DC vs MI Match Fans Fight Viral Video of IPL 2025: मुंबई इंडियन्स संघाने थरारक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा दारूण पराभव केला. यासह मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमातील दुसरा विजय नोंदवला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेलेला हा सामना खूपच रोमांचक होता. पण सामन्यादरम्यान, स्टँडमधील चाहत्यांमध्ये गोंधळही दिसून आला. जिथे चाहते एकमेकांशी भिडले आणि एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २०५ धावा करत दिल्लीला विजयासाठी २०६ धावांचं लक्ष्य दिलं. दिल्लीच्या करूण नायर ८९ धावांची खेळी करत मुंबईला दणका दिला. पण मुंबईचा संघ शेवटपर्यंत सामन्यात कायम राहिला आणि १९व्या षटकात तीन खेळाडूंना रनआऊट करून १२ धावांनी थरारक विजय मिळवला. रोमांचक सामन्यादरम्यान स्टँड्समध्ये असलेले चाहतेही एकमेकांशी भिडले.
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील या सामन्याशी संबंधित एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये चाहते एकमेकांना हाणामारी करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की सामन्यादरम्यान काही चाहते एकमेकांशी भिडले आणि एकमेकांना जोरदार मारहाण करू लागले.
या हाणामारीमध्ये एक महिलाही सामील होती, जी या घटनेत मागे राहिली नाही. या महिला चाहतीने देखील एकाला मारताना दिसली. मात्र, या भांडणामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. हाणामारी थांबवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही हस्तक्षेप करावा लागला. हा व्हिडिओ आता खूप व्हायरल होत आहे.
यापूर्वी, ८ एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये हाणामारीही झाली होती. पंजाब किंग्जची सह-मालक आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने चाहत्यांची मने जिंकण्यासाठी त्यांच्या दिशेने टी-शर्ट फेकले होते, ज्यामुळे चाहते एकमेकांशी भिडले होते.
दिल्ली कॅपिटल्सविरूद्धचा सामना मुंबई इंडियन्ससाठी खूप खास होता. चॅम्पियन मुंबईने सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने २० षटकांत ५ गडी गमावून २०५ धावा केल्या. ज्याला प्रत्युत्तर देताना दिल्लीचा संघ १९ षटकांत १९३ धावा करून सर्वबाद झाला. एकेकाळी दिल्लीने फक्त २ विकेट गमावून १३५ धावा केल्या होत्या.