भारतात इंडियन प्रीमियर लीग ही जणू एखादा सोहळाच असतो. आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंसोबत जगभरातील विविध खेळाडू खेळत असतात, त्यामुळे ही स्पर्धा फक्त भारतातच नाहीतर जगभरात प्रसिध्द आहे. आयपीएलमध्ये १० विविध फ्रँचायझी आहेत आणि प्रत्येक संघाचा हा वेगळा चाहता वर्ग आहे. काही संघांना जेतेपद पटकावता आलं तर काही संघ हे एकदाही ट्रॉफी आपल्या नावे करू शकले नाहीत. प्रत्येक आयपीएल फ्रँचायझीचे ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंट्स आहेत आणि प्रत्येक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर लाखो, करोडोंच्या संख्येने चाहते फॉलो करत असतात. संघाच्या येणाऱ्या प्रत्येक पोस्टवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव करत असतात. तर आयपीएल २०२४ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी आपण पाहूया की कोणत्या संघांचा सोशल मिडिया म्हणजेच इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर आपला दबदबा आहे.

सोशल मिडियावर सर्वाधिक फॉलोअर्स हे चेन्नई सुपर किंग्ज संघाचे आहेत, खालोखाल मुंबई इंडियन्सचा संघ आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आरसीबीचा संघ आहे. त्यांच्यानंतर कोलकाता संघाचा चाहता वर्गही मोठा आहे, हे आकड्यांवरून समजते. त्यांच्या खालोखाल इतर संघ आहेत.

Jaya Kishori Viral Photo fact check
जया किशोरींनी सुरू केले मॉडेलिंग! व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; वाचा, नेमकं सत्य काय?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
DoT recruitment 2024 Apply for Sub Divisional engineer salary up to Rs 151100
DoT recruitment 2024: सब-डिव्हिजन इंजीनिअरच्या पदासाठी होणार भरती;१,५१,१०० रुपयांपर्यंत मिळेल पगार, आताच करा अर्ज
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
top 10 search on google in 2024
Google Search: भारतीय गुगलवर गेल्या वर्षभरात काय शोधत होते माहितीये? गुगल सर्च रिपोर्टची माहिती आली समोर!
Bharti Airtel Indias first spam fighting network
Spam Fighting Solution :Airtel चं पहिलं AI नेटवर्क सोल्युशन! सर्वाधिक स्पॅम कॉल, मॅसेज मुंबई आणि दिल्लीमध्येच; वाचा, सविस्तर रिपोर्ट
Venkatesh Iyer Completed His MBA and Now Pursuing PhD in Finance
IPL 2025: आयपीएल लिलावात २३ कोटींपेक्षा जास्त बोली अन् आता होणार डॉक्टर, कोण आहे हा खेळाडू?
Best Web Series of 2024
२०२४ मधील गाजलेल्या वेब सीरिजची यादी, तुम्ही पाहिल्यात का ‘या’ कलाकृती?

– quiz

आयपीएल ट्रॉफीचे जेतेपद सर्वात प्रथम ५ वेळा आपल्या नावे करणारा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. मुंबई इंडिन्स संघाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली आयपीएलची ५ विजेतेपद पटकावली. आयपीएलप्रमाणेच मुंबई इंडियन्सचा सोशल मिडियावर दबदबा असून तिन्ही सोशल मिडिया अॅपवर त्यांचे एकूण फॉलोअर्स तब्बल ३४.७ मिलियन आहेत. इंस्टाग्रावर एकूण १२.५ मि, फेसबुकवर १४ मि आणि ट्विटरवर ८.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वी मुंबई संघाने मोठा निर्णय घेतला ते म्हणजे गुजरात टायटन्सच्या हार्दिक पांड्याला ट्रेड करत त्यांनी रोहितचे कर्णधारपद त्याला देऊ केले. सर्वच मुंबईच्या चाहत्यांसाठी हा धक्कादायक निर्णय होता आणि निर्णयाचा परिणाम मुंबईच्या सोशल मिडिया अकाऊंट्सवर पाहायला मिळाला. लाखोंच्या संख्येने मुंबईचे फॉलोअर्स कमी झाले.

IPL 2024 Which Team Has The Most Followers on Social Media

हेही वाचा: IPL 2024: पॅट कमिन्स चालवणार शेन वॉर्नचा वारसा? ट्वेन्टी२० प्रकारात पहिल्यांदाच कर्णधाराच्या भूमिकेत

चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सोशल मिडियावर सर्वाधिक ३७.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली सीएसके संघानेही ५ वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. धोनीचा मोठा चाहता वर्ग हा चेन्नईच्या बाजूने कायमचं पाहायला मिळाला आहे.त्याचसोबत संघाचा कोचिंग स्टाफही प्रसिध्द खेळाडूंनी परिपूर्ण असणार आहे. चेन्नई संघाचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक १३.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर मुंबई इंडियन्सच्या तुलनेत त्यांचे फेसबुकवरील फॉलोअर्स एक मिलियनने कमी असून १३ मिलियन आहेत. तर ट्विटरवर मुंबईपेक्षा २ मिलियनने संघाचे फॉलोअर्स जास्त असून एकूण आकडा १०.३ मिलियनच्या घरात आहे.

