IPL 2025 Auction Players List With 2 Crore Base Price: आयपीएल २०२५ महालिलावासाठी ११६५ भारतीय खेळाडूंनी नाव नोंदवलं आहे. तर एकूण १५७४ खेळाडू आयपीएल २०२५ च्या लिलावात उतरणार आहेत. खेळाडूंचा हा महालिलाव येत्या २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दा येथे होणार आहे. ११६५ भारतीय खेळाडूंपैकी २३ भारतीय खेळाडूंची मूळ किंमत सर्वाधिक २ कोटी ठेवण्यात आली आहे. ऋषभ पंत, केएल राहुल आणि गतवर्षीचा आयपीएल चॅम्पियन कर्णधार श्रेयस अय्यर हे रिलीज झालेले खेळाडू २ कोटींच्या कॅटगरीमध्ये आहेत.

२ कोटींच्या कॅटगरीत असलेले भारतीय खेळाडू

ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, खलील अहमद, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, दीपक चहर, व्यंकटेश अय्यर, आवेश खान, इशान किशन, मुकेश कुमार, भुवनेश्वर कुमार, प्रसीद कृष्णा, टी नटराजन, कृणाल पंड्या, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, देवदत्त पडिक्कल आणि मोहम्मद शमी.

IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
IPL Auction 2025 Italian Player Thomans Jack Draca Registered First Time for Mega Auction Who Represented Mumbai indians
IPL Auction 2025: आयपीएल लिलावात पहिल्यांदाच या देशाच्या खेळाडूचा सहभाग; मुंबई इंडियन्सशी आहे खास कनेक्शन
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
IPL Auction 2025 42 year old James Anderson registers for first time last played T20 in 2014 What is Base Price
IPL Auction 2025: आयपीएल लिलावात दिसणार ४२ वर्षीय खेळाडू, १५ वर्षांपूर्वी खेळला होता अखेरचा टी-२० सामना; ‘या’ संघाचा आहे गोलंदाजी कोच
IPL 2025 Retention CSK Announce Retained Players With Riddle of 5 Names see Cryptic Social Media Post
IPL 2025 Retention: हेलिकॉप्टर, किवी…; CSKने दिली मोठी हिंट, जाहीर केली रिटेन खेळाडूंची यादी? पाहा कोण आहेत ‘हे’ ५ खेळाडू
IND vs SA T20I Series Full Schedule With Date and Time with IST And Squads India South Africa
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचं कसं असणार वेळापत्रक? भारतीय वेळेनुसार किती वाजता असणार सामना?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा – IPL Auction 2025: आयपीएल लिलावात दिसणार ४२ वर्षीय खेळाडू, १५ वर्षांपूर्वी खेळला होता अखेरचा टी-२० सामना; ‘या’ संघाचा आहे गोलंदाजी कोच

आयपीएल महालिलाव हा नेमका भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान होणार आहे. २२ नोव्हेंबरला पर्थ येथे या कसोटी मालिकेची सुरुवात होणार आहे. डिस्ने स्टार, ज्यांच्याकडे आयपीएल आणि भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका या दोन्हींचे प्रसारण अधिकार आहेत. कसोटी सामना आणि आयपीएल महालिलाव एकाचवेळी होणार आहे, पण ऑस्ट्रेलियात सामने असल्याने वेळेतील फरकामुळे, लिलाव, भारतीय वेळेनुसार दुपारी आयोजित केल्यास त्याचा चाहत्यांना योग्य लाभ घेता येईल.

हेही वाचा – IPL Auction 2025: आयपीएल लिलावात पहिल्यांदाच या देशाच्या खेळाडूचा सहभाग; मुंबई इंडियन्सशी आहे खास कनेक्शन

७५ लाख मूळ किंमत असलेले खेळाडू

पृथ्वी शॉ आणि सर्फराझ खान यांनी ७५ लाखांच्या मूळ किमतीत नोंदणी केली आहे. शॉला गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सने कायम ठेवले होते. सर्फराझला गेल्या वर्षी लिलावात कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतले नव्हते. मेगा लिलावासाठी नोंदणी केलेल्या खेळाडूंची लांबलचक यादी बीसीसीआयने अद्याप जाहीर केलेली नाही. आयपीएल फ्रँचायझींकडून इनपुट मिळाल्यानंतर यादी जाहीर केली जाईल.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कला २०२४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने २४.५० कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याने महालिलावात २ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत नोंदणी केली आहे. जोफ्रा आर्चर देखील त्याच मूळ किंमतीच्या यादीत आहे, ज्याने २०२३ पासून दुखापतीमुळे आयपीएलमध्ये एकही सामना खेळलेला नाही.

हेही वाचा – IPL Auction Date: आयपीएल लिलावाची तारीख जाहीर, १ नव्हे दोन दिवस चालणार महालिलाव; १४७५ खेळाडूंचा समावेश

ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनही आयपीएल लिलावात उतरणार आहे. त्याने २०१४ पासून एकही टी-२० सामना खेळलेला नाही आणि तो यापूर्वीही कधी IPL चा भागही नव्हता. त्याने लिलावासाठी १.२५ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत नोंदणी केली आहे. अँडरसनने काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

Story img Loader