने खेळले असून त्याने तीन विकेट मिळवले आहेत.

अर्शीन कुलकर्णी
महाराष्ट्रातील सोलापूरचा क्रिकेटपटू अर्शीन कुलकर्णी हा लखनऊ सुपर जॉईंट संघाचा भाग आहे. आयपीएल 2023 च्या निलावामध्ये लखनऊ संगाने त्याला त्याच्या मूळ किंमत म्हणजेच वीस लाख रुपयांना खरेदी केले. अर्शीन हा महाराष्ट्राच्या १६ आणि १९ वर्षाखालील संघात खेळतो. २०२३ मध्ये झालेल्या अंडर-१९ विश्वचषक संघातही आपले स्थान मिळवले होते. त्याच्या उत्कृष्ट फलंदाजी सोबत गोलंदाजी मध्येही आपली चमक दाखवून देत अष्टपैलू कामगिरी केली होती.

मुकेश चौधरी
चेन्नई सुपर किंग्स कडून मुकेश चौधरीने २०२२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. दीपक चहरच्या अनुपस्थितीत मुकेश चौधरीने संघासाठी उपयुक्त अशी कामगिरी केली होती. दीपक चहरच्या जागी मिळालेल्या संधीचा त्यांनी पुरेपूर फायदा करून घेत चेन्नईच्या वेगवान आक्रमणाचा मुख्य चेहरा झाला होता. 22 आयपीएल मध्ये त्यांनी 13 सामन्यात 16 विकेट्स मिळवल्या होत्या. 2023 आयपीएल मध्ये ही त्याच्याकडून अशीच अपेक्षा होती परंतु दुखापतीमुळे तो त्या हंगामात खेळू शकला नाही.

राहुल त्रिपाठी
महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या राहुल त्रिपाठीने आपल्या फलंदाजीने कायमच छाप पाडली आहे. आयपीएल २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजेन्ट्स कडून त्यांनी आयपीएल मध्ये पदार्पण केले. त्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि कोलकत्ता नायडर्स संघाताई होत होता. तिथेही त्याने अप्रतिम कामगिरी केली. त्यानंतर २०२२ च्या मेगालीला सनरायझर्स हैदराबादने त्याला ८.२५ कोटींना विकत घेतले. सध्या त्रिपाठी हा सनराइजर्स हैदराबाद संघाचा खेळाडू आहे. राहुल त्रिपाठी ने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ८९ सामन्यांमध्ये २७.२५ च्या सरासरीने ११ अर्धशतकांसह २०१७ धावा केल्या आहेत.

मुंबई

आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंचा समावेश आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, तुषार देशपांडे, प्रशांत सोळंकी, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, अंगक्रिश रघुवंशी, शम्स मुलानी, तनुष कोटियन

मुंबई इंडियन्स (रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शम्स मुलानी)
आयपीएलमधील यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात मुंबईमधील अनेक खेळाडूंचा भरणा आहे. मुंबई इंडियन्सच्या ताब्यात आयपीएल २०२४ मध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि शम्स मुलानी हे खेळाडू आहेत. रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने २०११ च्या लिलावामध्ये खरेदी केले होते. त्यानंतर २०१३ते २०२३ या कालावधीत रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आणि सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.

टी-२० क्रिकेट मधील अव्वल दर्जाचा खेळाडू असलेला सूर्यकुमार यादव हा देखील मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आहे. मुंबई इंडियन्सने २०१८ चा लिलावात सूर्यकुमार यादवला ३.२ कोटी खर्चून संघात घेतले. त्यापूर्वी सूर्यकुमार यादव हा कोलकत्ता नाईट रायडर्स संघाचा खेळाडू होता. यंदाच्या मोसमात सूर्यकुमार यादव हा दुखापत ग्रस्त असल्याने संघ बाहेर आहे. सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सचा मधल्या फळीतील महत्तवाचा फलंदाज आहे.

मुंबई इंडियन्स संघाने २०२३च्या लिलावामध्ये मुंबई क्रिकेट संघाकडून खेळणारा जबरदस्त गोलंदाज शम्स मुलानी याला खरेदी केले. मुलानीने रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली. शम्स मुलानीला यंदा मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. दोन्ही सामन्यात संघाचा भाग होता परंतु त्याला एकही विकेट मिळवता आलेली नाही.

