IPL 2025 CSK vs MI Highlights: आयपीएलच्या १८ व्या सीझनमधील हायव्होल्टेज सामना म्हणजेच दोन चॅम्पियन संघ असलेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला गेला. नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलमधील पहिला सामना देवाला देत पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नईने रचिन रवींद्र व ऋतुराज गायकवाड यांची अर्धशतकी आणि सामनावीर ठरलेल्या नूर अहमदच्या ४ विकेट्सच्या जोरावर मुंबईवर ४ विकेट्सने विजय मिळवला. मुंबईने चेन्नईला विजयासाठी १५६ धावांचे आव्हान दिले होते, जे चेन्नईने ५ चेंडू शिल्लक ठेवून जिंकले. पण मुंबईनेही कडवी झुंज दिली. मुंबईचा नवा युवा गोलंदाज विघ्नेश पुथूर या सामन्यात ३ विकेट्स घेत चर्चेत आला.

Live Updates

CSK vs MI IPL 2025: आयपीएल मधील एल क्लासिको सामना म्हणजेच मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आज २३ मार्चला खेळवला गेला. ज्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला आहे.

23:38 (IST) 23 Mar 2025

CSK vs MI Live Score: चेन्नई सुपर किंग्सचा विजय

चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सने विजय मिळवला आणि चेपॉकचा किल्ला अभेद्य राखला.

22:38 (IST) 23 Mar 2025

CSK vs MI Live Score: मुंबई इंडियन्सने मिळवली पाचवी विकेट

विल जॅक्सने १५व्या षटकातील पहिल्या चेंडूवर सॅम करनला क्लीन बोल्ड करत संघाला पाचवी विकेट मिळवून दिली.जॅक्सची पहिल्या षटकात धुलाई झाली असली तरी सूर्याने त्याला गोलंदाजी दिली आणि त्याने विकेट मिळवत त्याचा विश्वास खरा ठरवला. यासह चेन्नईने १४ षटकांत ५ बाद ११६ धावा केल्या आहेत आणि चेन्नईला विजयासाठी ३५ चेंडूत ४० धावांची गरज आहे.

22:30 (IST) 23 Mar 2025

CSK vs MI Live Score: विघ्नेश पुथूरचे पदार्पणात ३ विकेट्स

विघ्नेश पुथूरच्या १२व्या षटकातील चौथ्या चेंडूवर दिपक हुडा मोठा खेळण्यासाठी गेला, पण ऋतुराज आणि शिवम दुबेप्रमाणेच सीमारेषेजवळ झेलबाद झाला. विघ्नेश पुथूरने ३ षटकांत ३ विकेट घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली.

22:21 (IST) 23 Mar 2025

CSK vs MI Live Score: विघ्नेश पुथूरच्या खात्यात दुसरी विकेट

विघ्नेश पुथूरला १०वे षटक टाकण्याची जबाबदारी दिली आणि त्याने ४ धावा देत १ विकेट मिळवली. विघ्नेशच्या चौथ्या चेंडूवर शिवम दुबेला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत झेलबाद केलं. यासह विघ्नेशने १२ चेंडूत २ विकेट घेत ९ धावा दिल्या आहेत. यासह १० षटकांत चेन्नईने ३ बाद ९६ धावा केल्या आहेत.

22:13 (IST) 23 Mar 2025

CSK vs MI Live Score: मुंबईच्या युवा खेळाडूच्या खात्यात पहिली विकेट

मुंबई इंडियन्सने युवा फिरकीपटू विघ्नेश पुथूरला संधी दिली आणि त्याने पहिल्याच षटकात विकेट मिळवून दिली आहे. विघ्नेश पुथूरने झंझावाती फलंदाजी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला आपल्या फिरकीच्या जोरावर झेलबाद करत पहिली आयपीएलमधील विकेट मिळवली. विघ्नेश पुथूरने तमिळनाडू प्रीमियर लीगमधील गोलंदाजीमुळे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. यासह चेन्नईने ८ षटकांमध्ये २ बाद ७९ धावा केल्या आहेत.

22:06 (IST) 23 Mar 2025

CSK vs MI Live Score: ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक

ऋतुराज गायकवाडने आयपीएल २०२५ मधील पहिल्याच सामन्यात झंझावाती अर्धशतक झळकावत मुंबई इंडियन्सला बॅकफूटवर टाकलं आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋतुराजने २२७च्या स्ट्राईक रेटने २२ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह चेन्नईने ७ षटकांत १ बाद ७४ धावा केल्या आहेत.

