Bengaluru man cheated Rs 3 lakh while buying CSK vs RCB match ticket : चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या शनिवारी आमनेसामने येणार आहेत. हा सामना एखाद्या एलिमिनेटरपेक्षा कमी नसल्यामुळे, या सामन्याबाबत संपूर्ण भारतात जबरदस्त वातावरण आहे. जवळपास प्रत्येक क्रिकेटप्रेमी हा सामना पाहण्यासाठी मैदानावर जाण्यास इच्छुक आहे. त्यामुळेच तिकिटांसाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. आता तिकीट खरेदीच्या प्रक्रियेत एका व्यक्तीची हजारो नव्हे, तर ३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तिकीट खरेदी करण्याचा प्रयत्न करत असताना एक चाहता फसवणूक करणाऱ्या एजन्सीच्या गळाला लागला आहे. ज्यामुळे त्याची ३ लाख रुपयांची फसवणूक झाली. इन्स्टाग्रामवरील एका अकाऊंटवरून ही स्टोरी पोस्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये तिकिटांच्या उपलब्धेबाबत विचारण्यात आले होते. तिकिटांची विक्री करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे नाव पद्म सिन्हा विजय कुमार असे सांगून स्वत:ला आयपीएल तिकिटे विकणारा अधिकृत कर्मचारी असल्याचे सांगितले आहे.

minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
ca ambar dalal
अंबर दलाल प्रकरणात २२ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ११०० कोटींचा गैरव्यवहार
IRCTC Refund Policy check how much refund will be given on canelled tickets of trains
IRCTC Refund Policy: ट्रेनची तिकीट रद्द केल्यावर किती ‘रिफंड’ मिळतो? जाणून घ्या सविस्तर
Dhankawadi gambling den, Raid on gambling den,
पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा

काय आहे संपूर्ण प्रकरण?

समर्थ नावाच्या व्यक्तीने आयपीएल तिकिटांबाबत फसवणूक झाल्याचा दावा केला आहे. समर्थ हा बंगळुरूमधील सुधामा नगरचा रहिवासी आहे. इन्स्टाग्रावर, समर्थने सीएसके विरुद्ध आरसीबी सामन्याची तिकिटे खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक केले. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव पद्म सिंह विजय कुमार असे सांगून स्वतःला आयपीएलचा अधिकृत कर्मचारी असल्याचे सांगितले. समर्थांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यानी त्याचा नंबर आणि आधार कार्डही पाठवले. अशा परिस्थितीत समर्थ यांनी पद्मा सिन्हा यांना २,३०० रुपये किमतीची ३ तिकिटे खरेदी करण्यासाठी एकूण ७,९०० रुपये दिले.

हेही वाचा – IPL कामगिरीमुळे २० वर्षीय भारतीय खेळाडूचे उजळले नशीब, ‘या’ लीगचा ठरला सर्वात महागडा खेळाडू

असे असतानाही समर्थ यांना ई-तिकीट न मिळाल्याने पद्मा सिन्हा यांनी त्यांच्याकडे ६७ हजार रुपयांची मागणी केली. समर्थ यांनी एवढ्या पैशांची मागणी करण्याचे कारण विचारले असता, आयपीएलचा अधिकृत कर्मचारी असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने सबब सांगण्यास सुरुवात केली. त्या व्यक्तीला विश्वासात घेतल्यानंतर समर्थने स्वतंत्र पेमेंट करून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला एकूण तीन लाख रुपये पाठवले. एवढे करूनही त्याला तिकीट मिळाले नाही. या घटनेमुळे समर्थ नावाच्या व्यक्तीने सायबर क्राईम पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयपीसीच्या कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला असून एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यांची तिकिटे आरसीबीच्या अधिकृत वेबसाइट आणि काउंटरवरच उपलब्ध आहेत.