IPL 2025, CSK vs DC Highlights: दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने बलाढ्य चेन्नई सुपर किंग्स संघाचा घऱच्या मैदानावर २५ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह दिल्लीने १५ वर्षांनंतर चेपॉकच्या मैदानावर विजय मिळवला आहे. फिनिशर धोनी आणि विजय शंकर शेवटपर्यंत मैदानावर होते, पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकले नाहीत. दिल्लीच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत चेन्नईच्या फलंदाजांना धावा करण्याची संधी दिली नाही.

Live Updates

Chennai Super Kings vs Delhi Capitals Highlights: चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामन्याचे हायलाईट्स

18:24 (IST) 5 Apr 2025

CSK vs DC: षटकार अन् शिवम दुबे झेलबाद

विपराज निगमच्या १०व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शिवम दुबेने दणदणीत षटकार लगावला. पण या षटकारानंतर शिवम दुबे पुढच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.

18:19 (IST) 5 Apr 2025

CSK vs DC: डेव्हॉन कॉन्वे झेलबाद

विपराज निगमच्या सहाव्या षटकात डेव्हॉन कॉन्वे झेलबाद झाला आहे. यासह पॉवरप्लेमध्येच सीएसकेने ३ विकेट्स गमावले आहेत.

17:48 (IST) 5 Apr 2025

ऋतुराज गायकवाडही बाद

१८४ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्यासमोर खेळताना रचीन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड दोघेही तंबूत परतले आहेत. मिचेल स्टार्कने ऋतुराजला बाद केलं.

17:42 (IST) 5 Apr 2025

रचीन रवींद्र माघारी

मुकेश कुमारने रचीन रवींद्रला बाद करत दिल्लीला पहिलं यश मिळवून दिलं.

17:30 (IST) 5 Apr 2025

आशुतोश शर्माऐवजी मुकेश कुमार

दिल्लीने डाव संपताच आशुतोष शर्माऐवजी मुकेश कुमारला संघात समाविष्ट केलं.

17:16 (IST) 5 Apr 2025

दिल्लीचं चेन्नईला १८४ धावांचं आव्हान; राहुलची ७७ धावांची शानदार खेळी

के.एल.राहुलच्या ७७ धावांच्या खेळीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई संघासमोर १८४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. राहुलने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ही खेळी सजवली. अभिषेक पोरेल (३३), अक्षर पटेल (२१), ट्रिस्टन स्टब्ज (२४), समीर रिझवी (२०) यांनी उपयुक्त खेळी करत त्याला चांगली साथ दिली. चेन्नईकडून खलील अहमदने २ विकेट्स पटकावल्या.

16:56 (IST) 5 Apr 2025

समीर रिझवी तंबूत

१५ चेंडूत २० धावांची उपयुक्त खेळी करून समीर रिझवी तंबूत परतला.

16:24 (IST) 5 Apr 2025

नूर अहमदने दूर केला अक्षर पटेलचा अडथळा

पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करणाऱ्या अक्षर पटेलने माघारी धाडलं. त्याने १४ चेंडूत २१ धावा केल्या.

16:15 (IST) 5 Apr 2025

अभिषेक पोरेल माघारी

२० चेंडूत ३३ धावा करून अभिषेक पोरेलने पॉवरप्ले गाजवला पण रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर थर्डमॅनच्या बाजूने फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न फसला.

16:04 (IST) 5 Apr 2025

पॉवरप्लेवर अभिषेक पोरेलची सद्दी

पॉवरप्लेच्या ६ षटकात जेक फ्रेझर मॅकगर्क बाद झाल्यावर अभिषेक पोरेलने सूत्रं हाती घेत मनमुराद फटकेबाजी केली. दिल्लीने ६ षटकात ५१ धावा केल्या.

15:46 (IST) 5 Apr 2025

मुकेश चौधरीच्या षटकात १९ धावा

यंदाच्या हंगामातली पहिलीच लढत खेळणाऱ्या मुकेश चौधरीच्या पहिल्याच षटकात दिल्लीच्या अभिषेक पोरेलने १९ धावा वसूल केल्या.

15:36 (IST) 5 Apr 2025

जेक फ्रेझर मॅकगर्क माघारी

डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदने पहिल्याच षटकात चेन्नईला यश मिळवून दिलं. खलीलने धोकादायक जेक फ्रेझर मॅकगर्कला बाद केलं. मोठा फटका मारण्याचा फ्रेझरचा प्रयत्न अश्विनच्या हातात जाऊन विसावला,

15:21 (IST) 5 Apr 2025

कॉनवेचा समावेश आणि चाहत्यांचा जल्लोष

चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने दिल्लीविरुद्धच्या लढतीसाठी डेव्हॉन कॉनवेला संघात असल्याचं जाहीर करताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. कॉनवे हा चेन्नई संघाचा अविभाज्य घटक आहे. मात्र अंतिम अकरात चारच विदेशी खेळाडू खेळू शकतात. यंदाच्या हंगामात कॉनवेला संघात स्थान मिळालं नव्हतं. रचीन रवींद्र, सॅम करन, नॅथन एलिस, जेमी ओव्हर्टन यांना संधी मिळाली होती. रचीन वगळता बाकी कुणालाही संघातलं स्थान कायम राखता आलं नाही. कॉनवेच्या समावेशाने चेन्नईची फलंदाजी बळकट झाली आहे.

Chennai Super Kings vs Delhi Capitals Highlights: चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचा चेपॉकवर दिल्लीने सहज पराभव केला आणि गुणतालिकेत पहिले स्थान गाठले.