Mallika Sagar IPL 2025 Auctioneer: आयपीएल २०२५ चा महालिलाव येत्या २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी जेद्दाह येथे होणार आहे. या लिलावात लिलावकर्ते कोण असणार हे समोर आले आहे. दुबईत झालेल्या शेवटच्या आयपीएल लिलावकर्त्या मल्लिका सागर यावेळीही महालिलावात खेळाडूंचा लिलाव करताना दिसणार आहे. मल्लिका सागर या महिला प्रीमियर लीगच्या (WPL) लिलावकर्ता होत्या. आयपीएल २०२४ च्या लिलावात त्यांनी ह्यू ॲडम्स यांची जागा घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मल्लिका सागर यांना लिलावकर्त्या म्हणून दोन दशकांहून अधिक अनुभव आहे. गेल्या आयपीएल हंगामात त्यांनी आयपीएल लिलावकर्त्या म्हणून भूमिका निभावली होती होती आणि आयपीएलमधील खेळाडूंचा लिलाव करणाऱ्या त्या पहिल्या महिला लिलावकर्त्या ठरल्या. यापूर्वी आयपीएल लिलावाचे लिलावकर्ते म्हणून फक्त पुरुष लिलावकर्ते होते. रिचर्ड मॅडले, ह्यू ॲडम्स आणि चारू शर्मा या दिग्गजांनी आयपीएल लिलावात लिलावकर्ते म्हणून निभावली होती.

हेही वाचा – IPL 2025 Mega Auction Schedule: आयपीएल २०२५ चा महालिलाव किती वाजता सुरू होणार? लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल? जाणून घ्या योग्य चॅनेल

मल्लिका सागर यांची लिलावकर्त्या म्हणून कारकीर्द

फिलाडेल्फियामधील ब्रायन मावर कॉलेजमधून आर्ट हिस्ट्रीमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर मल्लिका यांनी २००१ मध्ये ऑक्शन कंपनी क्रिस्टीजमध्ये लिलावकर्त्या म्हणून त्यांच्या कारकिर्दीची करिअरची सुरुवात केली. यानंतर त्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला लिलावकर्त्या ठरल्या. डब्ल्यूपीएल आणि आयपीएलमपूर्वी मल्लिका सागर यांनी क्रीडा विश्वात खेळाडूंच्या लिलावात प्रो कबड्डी लीगमधून पदार्पण केले होते. प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल) आठव्या सीझनमध्ये मल्लिका सागर लिलावकर्त्या या भूमिकेत होत्या.

हेही वाचा – IPL 2025 Auction: कोण आहे वैभव सूर्यवंशी? आयपीएल लिलावात उतरणार फक्त १३ वर्षांचा भारतीय खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलंय जलद शतक

आयपीएल लिलावकर्त्या मल्लिका सागर

आयपीएल लिलावात ५७४ खेळाडूंवर लागणार बोली

आयपीएल २०२५ च्या मधील लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये एकूण ५७४ खेळाडूंचा समावेश आहे. ५७४ खेळाडूंपैकी ३६६ भारतीय आणि २०८ विदेशी खेळाडू आहेत, त्यात सहयोगी देशांतील ३ खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावात ३१८ भारतीय अनकॅप्ड खेळाडू आणि १२ अनकॅप्ड विदेशी खेळाडूंचा समावेश असेल.

२०४ जागांसाठी ५७४ खेळाडूंवर बोली लागणार आहे, त्यापैकी ७० विदेशी खेळाडूंसाठी उपलब्ध असतील. सर्वाधिक मूळ किंमत २ कोटी रुपये आहे, ज्यामध्ये ८१ खेळाडू आहेत. दोन दिवस चालणारा हा महालिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होईल.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 auction who is auctioneer mallika sagar will host upcoming mega auction on 24 25 november in jeddah bdg