21:58 (IST) 23 Mar 2025
CSK vs MI Live Score: पॉवरप्ले

चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्रच्या खेळीच्या जोरावर पॉवरप्लेमध्ये 1 विकेट गमावत ६२ धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड १९ चेंडूत ४२ धावांवर खेळत आहे. तर रचिनने १६ धावा केल्या आहेत.

21:41 (IST) 23 Mar 2025

CSK vs MI Live Score: मुंबई इंडियन्सच्या खात्यात पहिली विकेट

दिपक चहरच्या पहिल्याच षटकात त्याने मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली आहे. चहरच्या दुसऱ्या षटकातील चौथा शॉर्ट बॉल टाकत त्रिपाठी मोठा फटका मारायला बॅट फिरवली पण चेंडू बॅटची कड घेत थेट रिकल्टनच्या हातात गेला. यासह चेन्नईने पहिली विकेट गमावली. यासह २ षटकांत चेन्नईने १ बाद १२ धावा केल्या आहेत.

21:35 (IST) 23 Mar 2025

CSK vs MI Live Score: चेन्नईच्या डावाला सुरूवात

मुंबई इंडियन्सने दिलेल्या १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी चेन्नईची सलामी जोडी उतरली आहे. चेन्नईच्या सलामी जोडीत मोठा बदल पाहायला मिळाला आहे. रचिन रवींद्र आणि राहुल त्रिपाठीची जोडी सलामीसाठी मैदानात उतरली आहे. तर मुंबईच्या गोलंदाजीची सुरूवात ट्रेंट बोल्टने केली.

21:14 (IST) 23 Mar 2025
CSK vs MI Live Score: मुंबई इंडियन्सने दिले इतक्या धावांचे लक्ष्य

दीपक चाहरने अखेरच्या षटकांमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. चहरने अखेरच्या षटकात एक षटकार आणि एक चौकार लगावत मुंबईला १५० धावांचा टप्पा गाठण्यात मोठी भूमिका बजावली. याआधी चहरने १९व्या षटकात खलील अहमदच्या गोलंदाजीवर एक चौकार-षटकार लगावला होता. दिपक चहरने १५ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २८ धावा केल्या. यासह मुंबई इंडियन्सने ९ बाद १५५ धावा केल्या आहेत आणि सीएसकेला विजयासाठी १५६ धावांचे लक्ष्य दिले.

मुंबई इंडियन्सच्या संघाने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीसाठी उतरला. मुंबईची सुरूवात खूपच खराब झाली, रोहित शर्मा ३ चेंडू खेळून डकवर बाद झाला. यानंतर रायन रिकल्टन १३ धावा, विल जॅक्स ११ धावा करत बाद झाले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने संघाचा डाव सावरला. अर्धशतकी भागीदारी करत मुंबई इंडियन्सला १०० धावांपर्यंत नेले.

यानंतर रॉबिन मिंज ३ धावा, नमन धीर १७ धावा, सँटनर ११ धावा करत बाद झाले. तर दिपक चहरने २८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सीएसकेकडून नूर अहमदने ४ विकेट्स घेत सामना फिरवला. तर खलील अहमदने मुंबईला सुरूवातीचे विकेट घेत धक्के दिले आणि ३ विकेट्स नावे केले. तर नॅथन एलिस आणि अश्विन यांनी १-१ विकेट घेतली.

21:09 (IST) 23 Mar 2025

CSK vs MI Live Score: १९व्या षटकात चौकार-षटकार

दीपक चहरने १९व्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर चौकार आणि षटकार लगावत महत्त्वपूर्ण धावा जोडल्या. तर अखेरच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ट्रेंट बोल्ट झेलबाद झाला.

21:06 (IST) 23 Mar 2025

CSK vs MI Live Score: मुंबई इंडियन्सला आठवा धक्का

नॅथन एलिसच्या १८व्या षटकातील सहाव्या चेंडूवर मिचेल सँटनर पायचीत होत बाद झाला. एलिसने कर्णधाराला रिव्ह्यू घेण्यासाठी राजी केलं. यानंतर रिव्ह्यू पाहत तिसऱ्या पंचांनी त्याला बाद दिलं. यासह मुंबईने १८ षटकांत ८ बाद १२८ धावा केल्या.

