IPL 2025 Mega Auction Time Changes: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याबरोबरच सर्वांच्या नजरा आयपीएल २०२५ च्या महालिलावाकडेही आहेत. आयपीएल २०२५ पूर्वी, जेद्दाह सौदी अरेबिया येथे २४ आणि २५ नोव्हेंबरला महालिलाव होणार आहे. दर तीन वर्षांनी, आयपीएलमध्ये महालिलाव होतो. यावेळी लिलावासाठी एकूण १५७४ खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५७७ खेळाडूंना आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने शॉर्टलिस्ट केलं आहे. पण आता या लिलावाची तारीख बदलल्याचे समोर येत आहे.
आयपीएल २०२५ चा हा महालिलाव सौदी अरेबिया जेद्दाह येथील अबादी अल जोहर एरिनामध्ये होणार आहे. या आयपीएल महालिलावाची वेळ भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता होती. भारत-ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आयपीएल लिलाव होणार आहे. पण सामना सुरू होत असतानाच लिलाव सुरू होत असल्याने ही वेळ बदलण्यात आली आहे.
हेही वाचा – IPL 2025 Auction: आयपीएल लिलावाची सूत्रं कोणाकडे? जाणून घ्या त्यांचा आजवरचा प्रवास
मीडिया रिपोर्ट्सनुसार, BCCI ने लिलावाची वेळ बदलून २४ नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्थ कसोटीच्या दिवसाचा खेळ दुपारी २.५० पर्यंत संपणार होता पण दिवसाचा खेळ हा ३.२० पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे ब्रॉडकास्टर्सच्या विनंतीवरून आयपीएल लिलावाची वेळ दुपारी ३ नसून आता ३.३० करण्यात आली आहे. सौदी अरेबियामधील स्थानिक वेळेनुसार हा लिलाव दुपारी १ वाजता सुरू होईल.
हेही वाचा – IPL 2025 : BCCI कडून आयपीएलच्या पुढील तीन हंगामाचे वेळापत्रक जाहीर? IPL 2025 ‘या’ दिवशी सुरू होणार
आयपीएल २०२५ लिलावाचं वेळापत्रक
मेगा लिलावाच्या दोन्ही दिवशी दोन सत्रात बोली लावली जाईल. लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालेल. यानंतर लंच ब्रेक होईल आणि त्यानंतर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५.४५ ते रात्री १०:३० पर्यंत दुसरे सत्र होईल. दोन्ही दिवसांचे वेळापत्रक सारखेच राहणार आहे. ज्यामध्ये ३६७ भारतीय आणि २१० विदेशी खेळाडू सहभागी होणार आहेत. सर्व संघांनी आधीच ४६ खेळाडू रिटेन केले आहेत, त्यामुळे लिलावात जास्तीत जास्त २०४ स्लॉट रिकामे आहेत.