IPL 2024, Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad: आयपीएलमधील दिल्ली-हैदराबादच्या सामन्यात अरूण जेटली स्टेडियमवर ट्रॅव्हिस हेडचे जणू तुफान आले होते. अगदी सुरूवातीपासूनच हेडने दिल्लीच्या गोलंदाजांना आस्मान दाखवले. केवळ ३२ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकारांसह हेडने ८९ धावा केल्या. यादरम्यान हेडने असे अनेक फटके मारले ज्याची कल्पना दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनीही केली नसेल. सनरायझर्स हैदराबादचे सलामीवीर अशक्य फॉर्मात आहेत हे माहितच होते. पण गोलंदाजांची इतकी वाईट अवस्था होईल, असे कोणालाही नक्कीच वाटले नव्हते. हेडचे शतक अवघ्या ११ धावांनी हुकले असले तरी त्याने ८९ धावांच्या खेळीत अनेक विक्रम आपल्या नावे केले.
कुलदीप यादवला बाद करण्यापूर्वी अभिषेक शर्मासह ट्रॅव्हिस हेडने प्रत्येक षटकात गोलंदाजांची धुलाई केली. प्रत्येक चेंडूवर षटकार किंवा चौकारांची आतिषबाजी सुरू आहे. अक्षरश धावांची टांकसाळच त्याने सुरू केली होती. ६ षटकांचा पॉवर प्ले संपला तेव्हा हैदराबादने एकही विकेट न गमावता तब्बल १२५ धावा केल्या होत्या. हेडने २६ चेंडूत ८४ धावा केल्या होत्या, तर अभिषेकने १० चेंडूत ४० धावा केल्या होत्या.
आयपीएलमधील कोणत्याही संघाकडून सर्वात जलद २०० धावा
१४.१ – RCB vs PBKS, बेंगळुरू, २०१६(१५ षटकांचा सामना)
१४.४ – SRH vs MI, हैदराबाद, २०२४
१४.५ – DC vs SRH, दिल्ली, आज*
१४.६ – SRH vs RCB, बेंगळुरू, २०२४
१५.२ – KKR vs DC, विशाखापट्टणम, २०२४
IPL मधील पहिल्या १० षटकांनंतरची सर्वोच्च धावसंख्या
१५८/४: DC vs SRH, दिल्ली, २०२४ (आज)
१४८/२: SRH vs MI, हैदराबाद,२०२४
१४१/२: MI vs SRH, हैदराबाद, २०२४
१३५/१: KKR vs DC, विशाखापट्टणम, २०२४
आयपीएलमध्ये SRH साठी पॉवर प्लेमधील सर्वोच्च धावसंख्या
८४(२६): ट्रॅव्हिस हेड विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली, २०२४ (आज)
६२(२५): डेव्हिड वॉर्नर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, हैदराबाद,२०१९
५९(२०): ट्रॅव्हिस हेड विरुद्ध मुंबई इंडियन्स, हैदराबाद, २०२४
५९*(२३): डेव्हिड वॉर्नर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, हैदराबाद, २०१५