20:55 (IST) 23 Mar 2025
CSK vs MI Live Score: नूर अहमदच्या खात्यात चौथी विकेट

नूर अहमदने १७व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मुंबईची अखेरची आशा असलेल्या नूर अहमदला क्लीन बोल्ड करत चौथी विकेट मिळाली. यासह मुंबईने अवघ्या ११८ धावा केल्या आहेत. नूर अहमदच्या चेंडूवर सूर्यकुमार यादव स्टंपिंग झाला. यानंतर त्याने तिलक वर्माला पायचीत केलं. तर रॉबिन मिंजही झेलबाद झाला. हे दोन्ही विकेट नूरने एकाच षटकात घेतले होते. यानंतर त्याने नमन धीरला क्लीन बोल्ड करत चौथी विकेट मिळवली.

20:39 (IST) 23 Mar 2025

CSK vs MI Live Score: मुंबईला पाचवा धक्का

नूर अहमदने एका षटकात दोन विकेट घेत मुंबई इंडियन्सला बॅकफूटवर ढकललं आहे. रॉबिन मिंजनंतर मुंबईचा तारणहार तिलक वर्माही पायचीत झाला आणि मुंबईच्या चांगल्या धावसंख्येचं स्वप्नही भंगलं आहे. तिलक वर्मा १३व्या षटकातील नूर अहमदच्या अखेरच्या चेंडूवर पायचीत झाला. चेंडू बॅटला न लागल्याने थेट पॅडवर आदळला आणि तिसऱ्या पंचांनीही रिव्ह्यू घेतल्यानंतर बाद दिलं. यासह मुंबईने १४ षटकांत ५ बाद १०० धावा पूर्ण केल्या आहेत.

20:31 (IST) 23 Mar 2025
CSK vs MI Live Score: सूर्या असा झाला आऊट

११व्या षटकात नूर अहमदच्या गोलंदाजी सूर्यकुमार यादव २९ धावा करत बाद झाला. अहमदने टाकलेला षटकातील तिसरा चेंडू सूर्याला कळला नाही आणि पुढे येऊन मोठा फटका खेळायला गेला. तितक्यात धोनीने चपळाईने स्टंपिंग करत सूर्याला बाद केलं. सूर्या २६ चेंडूत एक षटकार आणि २ चौकारांसह २९ धावा करत बाद झाला. यासह मुंबईने ११ षटकांत ४ बाद ९२ धावा केल्या आहेत.

https://twitter.com/dhoniverse_/status/1903823081325617640

20:20 (IST) 23 Mar 2025

CSK vs MI Live Score: ८ षटकांत मुंबईने केल्या इतक्या धावा

मुंबई इंडियन्सने लागोपाठ ३ विकेट्स गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी मुंबईचा डाव सावरला. यासह मुंबई इंडियन्सने ८ षटकांत ३ बाद ६६ धावा केल्या आहेत.

19:57 (IST) 23 Mar 2025

CSK vs MI Live Score: मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का

मुंबई इंडियन्सला पाचव्या षटकात तिसरा धक्का बसला आहे. सीएसकेमध्ये अश्विनच्या घरवापसीनंतर त्याने पहिल्याच षटकात विकेट मिळवली. मुंबई इंडियन्सचा नवा विस्फोटक फलंदाज विल जॅक्स अश्विनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. यासह मुंबईला तिसरा धक्का बसला आहे. ५ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या ३ बाद ४४ धावा आहे.

19:43 (IST) 23 Mar 2025

CSK vs MI Live Score: खलील अहमदची भेदक गोलंदाजी

मुंबई इंडियन्सला तिसऱ्या षटकात रोहित शर्मानंतर दुसरा धक्का बसला आहे. खलील अहमदने आधी रोहित शर्माला झेलबाद केलं. यानंतर पुढच्या षटकात मुंबईच्या दुसऱ्या सलामीवीरालाही माघारी धाडलं. खलील अहमदच्या तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रायन रिकल्टन क्लीन बोल्ड झाला. यासह मुंबईने २.२ षटकांत २ बाद २१ धावा केल्या आहेत.