चेन्नई सुपर किंग्स (अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि प्रशांत सोळंकी )

आयपीएल २०२४साठी चेन्नई सुपर किंग्सच्या ताब्यात मुंबईतील अनेक खेळाडू आहे ज्यामध्ये अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि प्रशांत सोळंकी यांच्या नावाचा समावेश आहे. २०२३च्या आयपीएल लिलावात चेन्नईने अजिंक्य रहाणेला संघात घेतले. २००८ मध्ये आयपीएलच्या सुरुवातीपासूनच अजिंक्य रहाणे आयपीएल मध्ये खेळत आहे. विविध आयपीएल संघांमधून खेळले अजिंक्य रहाणेचा अनुभव ही तितकाच तगडा आहे आणि त्याचमुळे चेन्नई संघाने त्याला खरेदी करत आपली मधली फलंदाजी फळी अधिक भक्कम केली.

चेन्नईच्या ताब्यात असलेले वरील सर्व खेळाडू हे मुंबईकडून रणजी ट्रॉफी खेळतात. चेन्नईने २०२२ मध्ये शिवम दुबेला खरेदी केले. सध्या शिवम दुबे हा चेन्नई सुपर किंग्स साठी एक उत्कृष्ट फिनिशर असल्याची भूमिका बजावत आहे.

चेन्नईने दुबे प्रमाणेच तुषार देशपांडेला ही २०२२च्या आयपीएल लिलावात खरेदी केले होते. पण खऱ्या अर्थाने २०२३ चा हंगाम त्याच्यासाठी यशस्वी ठरला. देशपांडेने २०२३ मधील १६ सामन्यांमध्ये खेळताना २१ विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली होती ज्यामध्ये तो पर्पल कॅप जिंकण्याच्या शर्यतीतही होता. यंदाही सर्वांच्याच नजरा तुषार देशपांडेवर आहेत ज्याने रणजी ट्रॉफी चांगली कामगिरी केली.

चेन्नई ने २०२३च्या आयपीएल लिलावात शार्दुल ठाकूरला खरेदी केल्याने त्याचे आपल्या जुन्या संघात पुनरागमन झाले. शार्दुलने २०१४मध्ये पंजाब किंग संघाकडून आयपीएल पदार्पण केले होते. त्यानंतर शार्दुल रायझिंग पुणे सुपर जॉन्स चेन्नई सुपर किंग्स दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स संघाकडून खेळला. यानंतर आता चेन्नईने पुन्हा शार्दुलला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.

चेन्नई ने २०२२च्या आयपीएल लिलावात प्रशांत सोळंकी ला संघात सामील केले. प्रशांत सोळंकी हा एक उत्कृष्ट फिरकीपटू आहे. 2022 मध्ये प्रशांतला दोन सामने खेळण्याची संधी मिळाली होती. यंदाच्या मोसमात त्याला खेळण्याची संधी मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अंगक्रिश रघुवंशी
कलकत्ता नाईट रायडर्स संघाने अंगकर रघुवंशी याला 2023 च्या आयपीएल मध्ये वीस लाख रुपये खर्चून संघात घेतले. 2022 मध्ये तो कोणत्याच संघाचा भाग नव्हता. आरसीबी आणि केकेआर विरुद्ध नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये आयपीएल मध्ये पदार्पणाची संधी मिळाली. अंगक्रिश रघुवंशी ला वरून चक्रवर्ती च्या जागी इम्पॅक्ट खेळाडू म्हणून खेळण्याची संधी मिळाली.

पृथ्वी शॉ
मुंबई क्रिकेट संघाचा उत्कृष्ट सलामी वीर फलंदाज पृथ्वी शॉ याने 2018 मध्ये आयपीएल मध्ये पदार्पण केले. सध्या तो दिल्ली कॅपिटल संघाचा भाग आहे. भारताच्या अंडर 19 संघाचा कर्णधार पद भूषवलेल्या पृथ्वीच्या यंदाच्या मोसमात अजूनही खेळताना दिसलेला नाही. शहाणे त्याच्या आईपीएल कारकिर्दीत ७१ सामन्यांमध्ये १६९४ धावा केलेले आहेत.

