आयपीएलमध्ये २०० विकेट्सचा टप्पा गाठणारा युजवेंद्र चहल हा पहिला गोलंदाज ठरला आहे. राजस्थान विरूध्द मुंबईच्या सामन्यात त्याने एक विकेट घेताच ही ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावे केली आहे. पहिल्या डावात मोहम्मद नबीला बाद करून ही कामगिरी त्याने आपल्या नावे केली आहे. चहलने त्याच्याच चेंडूवर नबीचा झेल घेतला. यावर त्याची पत्नी धनश्री वर्मा हिची प्रतिक्रिया आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चहलची पत्नी धनश्रीने २०० विकेट्स पूर्ण झाले त्या क्षणाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला त्यावरील कॅप्शनने सर्वांच लक्ष वेधलं – ‘तो एक महान खेळाडू आहे. मी हे आधीपासूनच सांगत होते.’ धनश्री कायमच चहलच्या कामगिरींवर आपली प्रतिक्रिया देत असते. ती अनेकदा संघाला चिअऱ करण्यासाठीही मैदानात उपस्थित असते.

चहलच्या पत्नीची इन्स्टाग्राम स्टोरी

आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज
२०१३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणारा चहल आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसह तीन संघांसाठी खेळला आहे. मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्जचा माजी गोलंदाज ड्वेन ब्राव्होला (१६१ सामन्यांमध्ये १८३ विकेट) मागे टाकून चहल आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. चहलने आपल्या १५३व्या सामन्यात हा टप्पा गाठला. स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा चहल या यंदाच्या आयपीएलमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक १३ विकेट घेणारा गोलंदाज आहे.

चहलच्या आधी केवळ दोनच खेळाडूंनी टी-२० स्पर्धेत २०० विकेट्सचा टप्पा गाठला आहे. डॅनी ब्रिग्स (२१९) आणि समित पटेल (२०८) यांनी इंग्लंडच्या टी-२० ब्लास्टमध्ये ही कामगिरी केली आहे. अशाप्रकारे, एखाद्या स्पर्धेत (व्यावसायिक लीग) २०० किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 yuzvendra chahal wife dhanashree verma reaction on his 200 wickets in ipl history rr vs mi bdg