19:37 (IST) 23 Mar 2025
CSK vs MI Live Score: रोहित शर्मा झेलबाद

मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने डावाची सुरूवात केली. खलील अहमदच्या गोलंदाजीवर पहिल्या ३ चेंडूवर रोहित शर्मा एकही धाव करू शकला नाही. चौथा चेंडू रोहित शर्माने उचलून खेळण्याचा प्रयत्न केला, पण शिवम दुबेकडून झेलबाद झाला. रोहित शर्मा ३ चेंडूत खातेही न उघडता झेलबाद झाला.

https://twitter.com/StarSportsIndia/status/1903812228664766946

19:34 (IST) 23 Mar 2025
CSK vs MI Live Score: एल क्लासिको सामन्याला सुरूवात

मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स सामन्याला सुरूवात झाली आहे. मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनची जोडी मैदानात आहे. तर चेन्नईकडून खलील अहमद गोलंदाजीला सुरूवात करत आहे.

19:09 (IST) 23 Mar 2025
CSK vs MI Live Score: मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकिपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, रॉबिन मिन्झ, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू

https://twitter.com/mipaltan/status/1903806912317006096

19:09 (IST) 23 Mar 2025

CSK vs MI Live: चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग इलेव्हन

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, दीपक हुडा, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, सॅम करन, एमएस धोनी (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, नॅथन एलिस, खलील अहमद

19:02 (IST) 23 Mar 2025

CSK vs MI Live Score: नाणेफेक

मुंबई वि. सीएसके सामन्याची नाणेफेक झाली असून चेन्नई सुपर किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे.

18:39 (IST) 23 Mar 2025

CSK vs MI: हेड टू हेड

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्सचे संघ ३७ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी १७ सामने चेन्नईने जिंकले आहेत आणि मुंबईने २० सामने जिंकले आहेत. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

18:30 (IST) 23 Mar 2025
CSK vs MI: दोन्ही संघ मैदानात

सीएसके वि. मुंबईचा सामना चेन्नईच्या घऱच्या मैदानावर म्हणजेच चेपॉकमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ चेपॉकच्या मैदानावर दाखल झाले आहेत.

https://twitter.com/UpdatesChennai/status/1903790928516825560

17:59 (IST) 23 Mar 2025

SRH vs RR: सनरायझर्स हैदराबादचं वादळ

आयपीएल २०२५ मधील डबल हेडर सामना आज २३ मार्चला खेळवला जात आहे. डबल हेडरमधील पहिला सामना राजस्था रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जात आहे. यामध्ये हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारली.

सनरायझर्स हैदराबादचं रौद्ररूप, IPL इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या; इशान किशनचं झंझावाती शतक

17:05 (IST) 23 Mar 2025

CSK vs MI Live: हार्दिक पंड्यावर चेन्नईविरूद्ध सामन्याची बंदी का?

आयपीएल २०२४ मधील अखेरच्या सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हार्दिक आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्यामुळे आता हार्दिकच्या जागी संघाचे नेतृत्त्व कोण करणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या.

17:03 (IST) 23 Mar 2025
CSK vs MI Live: पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार का बदलणार?

आयपीएल २०२५ मधील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार खेळताना दिसणार नाही. मुंबई इंडियन्सचे नेतृत्त्व गेल्या वर्षी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आले होते. पण हार्दिक पंड्यावर पहिल्याच सामन्यात बंदी घालण्यात आली. त्यामुळे संघाचे नेतृत्त्व सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे.

17:03 (IST) 23 Mar 2025

CSK vs MI Live: चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथीराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, अंशुल कंबोज, राहुल त्रिपाठी, सॅम करन, गुर्जपनीत सिंग, नॅथन एलिस, दीपक हुड्डा, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, श्रेयस गोपाल, रामकृष्ण घोष, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, शेख रशीद

17:02 (IST) 23 Mar 2025

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

हार्दिक पंड्या (कर्णधार) जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा , रायन रिकेल्टन, दीपक चहर, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, अश्वनी कुमार, मिचेल सँटनर, रीस टोपले, कृष्णन श्रीजीथ, राज अंगद बावा, सत्यनारायण राजू, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, कार्बिन बॉश, विघ्नेश पुथूर

CSK vs MI IPL 2025 Match Highlights in Marathi: चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्सचे हायलाईट्स