Ipl 2025 Auction All 10 Teams Purse Remaining After Day of Mega Auction: IPL 2025 च्या मेगा लिलावाच्या पहिल्याच दिवशी ऋषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. याशिवाय अनेक खेळाडूंवर १० कोटींपेक्षा अधिक बोली लागल्या आहेत. लिलावाचा आज दुसरा दिवस आहे. ज्यामध्ये उर्वरित ४९३ खेळाडूंवर बोली लागणार आहे. लिलावाच्या दुसऱ्या दिवशी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला जास्तीत जास्त १६ खेळाडू हवे आहेत. कोणत्या संघाच्या पर्समध्ये किती पैसे शिल्लक आहेत ते जाणून घेऊया.

आयपीएलच्या पहिल्याच दिवशी ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर या खेळाडूंवर २० कोटींहून अधिक बोली लागल्या आहेत. ऋषभ पंतसाठी लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटींची मोठी बोली लावत आपल्या संघात सामील केलं आहे. तर अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल या गोलंदाजांवर १८ कोटींची मोठी बोली लागली आहे.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
DoT recruitment 2024 Apply for Sub Divisional engineer salary up to Rs 151100
DoT recruitment 2024: सब-डिव्हिजन इंजीनिअरच्या पदासाठी होणार भरती;१,५१,१०० रुपयांपर्यंत मिळेल पगार, आताच करा अर्ज
ICC test Rankings Harry Brook Becomes No 1 Ranked Test Batter Virat Rohit Suffer Massive Dip
ICC Test Rankings: विराट-रोहितला कसोटी क्रमवारीत धक्का, जो रूटला मागे टाकत ‘हा’ खेळाडू पहिल्या स्थानी, टॉप-१० मध्ये भारताचे किती खेळाडू?
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
Venkatesh Iyer Completed His MBA and Now Pursuing PhD in Finance
IPL 2025: आयपीएल लिलावात २३ कोटींपेक्षा जास्त बोली अन् आता होणार डॉक्टर, कोण आहे हा खेळाडू?

हेही वाचा – IPL Auction 2025: पहिल्याच दिवशी ‘या’ ४ संघांना मिळाला कर्णधार, तीन खेळाडू ठरले IPL इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू

आयपीएल लिलावात एकूण ५७७ खेळाडूंची नावे आहेत. लिलावात सध्या फक्त ८४ खेळाडूंवर बोली लागली आहे. जागतिक क्रिकेटमधील अनेक मोठ्या खेळाडूंची नावं अद्याप लिलावात आलेली नाहीत. मात्र, फ्रँचायझीकडे आता तेवढे पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. दुसऱ्या दिवशी, रॉयल चॅलेंजर्स बंगळरूकडे सर्वाधिक ३०.६५ कोटी रुपये शिल्लक आहेत आणि ते सर्वात मोठी रक्कम घेऊन येतील. त्यानंतर मुंबई इंडियन्स (२६.१० कोटी) आणि पंजाब किंग्ज (२२.५० कोटी) आहेत.

हेही वाचा – Trent Boult MI: मुंबई इंडियन्स एकाच खरेदीसह अधिक मजबूत, ट्रेंट बोल्टची घरवापसी; बुमराह-बोल्टची जोडी ठरणार इतर संघांसाठी डोकेदुखी

IPL 2025 मेगा लिलावाच्या पहिल्या दिवसानंतर संघांकडे उरलेली रक्कम

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ३०.६५ कोटी
मुंबई इंडियन्स – २६.१० कोटी
पंजाब किंग्स – २२.५० कोटी
गुजरात टायटन्स – १७.५० कोटी
राजस्थान रॉयल्स – १७.३५ कोटी
चेन्नई सुपर किंग्ज – १५.६० कोटी
लखनौ सुपर जायंट्स – १४.८५ कोटी
दिल्ली कॅपिटल्स – १३.८० कोटी
कोलकाता नाईट रायडर्स – १०.०५ कोटी
सनरायझर्स हैदराबाद – ५.१५ कोटी

हेही वाचा – IPL Auction 2025: १२ खेळाडूंवर संघांनी खर्च केले १८०.५० कोटी; शमी, सिराज, राहुलवर किती लागली बोली?

कोणत्या संघाला किती खेळाडूंची गरज?

आयपीएलमध्ये एका संघात जास्तीत जास्त २५ खेळाडू असू शकतात. यामध्ये विदेशी खेळाडूंची संख्या ८ पर्यंत असू शकते. पहिल्या दिवसाच्या लिलावानंतर गुजरात टायटन्सने सर्वाधिक १४ खेळाडू खरेदी केले. त्यांना आता आणखी ११ खेळाडूंची गरज आहे. यामध्ये ५ विदेशी खेळाडू असू शकतात. तर मुंबई इंडियन्स आणि आरसीबीला १६-१६ खेळाडूंची गरज आहे.

हेही वाचा – Yuzvendra Chahal IPL Auction: युझवेंद्र चहलच्या फिरकीची पंजाबला भुरळ; लिलावात प्रचंड बोली लागणारा पहिलाच भारतीय फिरकीपटू

IPL 2025 मेगा लिलावाच्या पहिल्या दिवसानंतर राहिलेले स्लॉट (विदेशी खेळाडूंचे स्लॉट कंसात)

मुंबई इंडियन्स – १६ (७)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – १६ (५)
राजस्थान रॉयल्स – १४ (४)
चेन्नई सुपर किंग्ज – १३ (४)
लखनौ सुपर जायंट्स – १३ (४)
पंजाब किंग्स – १३ (६)
सनरायझर्स हैदराबाद – १२ (४)
कोलकाता नाइट रायडर्स – १२ (३)
दिल्ली कॅपिटल्स – १२ (४)
गुजरात टायटन्स – ११ (५)

Story img Loader