तनुष कोटियन, यशस्वी जैस्वाल

मुंबई क्रिकेट संघाचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून तनुष्कोटी यांनी आपली ओळख मिळवली आहे. यंदा झालेल्या रणजी ट्रॉफी मध्ये तनुषकोटी यांनी मुंबईसाठी अष्टपैलू कामगिरी केली ज्यासाठी त्याची जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही निवड करण्यात आली. चमकदार गोलंदाजी सहज तो आपल्या फलंदाजीसाठी ओळखला जातो. रणजी ट्रॉफी मधील शानदार कामगिरीनंतर आयपीएल सुरू होण्याच्या काही दिवस आधीच राजस्थान रॉयल संघाने तनुष ला आपल्या ताफ्यात सामील केले. राजस्थानने ऍडम झंपाच्या जागी तनुषकोटी यांची निवड केली.

यशस्वी जैस्वाल हा मुंबई क्रिकेट संघाचा एक उत्कृष्ट फलंदाज आहे जो सध्या आपल्या कामगिरीची जगभरात छाप पाडत आहे. २०२० मध्ये यशस्वीने राजस्थान संघाकडून आयपीएल संघाकडून पदार्पण केले. यशस्वीला राजस्थान संघाने २.४० कोटींना विकत घेतले. त्याने आतापर्यंत ३९ सामन्यांमध्ये १२०१ धावा केल्या आहेत. २०२३ मध्ये यशस्वीने आपल्या आयपीएलधील जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले.

श्रेयस अय्यर
मुंबईकर श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आहे. अय्यरने २०१५ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. दिल्ली संघासाठी सात हंगाम खेळल्यानंतर श्रेयसला २०२२च्या मेगा लिलावात केकेआरने खरेदी करत संघाचा कर्णधार केले. अय्यरने आय़पीएलमध्ये आतापर्यंत १०३ सामने खेळले असून त्यात २८१५ धावा केल्या आहेत.

विदर्भातील खेळाडू (दर्शन नालकांडे, यश ठाकूर, जितेश शर्मा आणि अथर्व तायडे )

आयपीएल मध्ये फक्त मुंबई आणि महाराष्ट्रातीलच नाही तर विदर्भातील ही काही खेळाडू आहेत. दर्शन नालकांडे, यश ठाकूर, जितेश शर्मा आणि अथर्व तायडे हे चार खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना आपल्याला दिसतात.

विदर्भ क्रिकेट संघाचा मध्यमगती गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज असा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू ओळखला जाणारा दर्शन नालकांडे हा आयपीएल मध्ये गुजरात टायटन संघाचा भाग आहे. दर्शनने २०२२ मध्ये गुजरात टायटन्स कडून आयपीएल मध्ये पदार्पण केले. दर्शनने तीन आयपीएल सामन्यांमध्ये तीन विकेट्स मिळवले आहेत.

विदर्भ संघाचा डावखुरा सलामीवीर फलंदाज अथर्व तायडे हा पंजाब किंग संघाकडून खेळतो. अथर्व तायडेला सलग तिसऱ्या वर्षी पंजाब संघाकडून आयपीएल स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. अथर्वला आत्तापर्यंत सात आयपीएल सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे यामध्ये त्यांने १८६ धावा केल्या असून यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

जितेश शर्मा हा आयपीएल २०२४ च्या मोसमात पंजाब किंग्सचा उपकर्णधार आहे. जितेश ने २०२२मध्ये आयपीएल पदार्पण केले. जितेश ने आयपीएल मध्ये खेळलेल्या २९ सामन्यांमध्ये ५८५ धावा केले आहेत.


विदर्भच्या यश ठाकूरने २०२३च्या आयपीएल मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून पदार्पण केले. यश ठाकूर या वेगवान गोलंदाजाने आत्तापर्यंत १० सामने खेळले असून त्यामध्ये त्यांनी १३ विकेट मिळवले आहे.

Story img Loader