इंडियन प्रीमियर लीग २०२४ (IPL 2024) सुरू होण्यापूर्वी स्मार्ट रिप्ले सिस्टीम येणार आहे. ही DRS ची अद्ययावत आवृत्ती असणार आहे. या प्रणालीच्या मदतीने पंचांना योग्य निर्णय घेण्यास मोठी मदत होईल. ईएसपीएनने दिलेल्या अहवालात दावा केला जात आहे की आयपीएल २०२४ मध्ये डीआरएस नसून एसआरएस असेल. ही यंत्रणा कशी काम करेल हे समजून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

– quiz

या अहवालानुसार हॉक आयचे आठ हायस्पीड असलेले कॅमेरा संपूर्ण मैदानात ठेवण्यात येतील. निर्णय घेण्याची अचूकता आणि गती वाढवण्यासाठी स्मार्ट रिप्ले सिस्टम वापरले जाईल. हॉक आयचे दोन ऑपरेटर हे टीव्ही पंचांसोबत असतील. टीव्ही पंचांना या दोन हॉक-आय ऑपरेटरकडून थेट इनपुट मिळतील. हॉक-आयच्या आठ हाय-स्पीड कॅमेऱ्यांच्या मदतीने टिपलेले फोटो तो टीव्ही पंचांना देतील. आतापर्यंत टीव्ही ब्रॉडकास्ट डायरेक्टर हे थर्ड अंपायर आणि हॉक-आय ऑपरेटर यांच्यामध्ये असायचे. या नव्या प्रणालीत हे नसेल.

आतापर्यंत, प्रसारकांना झेल घेताना क्षेत्ररक्षकाचे पाय आणि हात स्प्लिट स्क्रीनवर एकाच वेळी दाखवता येत नसतं. पण आता नवीन प्रणालीमध्ये, स्प्लिट स्क्रीनमध्ये पायांसह चेंडू केव्हा पकडला जातो आणि केव्हा सोडला जातो हे अंपायर पाहू शकतील. आयपीएल २०२३ पर्यंत, हॉक-आय कॅमेरे प्रामुख्याने बॉल ट्रॅकिंग आणि अल्ट्रा-एजसाठी वापरले जात होते. त्यामुळे प्रसारकांनी एलबीडब्ल्यू् आणि बॅटच्या किनाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मैदानावरील रेफरल्ससाठी त्यांच्या स्वतःच्या कॅमेऱ्यातील फुटेज मोठ्या प्रमाणावर वापरले. यामध्ये स्टंपिंग, रन-आऊट, झेल आणि ओव्हरथ्रोसाठी रेफरल्सचा समावेश होता.

स्टंपिंगसाठी नवीन प्रणाली टीव्ही अंपायरला तीन फोटो देणार आहे. साइड-ऑन कॅमेऱ्यांचे फ्रंट-ऑन फुटेज देखील त्याच वेळी दिसेल. फ्रंट-ऑन कॅमेरा अँगल महत्त्वाचा असतो कारण बेल्स पडून बाद झाल्याचा स्पष्ट फोटो मिळतो. पूर्वीचे ब्रॉडकास्टर स्टंप कॅमच्या फुटेजसह प्रत्येक बाजूचे कोन दाखवत असत. परंतु स्टंप कॅम्स सुमारे ५० फ्रेम्स प्रति सेकंद या वेगाने क्रिया रेकॉर्ड करतात, तर हॉक-आय कॅमेरे सुमारे ३०० फ्रेम्स प्रति सेकंद वेगाने रेकॉर्ड करतात.

आता पंचांना त्यांचे निर्णय घेण्यासाठी अधिक अचूक फुटेज उपलब्ध असेल. स्मार्ट रिव्ह्यू सिस्टीम जमिनीपासून काही इंच वर पकडलेल्या कॅचच्या बाबतीतही अधिक स्पष्टता देईल. अशा संदर्भांमुळे भूतकाळात टीव्ही पंचांच्या निर्णयांवर वाद निर्माण झाला आहे. पण आता या नव्या प्रणालीमुळे निर्णय घेणं अधिक सुलभ होणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 to introduce smart replay system with hawk eye operators for quick and accurate reviews know details in marathi bdg