विराट कोहलीची संघ म्हणून प्रसिध्द असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सर्वाधिक सोशल मिडिया फॉलोअर्सच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई आणि चेन्नई संघ पाहता आरसीबीने एकदाही आयपीएलचे जेतेपद जिंकलेले नाही. पण तरीही संघाचा चाहता वर्ग हा २९ मिलियनइतका मोठा आहे. आरसीबीने जेतेपद जिंकले नसले तरी विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस गेल, फाफ डू प्लेसिससारखे बडे बडे खेळाडू संघाचा भाग आहेत. त्यांच्या खेळातील सातत्य आणि खेळाडू यांच्या जोरावर त्यांना मोठा चाहता वर्ग लाभला आहे. मुंबई आणि चेन्नईच्या बरोबरीने आरसीबीचे १२ मिलियन इतके जबरदस्त फॉलोअर्स इंस्टाग्रामवर आहेत तर फेसबुकवर १० मिलियन आणि ट्विटरवर ७ मिलियन फॉलोअर्सचा आकडा आहे.

हेही वाचा: IPL 2024 मध्ये स्मार्ट रिप्ले सिस्टीम आणण्याच्या तयारीत, वाचा काय आहेत फायदे

आरसीबीच्या खालोखाल कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आहे, ज्यांनी गौतम गंभीरच्या नेतृत्त्वाखाली २०१२ आणि २०१४ मध्ये जेतेपद मिळवले होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मुंबई, चेन्नईला मागे टाकत केकेआरचे फेसबुकवर सर्वाधिक १७ मिलियन फॉलोअर्स आहेत.पण इंस्टाग्रामवर वरील तिन्ही संघांच्या तुलनेत कमी म्हणजेच ४.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर ५.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.

सर्वाधिक सोशल मिडिया फॉलोअर्स असलेले टॉप ५ संघ
चेन्नई सुपर किंग्ज – ३७.२ मिलियन
मुंबई इंडियन्स – ३४.२ मिलियन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – २९ मिलियन
कोलकाता नाईट रायडर्स – २६.६ मिलियन
पंजाब किंग्ज – १४.८ मिलियन

राजस्थान रॉयल्सचा संघ ज्याने आयपीएल २००८चे पहिले जेतेपद पटकावले होते. त्या संघाचा सोशल मिडियावरील सहभाग आणि संघाचा चाहता वर्ग फारच कमी आहे. जास्तीत जास्त ५ मिलियनपर्यंत त्यांचे फॉलोअर्स आहेत. तर सनरायझर्स हैदराबाद ज्यांनी डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखाली २०१६ मध्ये जेतेपद पटकावले होते, त्यांचा ही चाहता वर्ग इतर संघांच्या तुलनेत कमी आहे. फेसबुकवर हैदराबाद संघाचे राजस्थानरपेक्षा १ मिलियनपेक्षा जास्त ६.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर इंस्टाग्रामवर दोन्ही संघाचे फॉलोअर्स ३ मिलियनच्या घरात आहेत. तर ट्विटरवर राजस्थानचे २.८ मिलियन तर त्यापेक्षा जास्त हैदराबादचे ३.२ मिलियन फॉलोअर्स आहेत.

हेही वाचा: IPL 2024: नवज्योत सिंग सिद्धू आयपीएलमधून पुन्हा कॉमेंट्रीच्या खेळपट्टीवर परतणार; लोकसभा निवडणुकीपासून राहणार लांब

पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना एकदाही जेतेपद मिळवता आले नाही. संघांमधील बदल, कर्णधार बदलणे आणि खेळातील सातत्याचा अभाव यामुळे संघाला जेतेपदावर नाव कोरता आले नाही. त्यामुळे अधिक विश्वासार्हता नसल्याने संघाचा चाहता वर्गही कमी प्रमाणात आहे. पण विजेतेपद पटकावलेल्या राजस्थान आणि हैदराबाद यांच्या तुलनेत या दोन्ही संघांचा फेसबुकवर ८ मिलियनच्या घरात फॉलोअर्सचा आकडा आहे.तर ट्विटर, इंस्टाग्रामवर २ते ३ मिलियनच्या घरात ही संख्या आहे.

लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे संघ नवीन असून आतापर्यंत त्यांनी दोन हंगामच खेळले आहेत. लखनऊचा चाहता वर्ग तिन्ही सोशल मिडियावर प्लॅटफॉर्मवर ४.४७ मिलियन इतका असून सर्वात कमी आहे. तर त्यांच्या तुलनेत पहिल्याच सीझनमध्ये जेतेपद पटकावलेल्या गुजरात टायटन्स संघ यात पुढे आहे आणि त्यांचे ५.३६ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Story img Loader